goes into solitude to relieve mental fatigue; Amol Kolhe’s post on socialmeda मानसिक थकवा घालविण्यासाठी एकांतवासात जातोय; अमोल कोल्हेंची सोशलमिडावर पोस्ट
आधी डॉक्टर, मग अॅक्टर आणि राजकारणात प्रवेश केलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार अमोल कोल्हे हे नेहमी आपल्या वेगवेगळ्या गोष्टींसाठी चर्चेत असतात. गेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत अमोल कोल्हे यांनी राज्यभरात राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक म्हणुन धुरा सांभाळली. त्यानंतर आता खासदार म्हणून देखील ते वेगवेळ्या गोष्टींसाठी आणि लोकसभेतील भाषणांसाठी चर्चेत असतात. त्यातच आता अमोल कोल्हे यांनी काही काळ एकांतवासात जात असल्याची घोषणा केली आहे.
खासदार अमोल कोल्हे यांनी स्वत: आपल्या या निर्णयाबद्दलची माहिती दिली आहे. यावेळी त्यांनी एक पोस्ट करत मानसिक थकवा घालवण्यासाठी एकांतवासात जात असल्याची माहिती दिली. “सिंहावलोकनाची वेळ:- गेल्या काही दिवसांत, महिन्यांत, वर्षांत बेभान होऊन धावत राहिलो, काही टोकाचे निर्णय घेतले, अनपेक्षित पावलं उचलली. पण हे सगळं जुळवताना झालेली ओढाताण, तारेवरची कसरत, वेळेची गणितं, ताणतणाव यामुळे जरा थकवा आलाय..थोडा शारीरिक, बराचसा मानसिक! शारीरिक थकवा आरामाने निघून जाईल पण मानसिक थकवा घालवण्यासाठी हवं- थोडं मनन, थोडं चिंतन!” असं म्हणत अमोल कोल्हे यांनी आपल्या या निर्णयाची माहिती दिली आहे.
दरम्यान, पुढे ते असंही म्हणाले की, घेतलेल्या निर्णयांचा विचार, आणि कदाचित फेरविचार सुद्धा करणार आहे. त्यासाठीच आपण एकांतवासात जातोय असंही ते म्हणाले. त्यामुळे काही काळ संपर्क होणार नाही असं त्यांनी सांगितलंय. पुढे टीप म्हणून त्यांनी आपण फक्त चिंतनासाठी जातोय, चिंतनशिबिरासाठी नाही असंही सांगितलं आहे.
=============================================
- हा हिंदूत फुट पाडणारा राक्षस; कालीचरण महाराजांची मनोज जरांगे पाटील यांच्यावर जहरी टिका
- Maharashtra Assembly Elections -2024 प्रचाराच्या तोफा आज सायंकाळी 5 वाजल्यापासून थंडावल्या.
- बाभळीच्या शेंगा हे आयुर्वेदातील एक महत्त्वाचे औषध; जाणून घ्या फायदे |Acacia pods are an important medicine in Ayurveda; Know the benefits
- Former Cricketer Sanjay Bangar Son Aryan Gender Transformation To Anaya | टिम इंडियाचा माजी क्रिकेटर संजय बांगरचा मुलगा आर्यन बांगर लिंग परिवर्तन करुन मुलगी अनया बांगर झाला
- देवगिरी संस्थेच्या विद्यार्थ्यांचा अविष्कार २०२४ स्पर्धेत विभागीय पातळीवर सुवर्ण कामगिरी