Van Vibhag Bharti वनविभाग भारती 2023 महाराष्ट्र राज्य पोस्ट विषयी थोडक्यात आणि महत्वाची माहिती या वनरक्षक भरतीसाठी इच्छुक विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी खूपच महत्त्वाचे आहे. वनरक्षक भरतीचे वेळापत्रक जाहीर झालेले असून यासाठी प्रत्येक जिल्ह्याला किती जागा आहेत ती आकडेवारी जाहीर केली आहे. त्यामध्ये या भरतीसाठी 9640 पदे मंजूर करण्यात आली आहेत त्याचबरोबर नाशिक मधील 630 पदांचा यामध्ये समावेश केला आहे ही परीक्षा लेखी असणार आहे व या परीक्षेमध्ये एकूण चार विषयांचा समावेश असणार आहे.
Van Vibhag Bharti 2023 Maharashtra: संदर्भात शासन स्थरावर कार्यवाही सुरु झाली आहे. Van Vibhag Bharti 2023 अधिसूचना 1 मार्च 2023 रोजी जाहीर करण्यात आली आहे. या जाहिरातीनुसार विविध वनवृत्तमध्ये लेखापाल (Accountant) पदाच्या एकूण 127 रिक्त जागा जाहीर करण्यात आले आहे. वनसंरक्षक व इतर विविध संवर्गातील रिक्त पदांसाठी देखील लवकरच Van Vibhag Bharti 2023 ची अधिसूचना जाहीर होईल. लिपिक संवार्गीय पदे आता MPSC मार्फत भरल्या जाणार असल्याने लिपिक पदे सोडून बाकी सर्व पदे Van Vibhag Bharti 2023 भरण्यात येणार आहे. या लेखात आपण Van Vibhag Bharti 2023 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहे.
जिल्हा नुसार जागांची संख्या आपल्याला खाली दिलेली आहे.
गडचिरोलीमध्ये 979 जागा
अमरावतीमध्ये 965 जागा
नाशिक मध्ये 630 जागा
यवतमाळ मध्ये 661 जागा
धुळ्यामध्ये 738 जागा
पुण्यामध्ये 395 जागा
ठाण्यामध्ये पंधराशे दहा जागा यामध्ये पदसंख्या वन वृत्त निहाय
नाशिक 630
गडचिरोली 979
अमरावती 965
यवतमाळ 661
औरंगाबाद 747
धुळे 738
पुणे 395
ठाणे 1510
कोल्हापूर 754
एकूण 9640 दिलेले आहेत.