Peshwa lover Balwant Purandare controversial story
पुरंदरे मुळातच शिवप्रेमी वा शिवभक्त नव्हते . तर ते पहिले बाजीराव पेशवे प्रेमी होते . खाष्ट ब्राम्हण वादी होते . त्यासाठी कारण पहिल्या बाजीराव पेशवे यांनी केलेल्या विजयी लढाया पेक्षा ते ब्राह्मण होते हेच खरे होते . त्या निमित्ताने पुरंदरे अगदीच वयाच्या सतराव्या वर्षी ब्राह्मण सभांमधून पहिल्या बाजीराव पेशवे यांच्या कथा सांगू लागले . पुढे गावोगावी ब्राह्मण समुदायात पुरंदरे व्याख्यान देण्यासाठी फिरत होते . त्यावेळी ते साधारण पाच सहा रुपये मिळावेत अशी मागणी करत होते . परंतू पैसे जमत नव्हते . तर प्रेक्षक संख्या कमी व फक्त म्हातारे ब्राह्मणच असायचे .
मुळातच ब मो पुरंदरेना लाभलेल्या जन्मजात वक्तृत्वातून त्यांनी पहिले बाजीराव पेशवे यांच्या बाबतीत जनजागृती करण्यासाठी सुरुवात केली होती . पहिले बाजीराव पेशवे हेच खरे मराठेशाहीच्या वाढीसाठी लढलेले एकमेव हिरो आहेत असे पुरंदरे सांगत . असे करताना छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य दुय्यम होते ही पुरंदरेंनी मांडणी केली होती . त्या निमित्ताने विदर्भ विभागातील गावोगावी फिरून व्याख्याने दिले होते . वय साधारण पंचवीस वर्षे असावे . पुरंदरेंच्या ओघवत्या शैलीतील बाजीराव वरील आख्यान एकदा आर एस एस चे गोळवलकर गुरुजी यांनी ऐकले . त्यांनी पुरंदरेंना बोलावून घेतले व स्पष्टपणे व्यवहारिक सूचना केल्या .
त्यातील प्रमुख अशी होती — ” तू मरेपर्यंत व जन्मभर पहिल्या बाजीराव पेशवे यांच्या बाबतीत कितीही व्याख्याने दिली तरी तूला काही मिळणार नाही . त्यापेक्षा तू तुझ्या कौशल्यांचा वापर करून समाजात छत्रपती शिवाजी महाराज यांचा ब्राह्मणी इतिहास सांगणे . तसे केले तर लोक तूला डोक्यावर घेऊन मिरवतील . आर एस एस चे सर्व कार्यकर्ते तूला मदत करतील . “” … अशी पुरंदरेंची शिवचरित्र समजून घेण्याची सुरुवात झाली . आणि त्यांनी पहिले बाजीराव पेशवे सोडून दिले . शिवचरित्राचे ब्राह्मणीकरण व विकृतीकरण सुरू केले .
त्यावर गोळवलकर गुरुजींनी शिक्कामोर्तब केले . १९५३ दरम्यान तिकिट लावून पुरंदरेंचे आठ दिवसांचे व्याख्यान यवतमाळ येथे झाले . तिकिट लावून व्याख्यान आयोजित करावे असे गोळवलकर गुरुजी यांनी सांगितले होते . त्यामुळे आर एस एस चे कार्यकर्ते पदाधिकारी कामाला लागले होते . जिकडे-तिकडे उदोउदो झाला . हा कार्यक्रम यशस्वी झाल्यानंतर पुरंदरे नागपूर येथील आर एस एस च्या कार्यालयात राहिले . सात आठ वर्षे नागपूर येथे राहिले . आर एस एस च्या मुशीत तयार झाले . पूर्ण तयारीनिशी शिवशाहीर म्हणून बाहेर पडले . छत्रपती शिवाजी महाराज व जनसामान्य बहुजन हिंदू समाज यांच्यातील भावनिक नाते प्रभावीपणे वापरून समाजात हिंदू विरुद्ध मुस्लिम ख्रिश्चन वातावरण तयार करणे सुरू केले .
शालेय शिक्षणातून तसेच वातावरण निर्माण केले जाऊ लागले . कॉंग्रेसचे मंत्री ही चाल समजू शकले नाही . पुढे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदरापायी सर्व राजकीय पक्षातील बहुजन नेत्यांनी पुरंदरेंना पूर्ण ताकदीनिशी आर्थिक मदत दिली . करोडो रुपये उपलब्ध करून दिले . महाराष्ट्र शासनाने करोडो रुपयांची विशेष खैरात वाटली . अशाच प्रकारे काही वर्षांपूर्वी आर एस एस चे कार्यकर्ते एकनाथ रानडे यांनी कन्याकुमारी येथे समुद्रात स्वामी विवेकानंदांचे शिल्प उभारले होते . विवेकानंदांचे ब्राह्मणीकरण यशस्वी झाले . त्यासाठी केंद्र व सर्व राज्यांनी आर्थिक मदत दिली होती .
पुरंदरे एकमेव व अंतीम शिवछत्रपतींच्या पराक्रमाच्या कथा सांगणारी व्यक्ती ही प्रतिमा तयार झाली. १९७४ मध्ये त्रिशताब्दी शिव राज्याभिषेक सोहळा निमित्ताने राजमाता सुमित्रा राजे भोसले सातारा यांनी पुरंदरेंना एका अर्थी लॉंच केले होते . त्यामुळे राज्यातील कुणबी मराठा बहुजन उद्दोजक , राज्यकर्ते , श्रीमंत व्यापारी यांनी पुरंदरेंना सर्वच सहकार्य केले . कुणबी मराठा बहुजन समाजातील मुले-मुली महानाट्यात फुकट काम करत होते . हीच पध्दत पुरंदरेंच्या शेवटच्या कार्यक्रमापर्यंत चालू राहिली . नंतरच्या काळात पुरंदरेंनी फुकट बोलणे पूर्णपणे बंद केले होते …. छत्रपती शिवाजी महाराज हे शब्द उच्चारण्यासाठीही पुरंदरे पैसे घेत होते . या काळात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अनेकदा पुरंदरेंना भरण्यापूर्वी एकदा तरी खरे शिवचरित्र लोकांना सांगा , असे टोमणे मारलेले होते . हे पवार साहेब , उध्दव व राज ठाकरे यांना माहित आहे . पण त्यांची गोची झाली आहे .
पण सन २००४ मध्ये जेम्स लेन प्रकरण वेळी पुरंदरेंचे बेगडी शिवप्रेम उघडे नागडे झाले … नि तोपर्यंत जनसामान्यांच्या मनावर खोलवर बिंबवले गेलेले पुरंदरे शिवद्रोही असल्याचे सिद्ध झाले …
ब मो पुरंदरे हे पूर्णकालीन ब्राह्मणी वर्चस्वाला टिकविण्यासाठी आर एस एस चे कार्यकर्ते म्हणूनच काम करत होते . हे समजायला बराच वेळ लागला … युवा पिढीने खोलवर जाऊन माहिती घेऊन ठरवावे ..
या निमित्ताने माझी सर्व कुणबी मराठा बहुजन समाजातील लोकांना व राजकीय नेत्यांना नम्र विनंती आहे की कृपया आपल्यातील गुणी मुले-मुली निवडून त्यांना मोठे करा . असे युवा संशोधक कलाकार अभ्यासक वक्ते अभिनेते लेखक अशा सर्वच क्षेत्रातील मुले-मुली तयार करून समाजात एकोपा निर्माण करण्यासाठी उपयोग करा . तुमच्या आजूबाजूला दररोज वावरणारे अनेक पुरंदरे दूर करा . सांस्कृतिक स्वातंत्र्य मिळाल्यानंतर राजकीय सत्ता हस्तगत करणे शक्य आहे याची खात्री बाळगावी .
पुरुषोत्तम खेडेकर चिखली .
१६-११-२०२१ .
===============================================================
- हा हिंदूत फुट पाडणारा राक्षस; कालीचरण महाराजांची मनोज जरांगे पाटील यांच्यावर जहरी टिका
- Maharashtra Assembly Elections -2024 प्रचाराच्या तोफा आज सायंकाळी 5 वाजल्यापासून थंडावल्या.
- बाभळीच्या शेंगा हे आयुर्वेदातील एक महत्त्वाचे औषध; जाणून घ्या फायदे |Acacia pods are an important medicine in Ayurveda; Know the benefits
- Former Cricketer Sanjay Bangar Son Aryan Gender Transformation To Anaya | टिम इंडियाचा माजी क्रिकेटर संजय बांगरचा मुलगा आर्यन बांगर लिंग परिवर्तन करुन मुलगी अनया बांगर झाला
- देवगिरी संस्थेच्या विद्यार्थ्यांचा अविष्कार २०२४ स्पर्धेत विभागीय पातळीवर सुवर्ण कामगिरी