राज्यात सोयाबीन पिकाची ९९ टक्के तर कापसाची ८१ टक्के क्षेत्रावर पेरणी – कृषिमंत्री दादाजी भुसे |Seed Planting Of Soyabean & Cottan Crop
मुंबई, दि. 14 : राज्यात प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत खरीप 2021साठी आतापर्यंत 37 लाख 23 हजार शेतकऱ्यांनी अर्ज केले असून उद्या दिनांक 15 जुलै ही योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम मुदत असल्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले. दरम्यान राज्यात सुरु असलेल्या पावसामुळे पेरण्यांना वेग आला असून प्रमुख पिकांच्या पेरणीमध्ये सोयाबीन 99 टक्के तर कापूस पिकाची 81 टक्के पेरणी झाल्याचे कृषिमंत्र्यांनी सांगितले. (Seed Planting Of Soyabean & Cottan Crop)
राज्यात पावसाला सुरुवात झाली असून 304 तालुक्यांमध्ये सरासरीच्या 75 टक्केपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. तर 34 तालुक्यांमध्ये 50 ते 75 टक्के, 14 तालुक्यांमध्ये (नाशिक व नंदुरबार जिल्ह्यातील) 25 ते 50 टक्के तर सुरगाणा आणि नवापूर या दोन तालुक्यांमध्ये सरासरीच्या 25 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे. (Seed Planting Of Soyabean & Cottan Crop)
राज्यात आजपर्यंत 74 टक्के पेरणी झाली असून त्यामध्ये सोयाबीनची पेरणी 99 टक्के झाली आहे. सोयाबीनचे सरासरी क्षेत्र 39 लाख हेक्टर असून 38 लाख हेक्टरवर पेरणी पूर्ण झाली आहे. राज्यात कापूस लागवडीचे सरासरी क्षेत्र 42 लाख हेक्टर असून त्यापैकी 39 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. भात पिकाची लागवड सुरु असून सरासरी क्षेत्राइतकी पेरणी होईल असा अंदाज वर्तविण्यात आला असल्याचे श्री.भुसे यांनी सांगितले. राज्यातील चार जिल्ह्यामध्ये तुलनेने पेरणी कमी झाली असून त्यामध्ये नाशिक 32 टक्के, धुळे 44 टक्के, नंदुरबार 39 टक्के तर गोंदिया 9 टक्के इतकी पेरणी झाली आहे. (Seed Planting Of Soyabean & Cottan Crop) —————–अजय जाधव/विसंअ/१४.७.२०२१
हे ही वाचा————
- स्टार्सचा महासंग्राम! बिग बॉस ६ “रितेश देशमुखचा लयभारी अंदाज! १७ सुपरस्टार्स घरात, कोण जिंकेल १ कोटी?बिग बॉस मराठी ही मराठी भाषेतील सर्वात लोकप्रिय रिअॅलिटी टीव्ही शो आहे, जी
- सावधान! WhatsApp APK स्कॅम: एक क्लिक आणि बँक खाते रिकामे – महाराष्ट्रात वाढत्या तक्रारीप्रिय वाचकांनो, जेव्हा तुम्ही व्हॉट्सअॅपवर विविध नावाने APK File” प्राप्त होतात तेव्हा त्यात
- मुंबईत ठाकरेच पाहिजेत ? ठाकरे बंधू एकत्र येण्याविषय मनोज जरांगे पाटील यांच वक्तव्य ऐन महानगर पालिका निवडणुकीत चर्चेतमुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती
- गोड साखरेची कडू कहानी पत्नीच्या फेसबुक लाईव्ह चालू असताना नवऱ्याचा दुर्दैवी अंत निष्ठुर नियतीने 3 चिमुकल्यांचा बाप तर वृद्ध मायबापाचा आधार हिरावला…“टिचभर पोटाच्या खळगीची भिषण करुण कहानीचा दुर्दैवी अंत” The bitter story of sweet
- दहावी व बारावी बोर्डाच्या परीक्षेत गैरप्रकार खपवून घेतले जाणार नाहीत – जिल्हाधिकारी राहुल कर्डिलेMalpractices will not be tolerated in the 10th and 12th board exams –
——

