तब्बल सहा वर्षीनी समग्र शिक्षा मधील कर्मचाऱ्यानां मानधनात १० टक्के वाढ; कर्मचाऱ्याची सातव्या वेतन आयोगानुसार मागणी

तब्बल सहा वर्षीनी समग्र शिक्षा मधील कर्मचाऱ्यानां मानधनात १० टक्के वाढ; कर्मचाऱ्याची सातव्या वेतन आयोगानुसार मागणी

महाराष्ट्रातील शिक्षण विभागामध्ये महत्त्वाचा प्रकल्प असलेल्या समग्र शिक्षा अंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनामध्ये दहा टक्के पगारात वाढ देण्याचा निर्णय आजच्या मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरमध्ये १६ सप्टेंबर रोजी राज्य मंत्रिमंडळाची बैठक स्मार्ट सिटी सभागृहात संपन्न झाली आजच्या कॅबिनेटमध्ये (Cabinet meeting) मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी मुख्यमंत्री यांनी घेतला. 10 percent salary increase in remuneration of contract employees in Samagra Shiksha


भारत सरकारचा महत्वाचा उपक्रम असलेल्या समग्र शिक्षा अंतर्गत महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषेदच्या अधिनिस्त प्रत्येक जिल्हास्तरावर उपक्रम राबवण्याचे कार्य कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे. राज्यामध्ये शिक्षणाचा अधिकार हा कायदा राबवण्याचे काम याच कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून होत आहे. परंतु मागील सहा वर्षांपासून या कर्मचाऱ्यांच्या पगारांमध्ये वाढ नसल्याने या कर्मचाऱ्यांमध्ये निराश्य निर्माण झालेले होते. 10 percent increase in remuneration for employees in Samagra Shiksha for almost six years; Demand of employee as per 7th Pay Commission

मागील पाच वर्षापासून सदरील कंत्राटी कर्मचारी हे मानधन वाढीसाठी विविध मार्गाने प्रयत्न करत होते. परंतु त्याला यश मिळत नव्हतं अनेक अधिकारी कर्मचारी आणि आमदार यांना निवेदन देऊन सुद्धा मानधनात वाढ झालेली नव्हती. परंतु आज मराठवाड्यात होणाऱ्या कॅबिनेटमध्ये माननीय मुख्यमंत्री यांनी समग्र शिक्षा तील कंत्राटी कर्मचाऱ्यांना दहा टक्के पगार वाढ देऊन सणाच्या तोंडावरती थोडीशी का होईना सहानुभूती या कर्मचाऱ्यांच्या विषयी दाखवली.


सहा वर्ष न झालेल्या पगार वाढीत केवळ दहा टक्के वाढ ही अतिशय अतिशय तोडकी अशी असली तरीही कंत्राटी कर्मचाऱ्यांमधून आशा निर्माण होऊन थोडासा दिलासा देण्याचा यामधून प्रयत्न केलेला दिसतो. तसेच कंत्राटी कर्मचाऱ्यांची मागणी ही मागील सहा वर्षापासून वाढ नसल्यामुळे सातव्या वेतन आयोगानुसार किमान 40 टक्के वाढ मिळावी अशा प्रकारची मागणी कर्मचाऱ्यांमधून होत आहे.व 10 percent increase in remuneration for employees in Samagra Shiksha for almost six years; Demand of employee as per 7th Pay Commission

<

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: लेख Copy Peast करण्यापेक्षा Share करा. News Maharashtra Voice