Weather Report |भारतीय हवामान विभागानं पावसाचा अंदाज जारी केला, कुठे किती पडणार जाणुन घ्या सविस्तर

Weather Report |भारतीय हवामान विभागानं पावसाचा अंदाज जारी केला, कुठे किती पडणार जाणुन घ्या सविस्तर

मुंबई:भारतीय हवामान विभागानं Weather Report पावसाचा पुढील चार दिवसांसाठी अंदाज जारी केला आहे. कमी दाबाचे क्षेत्र छत्तीससगड वर असल्यानं आणि 15° उत्तर वर पूर्व-पश्चिम शियर जोन आहे. या परिस्थितीचा प्रभाव म्हणून महाराष्ट्र राज्यासाठी हवामान विभागानं पावसाचे इशारे जारी केले आहेत. पुढील तीन ते चार दिवसात महाराष्ट्रात Weather Report काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होईल, अशी शक्यता आहे. विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्राचा उत्तर भाग, कोकणात ठाणे, पालघर आणि मुंबईत जोरदार पाऊस होईल, अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. आज मराठवाड्यातील काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

मराठवाडा, कोकण, विदर्भात मुसळधार ते अतिमुसळधार, मुंबईतही दमदार पावसाचा इशारा; IMD चा अलर्ट Weather Report महाराष्ट्र राज्यासाठी हवामान विभागानं पावसाचे इशारे जारी केले आहेत. पुढील तीन ते चार दिवसात महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होईल, अशी शक्यता आहे. लातूर, उस्मानाबादला ऑरेंज अ‌ॅलर्ट हवामान विभागानं आजच्या दिवसासाठी लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्याला ऑरेंज अ‌ॅलर्ट दिला आहे. तर,रत्नागिरी, रायगड, जळगाव, बुलडाणा, जालना, औरंगाबाद, अकोला, अमरावती, परभणी, वाशिम, यवतमाळ, नांदेड, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, नागपूर, वर्धा आणि हिंगोली जिल्ह्यांना यलो अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे. Weather Report today IMD predicts heavy rainfall at Maharashtra

31 ऑगस्टला रायगड, ठाणे आणि नाशिकला अ‌ॅलर्ट
मंगळवारी रायगड, ठाणे आणि नाशिक जिल्ह्यांना ऑरेंज अॅलर्ट देण्यात आला आहे. रत्नागिरी, मुंबई, पुणे पालघर, धुळे, नंदुरबार, जळगाव, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, अमरावती आणि नागपूर जिल्ह्यांना यलो अ‌ॅलर्ट देण्यात आलाय. Weather Report 1 सप्टेंबरला राज्यात पालघरला ऑरेंज अ‌ॅलर्ट देण्यात आला असून मुंबई, ठाणे, रायगड, नाशिक आणि नंदूरबार जिल्ह्यांना यलो अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे. Weather Report today IMD predicts heavy rainfall at Maharashtra

बारामतीत पावसाची हजेरी
बारामती शहर आणि तालुक्यातील विविध भागात आज रिमझिम पावसाने हजेरी लावली. शहर आणि परिसरात दुपारपासून पावसाच्या सरीवर सरी बरसत होत्या. Weather Report पावसामुळं जनजीवन काहीसे विस्कळित झाले.मात्र, बऱ्याच दिवसानंतर पावसाने हजेरी लावल्यानं नागरीकांना दिलासा मिळालाय.

अकोल्यात सकाळपासून जोरदार पाऊस Weather Report
अकोला जिल्ह्यात गेल्या 10 दिवसापासून दांडी मारलेल्या पावसानं पुन्हा जोरदार हजेरी लावलीय. या पावसामुळे सोयाबीन ,उळीद,पिकांना धोका निर्माण झालाय. रात्रीपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. सकाळपासून पावसाची रिमझिम रिमझिम सुरू होती. दुपारनंतर आता पावसाचा जोर वाढला होता. अकोल्यात जोरदार पाऊस झाल्यानं शेतकरी सुखावला आहे. Weather Report today IMD predicts heavy rainfall at Maharashtra

==================================================================================

Related posts

Leave a Comment