नांदेड (जिमाका) दि. 4 :- महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांपैकी अजूनही 6 हजार 480 शेतकऱ्यांनी आपले आधार प्रमाणिकरण करुन घेतले नाहीत. यामुळे त्यांना या योजनेचा लाभ पोहचविण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत. या शेतकऱ्यांनी आधार प्रमाणिकरण करुन घेण्यासाठी तात्काळ नजिकच्या सेवा केंद्राला भेट देऊन प्राधान्याने हे काम करणे गरजेचे आहे. यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या तहसिलदारांनी संबंधित बँक, उपनिबंधक यांच्याशी संपर्क साधून अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पोहचवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले. Mahatma Jotirao Phule Shetkari Karjmukti Yojna
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजनेबाबत आज जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली आज आढावा बैठक झाली. यावेळी ते मार्गदर्शन करत होते. या बैठकीसाठी जिल्हा उपनिबंधक अनिल चव्हाण व जिल्ह्यातील सर्व संबंधित बँक अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यात 2 लाख 9 हजार 99 पात्र शेतकऱ्यांनी आपली माहिती बँकांद्वारे पोर्टलवर अपलोड केली आहे. यातील 1 लाख 87 हजार 521 शेतकऱ्यांनी आपले आधार प्रमाणिकरण केले असून उर्वरीत 6 हजार 480 शेतकऱ्यांनी अद्यापही आपले आधार प्रमाणिकरण केले नाही.
बँकांनीही अधिकाधिक सकारात्मक दृष्टिकोण घेऊन शेतकऱ्यांना न्याय दिला पाहिजे. आजही जे पात्र शेतकरी आहेत त्यांना कर्ज मिळत नसल्याच्या तक्रारी व निवेदन आमच्या कार्यालयाला प्राप्त होतात. संबंधित बँक अधिकाऱ्यांनी याबाबत दक्षता घेऊन पात्र शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ वेळेवर न दिल्यास त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या बैठकीस व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जिल्ह्यातील सर्व तहसिलदार, उपनिबंधक यांनी सहभाग घेतला. Mahatma Jotirao Phule Shetkari Karjmukti Yojna
=========================================================================================================
- देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूक निकालांचे कल: भाजपचा बंगाल आणि आसाममध्ये दणदणाट, तमिळनाडूत थलपती विजयचा ‘TVK’ चा धमाकानवी दिल्ली/कोलकाता/चेन्नई, ४ मे २०२६: देशातील पाच राज्ये आणि एक केंद्रशासित प्रदेश –… Read more: देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूक निकालांचे कल: भाजपचा बंगाल आणि आसाममध्ये दणदणाट, तमिळनाडूत थलपती विजयचा ‘TVK’ चा धमाका
- “मैत्रीचा सापळा आणि ३५० अश्लील व्हिडिओ; परतवाड्याच्या अयान अहमदचा ‘विकृत’ चेहरा समोर, संपूर्ण महाराष्ट्र सुन्न!”“The Paratwada Horror: 350 Explicit Videos Found as SIT Probes Ayan Ahmed’s Massive… Read more: “मैत्रीचा सापळा आणि ३५० अश्लील व्हिडिओ; परतवाड्याच्या अयान अहमदचा ‘विकृत’ चेहरा समोर, संपूर्ण महाराष्ट्र सुन्न!”
- शिवराय सर्वांचे, फूट कुणाची? अंजनगाव वादातून महाराष्ट्राला धडा,अनधिकृत पुतळे, जातीय तणाव आणि शिवभक्तीची खरी परीक्षासोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील अंजनगाव खेलोबा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यावरून निर्माण… Read more: शिवराय सर्वांचे, फूट कुणाची? अंजनगाव वादातून महाराष्ट्राला धडा,अनधिकृत पुतळे, जातीय तणाव आणि शिवभक्तीची खरी परीक्षा
- समग्र शिक्षा कंत्राटी कर्मचाऱ्यांचे ३१ दिवसांचे आंदोलन : मुख्यमंत्र्यांच्या आश्वासन पुर्णत्वाची प्रतीक्षा, भर उन्हाळ्यात ३३०० कर्मचारी ‘हक्क’साठी रस्त्यावरमुंबई, ८ एप्रिल २०२६ : महाराष्ट्रातील समग्र शिक्षा अभियानांतर्गत कार्यरत हजारो कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या… Read more: समग्र शिक्षा कंत्राटी कर्मचाऱ्यांचे ३१ दिवसांचे आंदोलन : मुख्यमंत्र्यांच्या आश्वासन पुर्णत्वाची प्रतीक्षा, भर उन्हाळ्यात ३३०० कर्मचारी ‘हक्क’साठी रस्त्यावर
- इंडिया पोस्ट ऑफिस GDS भरती २०२६: सविस्तर माहिती – २८,७४० पदांसाठी अर्ज सुरू, १०वी पास उमेदवारांसाठी मोठी संधी!भारत सरकारच्या संचार मंत्रालयाअंतर्गत भारत पोस्टने (Department of Posts) ग्रामीण डाक सेवक (Gramin… Read more: इंडिया पोस्ट ऑफिस GDS भरती २०२६: सविस्तर माहिती – २८,७४० पदांसाठी अर्ज सुरू, १०वी पास उमेदवारांसाठी मोठी संधी!
