सामाजिक अधिकारिता शिबिर, दिव्यांगांना खा.हेमंत पाटील यांचे हस्ते उपयोगी साहित्य वाटप.|Social Empowerment Camp
माहूर (प्रतिनिधी )
माहूर येथील जि.प.च्या केंद्रीय प्राथमिक शाळेच्या प्रांगणात दि.6 जुलै रोजी दु.3 वा. संपन्न झालेल्या Social Empowerment Camp सामाजिक अधिकारीता शिबिरात खा.हेमंत पाटील यांचे हस्ते विशेष गरजा असणारया दिव्यांगांना उपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले. सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय (सामाजिक न्याय व अधिकार व अपंग व्यक्तीचे सक्षमीकरण विभाग), समाजातील शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या हितांचे संरक्षण आणि सबलीकरण करण्यासाठी धोरणे आणि कार्यक्रम तयार करणे आणि मजबूत करणे या संदर्भात सूचना देणे ही आहे. Department of Social Justice and Empowerment and Department of Empowerment of Persons with Disabilities, Ministry of Social Justice and Empowerment
सामाजिक अधिकारीता शिबिर Social Empowerment Camp या भारत सरकारच्या या उपक्रमा अंतर्गत अपंग व्यक्तीचे सक्षमीकरण करण्यासाठी राबविणयात येत आहे. सदरील कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोप करतांना खा.हेमंत पाटील म्हणाले की,आज पावेतो विविध शिबिरातून 15,000 दिव्यांगाची तपासणी करण्यात आली असून 10,000 व्यक्तींना त्याचा लाभ मिळणार असल्याचे आश्वासन दिले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलतांना ज्योतीबा खराटे यांनी दिव्यांग बंधूंना गरजू वस्तु मिळवून दिल्याबद्दल खा.हेमंत पाटील यांचे ऋण व्यक्त केले. पं.स.चे गटविकास अधिकारी युवराज मेहेत्रे यांनी माहूर तालुक्यातील 306 लाभधारकांना बॅटरीवरील सायकलचे व 113 लाभधारकांना अन्य उपयोगी साहित्याचे वाटप केले जाणार असल्याची माहिती प्रास्ताविकातून दिली.
या Social Empowerment Camp शिबिराला पं.स.च्या सभापती आश्विनीताई पाटील,नगराध्यक्षा शीतल जाधव,उपसभापती उमेश जाधव,एकात्मिक बालविकास अधिकारी विशालसिंह चौहान,पं.स.सदस्य नामदेव कातले,निलाबाई राठोड,तालुका प्रमुख सुदर्शन नाईक,संदेश केराम,युवानेते यश खराटे, आ.भीमराव केराम यांचे स्वीय सहाय्यक प्रकाश कुडमेते,विकास कपाटे,निरधारी जाधव,दिपक कांबळे,जितु चोले,महागांवचे तालुका प्रमुख प्रमोद भरवाडे,सुनील गरड, मुख्याध्यापक पंजाबराव शिंदे, बालाजी वाघमारे,अभिषेक जयस्वाल,आदिवासी नेते संजय पेंदोर यांचेसह दिव्यांग बांधव,असंख्य शिवसैनिक व पं.स.चे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन एस.एस.पाटील यांनी केले. Department of Social Justice and Empowerment and Department of Empowerment of Persons with Disabilities, Ministry of Social Justice and Empowerment
या ही बातम्या व लेख वाचा——–
- “मैत्रीचा सापळा आणि ३५० अश्लील व्हिडिओ; परतवाड्याच्या अयान अहमदचा ‘विकृत’ चेहरा समोर, संपूर्ण महाराष्ट्र सुन्न!”“The Paratwada Horror: 350 Explicit Videos Found as SIT Probes Ayan Ahmed’s Massive Blackmail
- शिवराय सर्वांचे, फूट कुणाची? अंजनगाव वादातून महाराष्ट्राला धडा,अनधिकृत पुतळे, जातीय तणाव आणि शिवभक्तीची खरी परीक्षासोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील अंजनगाव खेलोबा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यावरून निर्माण झालेला
- समग्र शिक्षा कंत्राटी कर्मचाऱ्यांचे ३१ दिवसांचे आंदोलन : मुख्यमंत्र्यांच्या आश्वासन पुर्णत्वाची प्रतीक्षा, भर उन्हाळ्यात ३३०० कर्मचारी ‘हक्क’साठी रस्त्यावरमुंबई, ८ एप्रिल २०२६ : महाराष्ट्रातील समग्र शिक्षा अभियानांतर्गत कार्यरत हजारो कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या दीर्घकाळाच्या
- इंडिया पोस्ट ऑफिस GDS भरती २०२६: सविस्तर माहिती – २८,७४० पदांसाठी अर्ज सुरू, १०वी पास उमेदवारांसाठी मोठी संधी!भारत सरकारच्या संचार मंत्रालयाअंतर्गत भारत पोस्टने (Department of Posts) ग्रामीण डाक सेवक (Gramin Dak
- ताणतणावाचे व्यवस्थापन ते शिक्षणात AI, PFMS, आणि सुरक्षा मंत्र ! जालना जिल्हा परिषदेच्या मुख्याध्यापकांसाठी ‘बूस्टर’ कार्यशाळाजालना, दि. ७ फेब्रुवारी २०२६ – जिल्हा परिषद जालना, शिक्षण विभाग (प्राथमिक) यांच्या वतीने

