भविष्य निर्वाह निधी वार्षिक विवरण पत्र सेवार्थ प्रणालीवर
मुंबई, दि. 10 : विदर्भ व मराठवाडा विभागातील शासकीय वर्ग-4 कर्मचाऱ्यांचे वर्ष 2020-21 या वित्तीय वर्षाचे भविष्य निर्वाह निधी वार्षिक विवरण पत्र मुख्य महालेखाकार- 2 नागपूर कार्यालयाच्या <https://agmaha.cag.gov.in/GPFNagv1.asp> ह्या लिंकवर अपलोड करण्यात आले आहे. कर्मचाऱ्यांनी आपले वार्षिक विवरणपत्र फक्त सेवार्थ पोर्टलमध्ये पाहण्यासाठी अथवा डाऊनलोड व प्रिन्ट काढण्यासाठी https://sevarth.mahakosh.gov.in/login.isp या लिंकवर उपलब्ध मार्गदर्शिका पुस्तिकेत पाहू शकतील. Provident Fund Annual Statement on Sevarth System
शासनाच्या निर्देशानुसार कर्मचाऱ्यांनी आपला मोबाईल क्रमांक नोंदणीकृत करणे आवश्यक आहे. मोबाईल क्रमांक उपलब्ध असल्यास कर्मचाऱ्यांना त्यांच्या जमा निधीची तसेच त्यांना दिलेल्या अग्रिम राशीची रक्कम एसएमएसद्वारे संदेश पाठवून कळविता येईल. ज्या कर्मचाऱ्यांचा मोबाईल क्रमांक अद्यापही नोंदणीकृत झाला नसेल त्यांनी आपला मोबाईल क्रमांक fm.mh2.ae@cag.gov.in या ईमेल पत्त्यावर किंवा 09423441755 या मोबाईल क्रमांकावर संदेश (एस.एम.एस.) पाठवून नोंदणी करुन घ्यावा. Provident Fund Annual Statement on Sevarth System
सर्व कर्मचाऱ्यांनी आपले नाव, जन्म तारीख, भविष्य निर्वाह निधी विवरणपत्र सेवार्थ प्रणालीमध्ये तपासून घ्यावे. तफावत असल्यास सेवार्थ प्रणालीमध्ये सुधारित करुन आहरण व संवितरण अधिकारी यांच्याकडून दुरुस्ती करुन घ्यावी. महालेखाकार कार्यालयाच्या अभिलेख्यामध्ये दुरुस्त करण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या सेवार्थ-आयडी सह gpftakrarngp@gmail.comवर ईमेल पाठवावा किंवा 0712-2560484या फॅक्सवर सूचित करावे.
कर्मचारी महालेखाकार कार्यालयाच्या <https:/agmaha.cag.gov.in/> या लिंकवर नोंदणीकृत करुन भविष्य निर्वाह निधी लेख्याची सद्य:स्थिती पाहू शकतील. भविष्य निर्वाह निधी अनुसूचिमध्ये अभिदात्याचे लेखा क्रमांक, विभागाशी संबंधित सिरीज व पूर्ण नाव असल्याची कर्मचाऱ्यांनी खात्री करावी. मासिक अधिदानाची राशी किंवा घेतलेल्या अग्रिमची भविष्य निर्वाह निधी लेख्यात नोंद झाली नसल्यास संबंधित आहरण व संवितरण अधिकाऱ्यांमार्फत कोषागार प्रमाणक व दिनांक, अनुसूचित प्रमाणकाची राशी, अनुसूचिबरोबर पाठवावी. जेणेकरुन नोंद न झालेले क्रेडिट व अग्रिमाची लेख्यामध्ये नोंद घेतली जाईल व सेवा निवृत्तीच्यावेळी भविष्य निर्वाह निधीची राशी प्राधिकृत करताना होणारा विलंब टाळता येईल, असे वरिष्ठ लेखाधिकारी, महालेखाकार-2 यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे. Provident Fund Annual Statement on Sevarth System
- डॉ. संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणात नवा ट्विस्ट: प्रशांत बनकरच्या बहिणीचा खळबळजनक दावा- डॉक्टरांनी भावाला….Dr. Sampada Munde Suicide Case: Bombshell Claim by Accused’s Sister – “Doctor Proposed
- फलटण डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरण: पोलिस अत्याचार, राजकीय दबाव आणि न्यायाची मागणी काय आहे प्रकरणDr. Sampada Munde Suicide Case in Phaltan: Police Atrocities, Political Pressure, and Demand
- कोळवाडी गावात “एक गाव, एक दिशा” स्नेहमिलन कार्यक्रम उत्साहात संपन्नकोळवाडी, 22 ऑक्टोबर 2025: कोळवाडी गावात “एक गाव, एक दिशा” या संकल्पने अंतर्गत
- “पर्यावरणासाठी एकत्र या… निसर्गासाठी जगा!”- ज्ञानेश्वर कऱ्हाळे; राज्यस्तरीय पर्यावरण संमेलन २०२५ — माहूर नगरीत हरित विचारांची पर्वणीमाहूर :- निसर्गाच्या कुशीत वसलेल्या माहूर नगरीत, पर्यावरण प्रेमींचा मेळा जमणार आहे.पद्मभूषण आदरणीय
- शेतकऱ्यांना मोठा दिलासा महाराष्ट्र सरकारने अतिवृष्टि पूरग्रस्तांसाठी ३१,६२८ कोटींचे पॅकेज जाहीर..Maharashtra Government Announces Rs 31628 Crore Package for Flood Victims राज्यातील अतिवृष्टीमुळे लाखों


 
							 
							