कृषी

पीएम किसान सन्मान निधीच्या 10 व्या हप्त्यासाठी वेबसाइटवर तुम्ही माहिती अपडेट करू शकता कशी ती जाणून घेऊया.

Let us know how you can update the information on the website for the 10th installment of PM Kisan Sanman Nidhi.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा दहावा हफ्ता डिसेंबरमध्ये मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. ज्यांचा मागील हफ्ता चुकला आहे, त्यांना चार हजार रूपये यासोबत मिळणार आहेत. या योजनेची शेवटची तारीख आहे ३० सप्टेंबर होती. या योजनेचा लाभ घेण्य़ासाठी तुम्ही वेबसाइटवर नाव नोंदणी केली असेल. जर तुम्हाला या संदर्भात काही माहिती हवी असेल किंवा नोंदणी करताना काही चूक झाली असेल तर घाबरू नका पीएम किसान या वेबसाइटवर तुम्ही माहिती अपडेट करू शकता कशी ती जाणून घेऊया.


या वेबसाइटची घ्या मदत
लाभार्थ्यांनी पीएम किसान या वेबसाइटवर pmkisan.gov.in किंवा PMKISAN GOI या मोबाईल अॅपवर तुम्ही माहिती घेऊ शकता. ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाही अशा शेतकऱ्यांनी किसान हाॅटलाइन या नंबरवर संपर्क करून तुमच्या तक्रारीचे निवारण करू शकता. याशिवाय pmkisan.gov.in/BeneficiaryStatus.aspx या लिंकवर आपली डिटेल्स चेक करू शकता.

आर्थिक वर्षानुसार, एकावर्षात तीन टप्प्यात हफ्ता जमा केला जातो. एप्रिल ते जुलैमध्ये दुसरा आणि आॅगस्ट ते नोव्हेंबरच्या दरम्यान तिसरा हफ्ता दिला जातो. लाभार्थी पीएम किसान निधी कधी मिळणार हे पाहण्यासाठी आधार क्रमांक, खाते क्रमांक आणि मोबाईल नंबर वरून माहिती घेऊ शकता.

असे करा अपडेट
पीएम किसान अंतर्गत नवीन नोंदणी करण्यासाठी आधारकार्ड, पत्ता, पासपोर्ट आकाराचा फोटो, सातबारा उतारा ही कागदपत्रे लागतात. तुम्ही नोंदणी करत असताना चुक झाली असेल तर घाबरू नका. तुम्ही ही माहिती अपडेट करू शकता. यासाठी होमपेजवर फामर्स कॉर्नर या पर्यायावर क्लिक करा. यावर एडिट आधार डिटेल्स हा पर्याय उपलब्ध असेल. यावर आधार नंबर कॅप्चा कोड भरा. यानंतर सबमिट पर्यायावर क्लिक करा. यावर तुमची चुकलेली डिटेल्स भरू शकता. यावर जर काही गडबड जाणवली तर कृषी खात्याची मदत घेऊ शकता. हेल्प डेस्क या पर्यायाचा वापर करून आधार क्रमांक, खाते क्रमांक, मोबाईल नंबर देऊन झालेली चूक सुधारू शकता.

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना 1 डिसेंबर 2018 रोजी सरकारने लागू केली. या योजनेचे उद्दिष्ट जिरायती जमीन असलेल्या भारतातील शेतकऱ्यांसाठी सहा हजार रूपये सहायत्ता निधी देण्याची व्यवस्था करणे हे आहे. याचा थेट लाभ डायरेक्ट बेनेफिट ट्रांन्सफरद्वारे शेतकऱ्यांना 2000 रुपये तिमाही हप्त्यात वार्षिक 6000 रुपये मिळतात. हीच रक्कम सध्या सरकार दोन टप्यात वाढवणार आहे. या योजनेतून शेतकऱ्यांना तिमाही हप्त्यांमध्ये वर्षाला 12,000 रुपये दिले जाते. ही योजना ग्रामीण ते शहरी भागातील शेतकऱ्यांसाठी लागू आहे. शेतकऱ्यांच्या कुटुंबांनाही या योजनेचा लाभ घेता येतो. आतापर्यत भारतातील 11.37 शेतकऱ्यांपैकी 1.58 लाख कोटी रुपये या योजनेचा लाभ शेतकऱ्यांनी घेतलेला आहे

==============================================================================

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Site Statistics
  • Today's visitors: 20
  • Today's page views: : 20
  • Total visitors : 512,619
  • Total page views: 539,526
error: लेख Copy Peast करण्यापेक्षा Share करा. News Maharashtra Voice