ताणतणावाचे व्यवस्थापन ते शिक्षणात AI, PFMS, आणि सुरक्षा मंत्र ! जालना जिल्हा परिषदेच्या मुख्याध्यापकांसाठी ‘बूस्टर’ कार्यशाळा
जालना, दि. ७ फेब्रुवारी २०२६ – जिल्हा परिषद जालना, शिक्षण विभाग (प्राथमिक) यांच्या वतीने आज येथील यशवंतराव चव्हाण सांस्कृतिक सभागृह येथे मुख्याध्यापकांसाठी एकदिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद जालना यांच्या २ फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या बैठकीतील सूचनेनुसार हे प्रशिक्षण घेण्यात आले.
या कार्यशाळेत जिल्ह्यातील PM श्री शाळा, आदर्श शाळा आणि उपक्रमशील मुख्याध्यापक यांना प्राधान्याने आमंत्रित करण्यात आले होते. तसेच प्रत्येक केंद्रातून (गट) कमीत कमी एक मुख्याध्यापक सहभागी होण्याचे निर्देश देण्यात आले होते. सकाळी १० वाजता उपस्थिती नोंदणी सुरू झाली असून, प्रशिक्षणाचे सत्र नेमके सकाळी ११ वाजता सुरू झाले आणि संध्याकाळी ४ वाजेपर्यंत चालले.
कार्यशाळेत खालील महत्त्वाचे विषय शिकवण्यात आले:
- ताणतणावाचे व्यवस्थापन (११:०० ते ११:३०) – मार्गदर्शक: श्री. संजय कांयंदे उपशिक्षणाधिकारी जालना
मुख्याध्यापकांना दैनंदिन कामातील तणाव कमी करण्याच्या व्यावहारिक पद्धती शिकवल्या गेल्या.
- मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा व अभिमान (११:३० ते १२:३०) – मार्गदर्शक: श्रीमती विनया वडजे
शाळेची सुंदरता, स्वच्छता आणि अभिमान वाढवण्यासाठीच्या योजना व उपक्रमांची सविस्तर माहिती देण्यात आली.
- कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) विषयी माहिती (१२:३० ते १:१५) – मार्गदर्शक: श्री. श्रीकृष्ण निहाळ
शालेय शिक्षणात AI चा वापर कसा करता येईल, याबाबत आधुनिक माहिती आणि उदाहरणे दिली गेली.
- आर्थिक साक्षरता व PFMS (१:१५ ते २:००) – मार्गदर्शक: श्री. प्रकाश साळवे (लेखाधिकारी) व श्री. भाऊसाहेब नेटके (लेखा लिपिक)
शाळांच्या आर्थिक व्यवहारात पारदर्शकता, PFMS पोर्टलचा वापर आणि आर्थिक साक्षरतेचे महत्त्व समजावून सांगितले.
दुपारचे जेवण व विश्रांतीनंतर (२:०० ते २:४५) शेवटचे सत्र:
- सुरक्षा मंत्र (३:०० ते ४:००) – मार्गदर्शक: श्री. आयुष्य नोपाणी (अतिरिक्त पोलीस अधीक्षक, जालना) व सायबर सिक्युरिटी श्री संजय सोनवणे पोलीस क्रायम ब्रांच जालना
शाळेतील विद्यार्थी, शिक्षक व परिसरातील सुरक्षा उपाय, आणीबाणीची तयारी आणि पोलीस विभागाशी समन्वय याबाबत मार्गदर्शन केले.
शिक्षणाधिकारी (प्राथमिक) सौ. संगिता भागवत यांच्या नेतृत्वाखाली ही कार्यशाळा अतिशय यशस्वीपणे पार पडली. मुख्याध्यापकांनी उत्साहाने सहभाग घेतला असून, विविध विषयांवरील चर्चा व प्रश्नोत्तर सत्रे उपयुक्त ठरली. हे प्रशिक्षण मुख्याध्यापकांच्या क्षमता वाढवण्याबरोबरच शालेय व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरले आहे.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमामुळे शिक्षण क्षेत्रात सकारात्मक बदल घडवण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
सदरील प्रशिक्षणाचे नियोजन समग्र शिक्षा जालना एपीओ श्री शिंदे प्रभाकर, रायमल सर, डॉ सुनिल मावकर जिल्हा समन्वयक अर्जुन पवार, राजेश ठाकूर जिल्हा संगणक ऑपरेटर प्रशांत सोरटी वरिष्ठ लेखा लिपिक राहुल महिंद्रकर तसेच जिल्हा परिषदेचा इतर सहयोगी स्टाफ यांनी यशस्वीपणे केले.

