Monkeypox| कोरोनानंतर जगात मंकीपॉक्स आजाराची दहशत ; अनेक देशात वाढत्या मंकीपॉक्सच्या रूग्णांमुळे चिंता

Monkeypox| कोरोनानंतर जगात मंकीपॉक्स आजाराची  दहशत ; अनेक देशात वाढत्या मंकीपॉक्सच्या रूग्णांमुळे चिंता

Panic of monkeypox disease in the world after corona; Anxiety due to growing monkeypox patients in many countries

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत नाही तोच आता मंकीपॉक्सची (Monkeypox) दहशत निर्माण झाली आहे. फ्रान्स, जर्मनी आणि बेल्जियमने शुक्रवारी मंकीपॉक्सची लागण झालेल्या रूग्णांची पुष्टी करण्यात आली आहे. तर, दुसरीकडे युरोपियन राष्ट्रे स्पेन, इटली, पोर्तुगाल, स्वीडन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि युनायटेड स्टेट्ससह आफ्रिकेच्या काही भागांमध्येदेखील स्थानिक आजारांच्या तक्रारी नोंदवण्यात आल्या आहे. दरम्यान, वाढत्या मंकीपॉक्सच्या रूग्णांमुळे नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. (Monkeypox Virus News In Marathi)

एका फ्रेंच अधिकाऱ्याने सांगितले की, एका 29 वर्षीय व्यक्तीची मंकीपॉक्स चाचणी सकारात्मक आली असून, बेल्जियनमध्ये या विषाणुची दोन प्रकरणे समोर आली आहे. तर, स्पेनमध्ये आज 14 नवीन रूग्णांची भर पडल्याने मंकीपॉक्ची लागण झालेल्यांचीं संख्या आता 21 वर पोहोचली आहे. कॅनडामध्ये आतापर्यंत दोन प्रकरणांची पुष्टी करण्यात आली असून, क्विबेक प्रांतातील अधिकारी 17 संशयित प्रकरणांची चौकशी करत आहेत. इटली आणि स्वीडनमध्ये प्रत्येकी एका मंकीपॉक्स प्रकरणाची नोंद झाली आहे. युकेमध्ये 6 मे पासून नऊ प्रकरणांची पुष्टी करण्यात आली आहे.

मंकीपॉक्स आजार नेमका काय? What Is MonkeyPox Virus

मंकीपॉक्स हा संसर्गजन्य रोग आहे. प्राण्यांमधून तो माणासामध्ये आला. देवी या आजाराच्या जवळ जाणारा हा आजार आहे. याची लागण झाली तर छोटी पुरळ अंगावर येतात. हा आजार शरीरात पसरल्यास त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. यावर सध्या कुठलंही ठराविक औषध उपलब्ध नाही. या रोगाची लागण झाल्यानंतर कांजण्यांप्रमाणे फोड येतात असे, इंडियन मेडिकल असोसिएशनचे राज्याचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी सांगितले.

मंकीपॉक्सची लागण कशी होऊ शकते याबबात जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) माहिती दिली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार मंकीपॉक्स झालेल्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या एखाद्या व्यक्तिला याची लागण होऊ शकते. त्याचबरोबर शरीरातील द्रव, थुंकी किंवा मंकीपॉक्स झालेल्या व्यक्तीने वापरलेल्या गोष्टी वापरल्यास हा आजार होण्याचा धोका संभवतो. समलिंगी लोकांना याचा जास्त धोका असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. त्याचबरोबर लैंगिक संबंधातून देखील मंकीपॉक्स पसरु शकतो असं देखील तज्ज्ञ सांगतात. हा रोग मेंदू आणि पचनसंस्थेत पसरल्यास त्याचे वेगळे परिणाम दिसू शकतात. यामुळे डोळे जाण्याचे प्रकार देखील घडू शकतात असं देखील डॉक्टर सांगतात. (What Is MonkeyPox)

मंकीपॉक्सवर सध्या कुठलाही ठराविक उपचार नाही. काही देशांमध्ये याच्याविरोधातील लस मात्र उपलब्ध आहे. हा आजार बरा झाला तरी त्याचे व्रण राहतात. माणसामध्ये पहिल्यादा मंकीपॉक्स हा १९७० मध्ये आढळला होता. आफ्रिकेतील काँगो देशातील एका ९ वर्षाच्या मुलामध्ये याची लक्षणे आढळली होती. त्यांतर मध्य आणि पश्चिम आफ्रिकेत याचे अनेक रुग्ण सापडले होते. १९७० नंतर ११ ऑफ्रिकन देशांमध्ये मंकीपॉक्सचे रुग्ण सापडले होते. आता पुन्हा या आजाराने तोंड वर काढले आहे. सध्या युरोप आणि उत्तर अमेरिकेत मंकीपॉक्सच्या केसेस झपाट्याने वाढत आहेत. त्यामुळे जगाच्या चिंतेत पुन्हा भर पडत आहे. सध्या भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला नसल्याने चिंता करण्याची गरज नाही मात्र सतर्क राहण्याची नक्कीच आवश्यकता आहे.

Panic of monkeypox disease in the world after corona; Anxiety due to growing monkeypox patients in many countries

हे ही वाचा ==========

<

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: लेख Copy Peast करण्यापेक्षा Share करा. News Maharashtra Voice