आरोग्यज्ञानविज्ञान

Yoga |Naukasana| Weight loss | वजनवाढीने त्रस्त आहात ? मग नियमित करा नौकासन

बदलत्या काळाप्रमाणे आपल्या आहार आणि विहार या दोघांमध्येही बदल झाला आहे. घरी तयार केलेले पौष्टिक व सकस पदार्थ सोडून आपला कल फास्टफूडकडे वळला आहे. चवीने रुचकर आणि चमचमीत वाटणारे हे पदार्थ डोळे आणि जीभ यांना कायमच आकर्षित करत असतात. परंतु, हे पदार्थ कितीही छान वाटत असले तरीदेखील त्याचे शरीरावर होणारे परिणाम हे गंभीर आहेत.

आज अनेकजण मधुमेह, कोलेस्ट्रॉल, वाढतं वजन या समस्यांनी त्रस्त आहेत. म्हणूनच या समस्यांवर मात करायची असेल तर नियमितपणे योग किंवा व्यायाम करणं गरजेचं आहे. विशेष म्हणजे वजन कमी करण्यासाठी योगासनांमधील नौकासन हे आसन अत्यंत प्रभावी ठरत आहे. हे आसन नियमित केलं तर वाढलेलं वजन नियंत्रणात येतं. सोबतच शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यासही मदत करतं. (yoga-poses-naukasana-for-weight-loss)

नौकासनाचे फायदे-
१. ओटीपोट आणि मांड्यांमधील स्नायू बळकट होतात.
२. पचनसंस्थेतील रक्ताभिसरणाची क्रिया सुरळीत होते.
३. हात व पाय यांचे स्नायू बळकट होतात.
४. पोटावरील अतिरिक्त चरबी कमी होते.
५. खांदे, मान, पार्श्वभाग यांचे स्नायू मजबूत होतात.
६. वजन नियंत्रणात राहते.
७. शरीराचं संतुलन राखण्यास मदत मिळते.

नौकासन करण्याची योग्य पद्धत
नौकासन करण्यासाठी प्रथम पाठीवर झोपावे. त्यानंतर दोन्ही हात, डोके आणि पाय एका सरळ रेषेत वर उचलावे. आपले पाय जमिनीपासून ४५ अंश कोनात वर उचलावेत. आणि, शरीराचा वरचा भाग पायांसोबत कमरेत काटकोन करेल अशा पद्धतीने उचलावा. (हे करत असताना तुमच्या शरीराची स्थिती एका नौकेप्रमाणे भासत असेल.)

हे ही वाचा——————————————————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Site Statistics
  • Today's visitors: 28
  • Today's page views: : 29
  • Total visitors : 504,592
  • Total page views: 531,350
Site Statistics
  • Today's visitors: 28
  • Today's page views: : 29
  • Total visitors : 504,592
  • Total page views: 531,350
error: लेख Copy Peast करण्यापेक्षा Share करा. News Maharashtra Voice