Widow; I mean, she’s not weak | विधवा ; म्हणजे ती अबला नसते रे ! – वंदना संतोष भोसले

Widow; I mean, she’s not weak | विधवा ; म्हणजे ती अबला नसते रे ! – वंदना संतोष भोसले

अग्नी भोवती सात फेरे घेऊन ती सासरचा उंबराठा ओलाडून येते सौभाग्यवती ठरते,पण
तिचा पतीच्या चितेचा अग्नी नंतर ती विधवा विधवा म्हणून तिचावर धार्मिक संस्कृतीक बहिष्कार टाकला जातो आज हीं आणि विशेष म्हणजे हा बहिष्कार टाकणाऱ्या स्त्रीयाच असतात, लहानपणा पासून परंपरा संस्कृती पालन म्हणून देवाला हळदी कुंकू वाहिले कि तिचा कपाळी लागते, सगळे रंग तिचा साठी शुभ…असतात,
लग्न झाल्यावर सौभाग्यवती ठरते ती, लक्ष्मी म्हणून सन्मान होतो तिचा…..
खाना नारळाची ओटीचीं हकदार ती असते.. हळदी कुंकू सन्मान सोहळे तिचा साठी असतात,

पण पतीच्या निधन होताच तिचा आयुष्याचें रंग सगळे समाज ओरबाडून घेतो तिला विधवा म्हणून नाव देतो, जनावर जशी तुटून पडावी तस समाज तिचा पासून तीच आनंद रंग ओरबडून घ्यायला पुढे आसतो
पतीच निधन होताच तिचा बांगड्या फोडतात तीच कुंकू पुसतात तीची जोडवी काढतात हें सगळे ओरबाडू घेयला स्त्रीयाच असतात बर का?.
असं म्हणतात स्त्रीच स्त्रीच दुःख समजू शकते पण आशा वेळी स्त्रीया परंपरा संस्कृती रिवाज म्हणून एका स्त्री कडून ओरबाडू घेतात..
जें तिचा लग्नात समाज रीतीने तिच्यावर चढवलेला साज शृंगार आसतो.
ती विधवा म्हणजे चारचौघी पेक्षा वेगळी बहिष्कृत अशुभ स्त्री ठरते ती,
लग्न आसो वा कुठलाहीं समारंभ हळदी कुंकू तिचा साठी अशुभ ठरते, रंग तिचा साठी समाजाने ठरवून दिलेत तेच.

पती निधना नंतर दुःखाच जबाबदारीच ओझं घेऊन ती चालताना समाजाने पेरलेल्या काट्यातुन चालायचं असते एका विधवेला मग ती अबाला कशी..? एकटी स्त्री संघर्ष करते लढते तेव्हा ती अधिक कठोर कणखर शक्तीशाली बनते, तिचा मधील दुबळेपणा निघून गेलेला आसतो
पतीच्या आधारावर जगणारी पतीच्या निधना नंतर
ती एकटीच जीवनाचा प्रवास करते तेव्हा येणाऱ्या प्रसंगात निर्णय घेऊन आव्हान पेलणारी ती अबला कशी ठरते?
आई आणि बाबा दोन्हीचीं भूमिका पेलणारी ती विधवा स्त्री अबाला कशी असेल,?

ज्या दिवशी पतीच निधन होत त्या दिवशीच ती समाजासाठी एकटी व अबाला ठरते.. आता कसं होणार हीच म्हणून केविलवाणा नजरा तिचा कडे रोखून पाहत असतात…,
पण दुःखाचा डोंगर पेलून ती पुन्हा उभी राहते लेकरासाठी परिवाराला उभ करण्यासाठी ती एक शक्तिशाली स्त्री म्हणून…,
ती अबला विधवा म्हणून तीची अवहेलना करू नका तिचा दुःखावर डागण्या देऊ नका…तिला जगू द्या तुमच्या मधील एक म्हणून….

🙏

– वंदना संतोष भोसले

हे खालील लेख वाचा————————

Related posts

Leave a Comment