शिवसेनेसोबत एकत्र येण्यास तयार, पण आम्ही सकारात्मक बोललो की अग्रलेख येतो.
ONLINE TEAM | शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेलं पत्र अचानक समोर आल्यानं राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या पत्रात सरनाईक यांनी शिवसेनेनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी जुळवून घ्यावं असं मत व्यक्त केलं आहे. या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला गोंजारण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी म्हटलं, जर उद्धव ठाकरे सरनाईकांच्या पत्रावर विचार करणार असतील तर आमचे पक्षश्रेष्ठी देखील त्याचा विचार करतील. पुण्यात पत्रकारांशी बोलताना पाटील यांनी ही भूमिका मांडली. (Uddhav Thackeray considers Pratap Sarnaik letter we are ready Chandrakant Patil)
चंद्रकांत पाटील म्हणाले, “आम्ही शिवसेना-भाजप पुन्हा एकत्र येण्याबाबत सकारात्मक काही बोललं की सामनात पुन्हा अग्रलेख लिहून येईल की यांचं सरकार नाही म्हणून यांच्या पोटात दुखतंय, यांना झोप लागतं नाही. म्हणून अशा विषयावर आम्ही म्हणणं काही बरोबर नाही. पण स्वतःच शिवसेनेचे आमदार आणि नेते प्रताप सरनाईक यांनी उद्धव ठाकरे यांना विनंती केली आहे. उद्धवजींनी त्यांच्या विनंतीचा विचार केला तर आमचे पक्षश्रेष्ठी देखील विचार करतील.” अठरा महिन्यांपासून आम्ही हेच सांगत होतोप्रताप सरनाईकांना जे वाटतंय तेच खरं म्हणजे आम्ही १८ महिन्यांपूर्वी घसा कोरडा होईपर्यंत सांगत होतो.
ज्यांच्याविरुद्ध लढण्यासाठी बाळासाहेब ठाकरेंनी आयुष्य घालवलं त्यांच्या मांडीला मांडी लावून कुठे बसता. त्यांची जर बेसिक थेअरीच अल्पसंख्यांकांचं लांगूलचालन करणं असेल तर अल्पसंख्यांकांचं लांगूलचालन आम्ही करणार नाही, या मुद्द्यावरच शिवसेना मोठी झाली. आमचे नेते १८ महिन्यांपूर्वीच सांगत होते की, काँग्रेससोबतची तुमची युती अशास्त्रीय आहे. तुमचे विचार, कार्यपद्धती एक नाहीत. पण सत्ता हा एक असा लोहचुंबक असतो जो सर्व विसरायला लावून खेचतो. पण एखाद्या नेत्यानं निर्णय केला आणि तो मान्य करत करत जगणं याच्या काही मर्यादा असतात, असंही पाटील यांनी म्हटलं आहे.
शिवसेनेला राष्ट्रवादीपासून फारकत घेण्याचा सल्ला”पण आता जर शिवसेनेत अशी अस्वस्थता असेल. सरनाईकांनी आपल्यावर कारवाई होणार आहे, याच्यातून वाचण्यासाठी त्यांनी हे पत्र लिहिलं असेल हे गरजेचं नाही. पण एक सच्चा शिवसैनिक म्हणून मनापासून त्यांना वाटतं असेल की हे आता फार झालं. पण तरीही आता शिवसेनेनं पुढील निवडणुकीपर्यंत जायचचं का? कारण शिवसेनेचा जो बालेकिल्ला होता त्या ठिकाणी सध्या राष्ट्रवादीवाचे विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे आम्ही राष्ट्रवादीसोबत जाऊ या संजय राऊत यांच्या म्हणण्याला काही अर्थ नाही” अशा शब्दांत चंद्रकांत पाटलांनी शिवसेनेला राष्ट्रवादीपासूनही फारकत घ्यावी असाच अप्रत्यक्ष सल्लाही दिला.
हे ही वाचा
- इंडिया पोस्ट ऑफिस GDS भरती २०२६: सविस्तर माहिती – २८,७४० पदांसाठी अर्ज सुरू, १०वी पास उमेदवारांसाठी मोठी संधी!भारत सरकारच्या संचार मंत्रालयाअंतर्गत भारत पोस्टने (Department of Posts) ग्रामीण डाक सेवक (Gramin Dak Sevak – GDS) भरती २०२६ साठी अधिकृत
- ताणतणावाचे व्यवस्थापन ते शिक्षणात AI, PFMS, आणि सुरक्षा मंत्र ! जालना जिल्हा परिषदेच्या मुख्याध्यापकांसाठी ‘बूस्टर’ कार्यशाळाजालना, दि. ७ फेब्रुवारी २०२६ – जिल्हा परिषद जालना, शिक्षण विभाग (प्राथमिक) यांच्या वतीने आज येथील यशवंतराव चव्हाण सांस्कृतिक सभागृह येथे
- बिग बॉस मराठी ६: दिव्या शिंदेची धक्कादायक हकालपट्टी! हिंसक भाषा आणि धमकीमुळे घराबाहेरमुंबई, ७ फेब्रुवारी २०२६: कलर्स मराठीवरील लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘बिग बॉस मराठी’ सीझन ६ मध्ये एक मोठा वाद निर्माण झाला आहे.

