जागतिक युवा कौशल्य दिनानिमीत्त नांदेड कार्यालया तर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन | Organizing various programs on the occasion of World Youth Skills Day by Nanded Office
जागतिक युवा कौशल्य दिवस तांत्रिक, व्यावसायिक शिक्षण प्रशिक्षणाचे महत्त्व आणि स्थानिक आणि जागतिक अर्थव्यवस्थेशी संबंधित व इतर कौशल्यांच्या विकासाबद्दल जनजागृती करण्याच्या उद्देशाने १५ जुलै रोजी साजरा केला जातो. तरुणांना रोजगार, योग्य काम आणि उद्योजकता या कौशल्यांनी सुसज्ज करणे गरजेचे आहे. “१५ जुलै जागतिक युवा कौशल्य दिनानिमीत्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नांदेड कार्यालया तर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.”
World Youth Skills Day is celebrated on 15th July to raise awareness about the importance of technical, vocational education training and development of skills related to local and global economy. Young people need to be equipped with the skills of employment, decent work and entrepreneurship. “On the occasion of World Youth Skills Day on 15th July, various programs were organized by the District Skill Development, Employment and Entrepreneurship Guidance Center, Nanded Office.”
१५ जुलै जागतिक युवा कौशल्य दिनानिमीत्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नांदेड कार्यालयातर्फे
1) किमान कौशल्य विकास कार्यक्रम अंतर्गत केमिसीस लेबोरेटरी सिडको नांदेड या प्रशिक्षण संस्थेत
अ- फार्मसी असिस्टंट
ब- लॅबोरेटरी असिस्टंट या दोन कोर्सच्या प्रशिक्षण तुकडीचे उदघाटन श्रीमती रेणुका तम्मलवार, सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता नांदेड यांचे हस्ते ऑनलाईन करण्यात आले.
2) प्रोजेक्ट उद्यमिता व मुख्यमंत्री महा-आरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम या योजनेच्या सविस्तर माहितीसाठी वेबीनार चे आयोजन करण्यात आले होते, या वेबीनार मध्ये श्री. प्रकाश शेंडे, प्रोग्राम ऑफिसर, प्रोजेक्ट उद्यामिता आणि श्री. इरफान खान, जिल्हा कौशल्य विकास समन्वयक, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता नांदेड यांनी मार्गदर्शन केले.
3) अण्णासाहेब आर्थिक मागास विकास महामंडळ व सुशिल ट्रॅक्टर्स दाभड रोड नांदेड यांच्या संयुक्त विद्यमानाने लाभार्थ्यांना एकूण ०६ ट्रॅक्टर्स चे वितरण श्रीमती रेणुका तम्मलवार, सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता नांदेड यांचे हस्ते करण्यात आले या कार्यक्रमामध्ये श्री. शुभम शेवनकर, जिल्हा समन्वयक अण्णासाहेब आर्थिक मागास विकास महामंडळ नांदेड यांनी महामंडळाच्या विविध योजनांची माहिती दिली
- बीडमधील उमाकिरणचे अल्पवयीन विद्यार्थिनीवर वाईट किरण लैंगिक छळ विनयभंग, पालकांमध्ये संतापबीड, महाराष्ट्र: बीडमधील उमाकिरण खासगी शिकवणी क्लासेस (Umakiran Coaching Classes) सध्या एका गंभीर
- अंतराळात जाणारे दुसरे भारतीय शुभांशु शुक्ला कोण आहेत ?Axiom-4 मिशनसह अंतरिक्षात इतिहास रचणारे पहिले भारतीयमहाराष्ट्र व्हॉईस, २५ जून २०२५ भारतासाठी आजचा दिवस ऐतिहासिक आहे, कारण भारतीय वायुसेनेचे
- महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला; कोकण, पुणे, नाशिकसह अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारामहाराष्ट्र व्हॉइस, २६ जून २०२५ महाराष्ट्रात मान्सूनने जोर धरला असून, राज्यातील अनेक भागांमध्ये
- शैक्षणिक दबावाचा बळी! नीट चाचणीत कमी गुण पडल्याने वडिलांनी मारहाण केली; बारावीची हुशार विद्यार्थिनी साधना भोसले हिचा मृत्यूSangli Tragedy: 12th-Grade Girl Dies After Beating by Father Over NEET Mock Test
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच भेट दिलेला क्रोएशिया हा देश कुठे आहे? काय आहे त्याची ऐतिहासिक माहितीWhere is Croatia, the country that Prime Minister Narendra Modi recently visited? What