Help poor Maratha students economicaly | १० वी मध्ये उच्च गुण प्राप्त मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना सारथी मार्फत आर्थिक मदत करा.

माहूर(प्रतिनिधी) , १० वी मध्ये उच्च गुण प्राप्त मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना सारथी मार्फत आर्थिक मदत करा आदी मागणीसह विविध मागण्याचे निवेदन ज्ञानेश्वर चौधरी यांनी ना. जयंत पाटील यांना सादर केले. मराठा समाजाचे शासकीय नौकरी व शैक्षणिक आरक्षण मा. सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्याने समाजात प्रचंड असंतोष पसरला आहे.

आर्थिक दृष्ट्या अत्यंत मागास समाज असून आरक्षणामुळे हतबल झाला आहे. किमान मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात प्रगतीकरिता १० वी मध्ये उच्च गुण मिळविणाऱ्या मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना MH-CET, JEE, NEET या सारख्या परीक्षेची तयारी करण्यासाठी कोचिंग क्लासेस साठी आर्थिक भरीव मदत करून सारथी मार्फत देऊन दिलासा देणे आवश्यक आहे.

तेव्हा सारथी मार्फत १० वी मध्ये उच्च गुण मिळविणाऱ्या मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना MH-CET, JEE, NEET या सारख्या परीक्षेची तयारी करण्यासाठी कोचिंग क्लासेस साठी आर्थिक भरीव मदत करण्याची मागणी केली आहे.

Leave a Comment

error: लेख Copy Peast करण्यापेक्षा Share करा. News Maharashtra Voice