Health Tips|पावसाळ्यात आहारात ‘हे’ आरोग्यदायी पदार्थ सामील करा आणि निश्चिंत व्हा !
पावसाळ्यात संसर्गाचा धोका अधिक वाढतो. पावसाळ्यात कडक उन्हापासून आराम मिळतो, पण सोबतच इन्फेक्शन, फ्लू आणि सर्दी होण्याची शक्यता देखील अधिक असते. अशा परिस्थितीत आपल्या आहारात अनेक प्रकारचे आरोग्यदायी पदार्थ समाविष्ट केले जाऊ शकतात. या पदार्थांमुळे रोग प्रतिकारशक्ती वाढण्यास आणि संसर्गाशी लढण्यास मदत होईल. चला तर, जाणून घेऊया अशा कोणत्या 10 पदार्थांचा आहारात समावेश करून तुम्ही निरोगी राहू शकता. (Include healthy foods in your diet during the rainy season)
हिरव्या मिरच्या
हिरव्या मिरचीमध्ये पिपेरिन असते, जे एक अल्कलॉइड आहे, ज्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. त्यात व्हिटामिन सी आणि केचे समृद्ध प्रमाण देखील आहे. हिरव्या मिरचीमध्ये अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात. हे फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून संरक्षण करतट. तसेच, अनेक गंभीर आजार टाळण्यास मदत करू शकतात. हिरव्या मिरच्या हायड्रोक्लोरिक अॅसिडचे उत्पादन उत्तेजित करून, वायू कमी करू शकतात, ज्यामुळे पचन सुधारते. यात अँटीमाइक्रोबियल गुणधर्म देखील आहेत.
फळे
पीच, प्लम, चेरी, बेरी, डाळिंबासारखी हंगामी फळे जीवनसत्त्वे ए आणि सी, फायबर आणि अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध असतात. मात्र, रस्त्याच्या कडेला आधीच कापून ठेवलेली फळे आणि ज्यूस खाणे टाळा. स्वच्छ धुवून, ताजे कापलेले फळ आणि घरगुती बनवलेले ज्यूसच सेवन करा.
पेय
सूप, मसाला चहा, ग्रीन टी, मटनाचा रस्सा, डाळींचे सूप इत्यादी गरम द्रवपदार्थांचा आहारात समावेश करा. ते तुमची प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात.
भाज्या
हा दुधीचा हंगाम आहे. अशा स्थितीत दुधीपासून बनवलेल्या अनेक पदार्थांचा आहारात समावेश केला जाऊ शकतो. यामध्ये पराठे, सूप, रायता आणि भाज्या इत्यदी स्वरुपात दुधीचे सेवन करू शकता. कच्च्या भाज्यांऐवजी उकडलेले सलाड खा. कारण या काळात कच्च्या भाज्यांवर सक्रिय बॅक्टेरिया आणि व्हायरस असतात, ज्यामुळे बॅक्टेरिया आणि व्हायरल इन्फेक्शन होऊ शकते.
प्रोबायोटिक्स
आपले पोट निरोगी ठेवण्यासाठी दही, ताक, लोणची यासारख्या प्रोबायोटिक्सचा आहारात समावेश करा. हे प्रोबायोटिक्स आतड्यात चांगल्या जीवाणूंच्या वाढीस प्रोत्साहन देण्यास मदत करतात, जे आतड्यातून खराब बॅक्टेरिया किंवा रोग निर्माण करणाऱ्या बॅक्टेरियाशी लढण्यास मदत करतात.
प्रथिने
निरोगी प्रथिने आपल्या आहारात समाविष्ट केल्याने रोग प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. हे आपल्याला आजारातून लवकर बरे होण्यास मदत करतात. दूध, मूग, मसूर, चणे, राजमा, सोया, अंडी आणि चिकन हे प्रथिनांचे चांगले स्रोत आहेत.
आले आणि लसूण
आले आणि लसूण सर्दी आणि तापाशी लढायला मदत करतात. यात अँटी-व्हायरल गुणधर्म आहेत. त्यांच्यामध्ये दाहक-विरोधी, प्रतिजैविक आणि अँटिऑक्सिडेंट गुणधर्म आहेत. आल्याचा चहा घशातील वेदना कमी करण्यास मदत करू शकतो. हे घटक ग्रेव्ही, चटणी, सूप, चहा इत्यादीमध्ये मिसळता येतात.
मेथी
मेथी हा शरीराची ऊर्जा वाढवणारा घटक आहे. त्यात आपल्या शरीराची काळजी घेण्यासाठी आवश्यक असलेली सर्व खनिजे असतात. हे ताप आणि पाचन तंत्र निरोगी ठेवण्यास मदत करते.
हळद
हळदीमध्ये कर्क्यूमिन असते. यात अँटीऑक्सिडेंट, अँटीमाइक्रोबियल प्रभाव आहे, ते गॅस्ट्रिक अल्सर प्रतिबंधित करते आणि प्रतिकारशक्ती सुधारते.
ओमेगा 3 फॅटी अॅसिड
ओमेगा 3 फॅटी अॅसिड शरीराला आवश्यक असणारे फॅटी अॅसिड आहेत. पावसाळ्यात संसर्गाचा धोका वाढतो. अशावेळी रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास आणि संसर्गाशी लढण्यास हे अॅसिड मदत करतात. यासाठी तुम्ही ओमेगा 3 फॅटी अॅसिडचे समृद्ध प्रमाण असणारे मासे, अक्रोड, पिस्ता, चिया बियाणे, अंबाडी, इत्यादी खाऊ शकता. (Include healthy foods in your diet during the rainy season)
======================================================================================================
- निसर्ग संवर्धनासाठी माहूरमध्ये होत आहे पर्यावरण संमेलन; अशी करा नाव नोंदणीEnvironment conference organized at Mahur for nature conservation; presence of Padma Shri Shabir
- IAS Mittali Sethi’s चा अनोखा निर्णय: जुळ्या मुलांना सरकारी अंगणवाडीत प्रवेश, नंदुरबारमध्ये समानतेचा आदर्शIAS Mittali Sethi’s Bold Move: Enrolls Twins in Government Anganwadi, Sets Equality Example
- आयआयटी बॉम्बेत शिक्षण ते जिल्हाधिकारी IAS Ashima Mittal यांचा प्रेरणादायी प्रवासमहाराष्ट्र व्हॉईस | महाराष्ट्राच्या प्रशासकीय क्षेत्रात आयएएस अशीमा मित्तल यांचे नाव तेजस्वीपणे चमकत
- Who Is Varsha Meena? | महिला सक्षमीकरण ते ग्रामीण विकास; IAS वर्षा मीणांचा प्रेरणादायी प्रवासप्रारंभिक जीवन आणि शिक्षण वर्षा मीणा या 2018 बॅचच्या भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस)
- विठ्ठल रुक्मिणीची महापूजा संपन्न, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीनी काय मागितलेपंढरपूर, दि. ६- पांडुरंगाने राज्यावरची संकटे दूर करण्याची शक्ती द्यावी, सन्मार्गाने चालण्याची सुबुद्धी

