फळपीकांचा विमा उतरवा, शेतकऱ्यांना कृषी विभागाचे अवाहन | Take out insurance of fruit farming
Online Team | प्रधानमंत्री फळपीक विमा योजना Pradhan Mantri Fruit Crop Insurance Scheme सुरु झाली आहे. कृषी विभागाने अधिसुचीत केलेल्या महसुल मंडळातील शेतकऱ्यांनी मृग बहारातील सिताफळ, डाळिंब, चिकु, मोसंबी, लिंबु, पेरु, संत्रा या फळपिकांचे शेतकऱ्यांनी विमा उतरवावा असे अवाहन करण्यात आले आहे.
फळपिकांचे अतीपाऊस, वादळ, गारपीट व इतर नैसर्गिक कारणाने नुकसान झाले तर शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी शासनाकडून मृग बहारासाठी पुर्नरचित हवामानावर आधारीत फळपीक विमा योजना राबवण्याला शासनाने मान्यता दिली आहे. योजनेत यंदा बीड जिल्ह्यासाठी संत्रा, मोसंबी,लिंबु, पेरु, सिताफळ, डाळिंब, चिकु, याफळपिकांचा समावेश आहे. योजनेत सहभागासाठी कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना सहभागी होता येईल. योजनेत सहभाग हा एच्छिक आहे. Take out insurance of fruit farming, Department of Agriculture appeals to farmers
मात्र जे कर्जदार विहीत मुदतीत सहभागी न होण्याबाबत बॅंकाना कळवणार नाहीत असे शेतकऱी योजनेत सहभागी आहेत असे समजून सबंधित शेतकऱ्यांचा विमा हप्ता विहीत पद्धतीने कर्ज खात्यातून कपात केला जाईल. त्यासाठी अंतीम तारखेच्या किमान सात दिवस आधी बॅकेला हप्ता न कापण्याबाबत कळवणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी आधारकार्ड, किंवा आधार नोंदणी प्रत, सातबारा, बॅकपासबुकीची प्रत, तसेच फळपिकांचे जियो टॅगिंग केलेले फोटो व अधिसुचित असल्याबाबतचे स्वयंघोषणापत्र, सादर करुन विमा योजनेत सहभागी होण्याचे अवाहन कृषी विभागाने केले आहे. Take out insurance of fruit farming, Department of Agriculture appeals to farmers
अशी आहे फळपीक विमा भरण्याची अंतीम तारीखसंत्रा, मोसंबी, पेरु, चिकु, लिंबू ः 30 जून, – डाळिंब ः 14 जुलै, सिताफळ ः 31 जुलै हेक्टरी हप्ता ः संत्रा ः 4 हजार, मोसंबी ः 6 हजार रुपये, पेरु व चिकु प्रत्येकी ः 3 हजार रुपये, लिंबु7 हजार रुपये, डाळिंब 6 हजार 500 रुपये व सिताफळ 3 हजार 300 रुपये.
हे ही वाचा ः
- सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवी आपल्या वडिलांचे डॉक्टर बनण्याचे स्वप्न पूर्ण करणारवैभवी संतोष देशमुख यांनी नीट (NEET) 2025 परीक्षेत 551 गुण मिळवून उत्तीर्ण होत
- Ahmedabad Plane Crash | गुजरातमधील अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे विमान कोसळले, मोठी जीवित हानी ची शक्यताअहमदाबाद, १२ जून २०२५: गुजरातमधील अहमदाबाद येथे आज दुपारी एक मोठा विमान अपघात
- PM Kisan Samman Nidhi Yojana 20th Installment |प्रधानमंत्री किसान सन्मान निधि 20व्या हप्त्याची संभाव्य तारीखप्रधानमंत्री किसान सन्मान निधि योजनेअंतर्गत (PM Kisan Samman Nidhi Yojana) देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांना
- Monsoon Update| महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार: आजपासून पुढील चार दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाजपुणे, १२ जून २०२५: भारतीय हवामान विभाग (IMD) आणि पुणे वेधशाळेच्या ताज्या अंदाजानुसार,
- बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी आमरण उपोषणस्थळी मनोज जरांगे यांची भेटअमरावती, 11 जून 2025: मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी बच्चू