पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपने महाविकास आघाडीला दणका,आवताडेंचा विजय

पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपने महाविकास आघाडीला दणका,आवताडेंचा विजय

पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत (Pandharpur mangalwedha bypoll result) भाजपने महाविकास आघाडीला दणका दिला. भाजपचे समाधान आवताडे (Samadhan Autade win) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे भगीरथ भालके (Bhagirath Bhalke) यांचा पराभव केला. राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या आणि राष्ट्रवादीसह भाजपनेही प्रतिष्ठेच्या केलेल्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी आज पार पडली. यामध्ये भाजप उमेदवर समाधान आवताडे हे  3733 मतांनी विजयी झाले. त्यांच्या या विजयामुळे भाजपमध्ये चैतन्य निर्माण झाले असून यापुढेसुद्धा भाजप अशाच प्रकारे महाविकास आघाडीशी दोन हात करेल, असे भाजप नेत्यांकडून सांगितले जात आहे.

 

या निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके विजयी होणार की भाजपचे उमेदवार समाधान आवताडे बाजी मारणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. अखेर अटीतटीच्या या लढतीत समाधान आवताडे यांनी बाजी मारली.

<