पुणे ः राज्यात पंधरा दिवसापासून पावसाचा थेंब पडला नाही.खरिपाची पिके वाया जाण्याच्या मार्गावर आहेत. मात्र आशादायक वातावरण तयार होत आहे. राज्यात पाऊस पडण्यासाठी लागणारे पोषक वातावरण तयार होत आहे. पुढील आठवड्यात मराठवाडा, विदर्भासह अन्य काही भागात पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. पाऊस कधी येणार याकडे राज्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. (There has been no rain in the state for the last fortnight. Kharif crops are on the verge of wastage. But a hopeful atmosphere is being created. The state is creating a conducive environment for rainfall. The meteorological department has forecast rains in Marathwada, Vidarbha and some other parts next week. Farmers in the state are watching to see when the rains will come)
कोल्हापुर, सातारा, सांगली, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व अन्य काही ठिकाणी झालेला जोरदार पाऊस, पुर व अन्य संकटाच्या बाबी सोडल्या तर यंदा पावसाळ्याच्या सुरवातीपासूनच राज्याच्या अनेक भागात पुरेसा पाऊस नाही. खरिपाच्या पेरण्या तशा अल्प पावसावरच झाल्या आहेत. मात्र पाऊस नसल्याने चिंचेत वरेचवर भर पडत आहे. मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रातील धरणात येणारे पाणीही पाऊस नसल्याने थांबले आहे. सोयाबीन, बाजरी, मका, मुग, उडीद, तुर, कापुस यासारखी पीके पावसाअभावी भलतेच आडचणीत सापडले आहेत. जर अजून काही दिवस पाऊस आला नाही तर ही पीके वाया जाण्याची मोठी भिती शेतकऱ्यांना वाटत आहे.
राज्यात दोन दिवसापासून मात्र वातावरणात बदल झाला आहे. पुन्हा एकदा पाऊस सक्रिय होण्याची चिन्हे दिसत आहेत. हवामान विभागाने दोन आठवड्याचा हवामान अंदाज जाहीर केला आहे. त्यानुसार पहिल्या आठवड्यात साधारण 19 आॅगस्टपर्यत मराठवाडा, विदर्भ व अन्य भागात तसेच घाटमाथ्यावर हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल, फार जोरदार पाऊस पडणार नसला तरी काही प्रमाणात पाऊस झाला तर पिकांंना जीवदान मिळू शकते. दुसऱ्या आठवड्यात (20 ते 26 आॅगस्ट) अशीच परिस्थिती असेल. अनेक भागात आकाश निरभ्र असल्याने उन्हाचा चटका वाढला आहे.