UNESCO WorldHeritage : जागतिक वारसास्थळांच्या संभाव्य यादीमध्ये शिवरायांच्या 14 गडकोटांचा समावेश

युनिस्को ने संपुर्ण जगातील काही प्राचिन ऐत्यासिक मह्त्त्व असलेले स्थ्ळे जागतिक वारसा म्हणुन घोषीत केलेले आहेत. त्या मध्ये यापुर्वीच महाराष्ट्रात चार स्थळे आहेत. आता नव्याने युनिस्कोची टीम जगभर सर्वे करुन काही नवीन स्थ्ळे जागतिक वारसास्थळांमध्ये समाविष्ट करत असते.

UNESCO जागतिक वारसास्थळ संभाव्य यादीमध्ये महाराष्ट्रातील किल्ल्यांचा समावेशकोरोनाच्या खडतर काळात महाराष्ट्राला सुखावणारी आनंदाची बातमी मिळाली आहे. ‘मराठ्यांची लष्करी दुर्गस्थापत्य शृंखला ‘ (Serial Nomination of Maratha Military Architecture in Maharashtra) या थीमअंतर्गत १४ किल्ल्यांचा UNESCO च्या जागतिक वारसास्थळ संभाव्य यादीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. एक मोठं स्वप्न पूर्ण होण्याच्या पायरीवर आपण उभे आहोत. खऱ्या अर्थाने आता काम चालू झाले आहे.लिंक : https://whc.unesco.org/en/tentativelists/6533/२०१६ साली खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातील किल्ले जागतिक वारसा यादीत समाविष्ट व्हावेत म्हणून मी आणि प्रज्ञेश ने मोहीम हातात घेतली होती . आमच्या प्रयत्नांना मूर्त स्वरूप देणारी व्यक्ती म्हणजे खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती होय. २०१६ साली दिल्लीतील तज्ज्ञांशी बैठका असतील , महाराष्ट्रात सांस्कृतिक मंत्र्यांशी तत्कालीन मुख्यमंत्र्यांना याचे महत्व समजावणे असेल, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांचा दौऱ्यांना शासकीय स्वरूप देणे असेल. असे अगदी आजतागायत मे २०२१ पर्यंत जेथे या मोहिमेला अडचण निर्माण झाली ती दूर करण्यात राजेंनी मुख्य समन्वयक म्हणून पुढाकार घेतला.दुर्गमहर्षी प्रमोद मांडे सरांचे हे स्वप्न होते महाराष्ट्रातील किल्ले जगातील नकाशावर यावेत. त्यांच्या हयातीत त्यांनी यासाठी अव्याहत प्रयत्न केले. दोन्ही पाहणी दौर्यासाठी मार्गदर्शक म्हणून त्यांनी पुढाकार घेतला होता. देशातील अनेक वास्तूंचा जागतिक वारसास्थळात समावेश करण्यात मार्गदर्शन करणाऱ्या डॉ शीखा जैन यांनी अगदी २०१६ पासून सर्व तांत्रिक बाबींमध्ये राज्य सरकार व पुरातत्व खात्याचे मार्गदर्शन केले. अगदी मार्च २०२१ ला सुद्धा महाराष्ट्राचा अहवाल त्यांनी केंद्र सरकार तर्फे मंजूर करून घेतला. सर्व पाहणी दौरे , सरकारी बैठका यांमधील मुख्य दुवा म्ह्णून अर्चनाने २०१६ पासूनच सहभाग घेतला. अगदी कोरोनाच्या काळात सुद्धा अनेकदा मुंबईला जाऊन तिने सांस्कृतिक मंत्री अमित देशमुखांची भेट घेतली. नवीन सरकार आल्यावरसुद्धा प्रज्ञेश ने पुढाकार घेऊन त्याचे जवळचे मित्र रोहितदादा पवार यांच्या मदतीने शरद पवार साहेब , आदित्य ठाकरे जी आणि अमित देशमुख जी यांच्या भेटी घडवून आणून या प्रोजेक्ट चे महत्व समजावून सांगितले. गेल्या ५ वर्षात असा एक दिवस गेला नसेल कि आम्हा दोघांची या विषयावर चर्चा नाही. पण हि चर्चा फक्त चर्चेपुरतीच मर्यादित राहिली नाही याचा मनापासून आनंद आहे.माझे जवळचे मित्र आणि पत्रकार प्रसाद पवार यांनी प्रत्येक घडामोडीची दखल घेऊन त्याची बातमी केली व महाराष्ट्रभर या मोहिमेचा जागर केला.राज्य पुरातत्व खात्याचे माजी संचालक श्री पाटील सर व वर्तमान संचालक श्री तेजस गर्गे सर यांनी सलग पाठपुरावा करून फक्त एखादा किल्ला घेण्यापेक्षा सिरीयल नॉमिनेशन ची थीम कायम ठेवली त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार या प्रक्रियेतील पहिला टप्पा आपण पार केला आहे, अजून २ वर्षे हि प्रोसेस चालणार असून एखाद्या वास्तूच्या युनेस्को वर्ल्ड हेरिटेज (जागतिक वारसा) नामांकना साठी साधारण प्रक्रिया अशी असते.१. ज्या वास्तू अथवा किल्ल्यासाठी नामांकन द्यायचे आहे त्याचे जागतिक वारसामूल्य निश्चित करून तसे पटवून दयावे लागते. त्यानंतर तो किल्ला प्रार्थमिक यादीत (टेंटेटिव्ह लिस्ट) मध्ये समाविष्ट करावा लागतो.२. अंतिम नामांकनासाठी निवड झाल्यावर किल्ल्याची माहिती , संवर्धन अहवाल, माहितीसंच (डॉसियर) आणि साईट मॅनेजमेंट प्लॅन सांस्कृतिक मंत्रालय,केंद्र सरकार कडे पाठवावा लागतो३. केंद्रातून हिरवा कंदील मिळताच भारतातर्फे किल्ल्याचे नामांकन वर्ल्ड हेरिटेज सेंटर (युनेस्को) ,पॅरिस येथे मूल्यमापन आणि मंजुरी साठी पाठवले जाते४. यानंतर युनेस्को ची ICOMOS (International Council ofMonuments and Sites) हि सल्लागार समिती भारतात येऊन त्या किल्ल्याला भेट देते व किल्ल्याचे मूल्यांकन करून अहवाल बनवते.५. ICOMOS ने दिलेल्या अहवालावरून आणि केंद्र सरकारने पाठवलेल्या कागदपत्र आणि माहितीसंचाच्या (डॉसियर ) आधारावर युनेस्को त्या किल्ल्याची निवड करते आणि किल्ल्याला वर्ल्ड हेरिटेज चा दर्जा प्राप्त होतो.इतर टप्पेसुद्धा आपण यशस्वीपणे पार करू आणि महाराष्ट्रातील किल्ले जागतिक नकाशावर आणू शकू यात शंका नाहीसंभाव्य यादीमधील किल्ले :१. रायगड २. राजगड ३. शिवनेरी ४. तोरणा ५. साल्हेर ६. मुल्हेर ७. रांगणा ८. अंकाई टंकाई ९. सिंधुदुर्ग १०. कासा ११. कुलाबा १२. सुवर्णदुर्ग १३. खांदेरी १४. लोहगड

यापुर्वी घोषीत जागतीक वारसा महाराष्ट्र यादी

महाराष्ट्रात सर्वाधिक म्हणजे चार स्थळे आहेत. (अजंठा येथील गुंफा व वेरुळची लेणी (१९८३), घारापुरीची लेणी (१९८७) व छत्रपती शिवाजी स्टेशन, मुंबई (२००४) दिल्ली, मध्य प्रदेश, राजस्थान व उत्तर प्रदेश या राज्यांची प्रत्येकी तीन स्थळे यादीत आहेत. १३ राज्यांचे एकही स्थळ यादीत नाही. . त्यात जवळजवळ सर्वच राज्यांना स्थान मिळाले आहे. दिल्लीचा कुतुब मिनार परिसर, हुमायूनचा मकबरा व लाल किल्ला जागतिक वारसा यादीत आहे. मध्य प्रदेशातील भीमबेटकाच्या अश्मकालीन गुंफा, सांचीचा स्तूप व खजुराहोची मंदिरे सामील आहेत. राजस्थानातील केवलदेओ राष्ट्रीय उद्यान, जयपूरची जंतरमंतर ही खगोल प्रयोगशाळा तसेच किल्ले (चित्तोड, गाग्रोन, जैसलमेर, कुंभलगड, अंबर, रणथंबोर) यांचा समावेश आहे. उत्तर प्रदेशातील आग्र्याचा किल्ला, फतेहपूर सिक्री व ताजमहाल यादीत आहेत.

दोन स्थळे असलेली राज्ये आसाम मधील काझीरंगा व मानस ही जंगली प्राण्यांची अभयारण्ये यादीत आहेत. गुजरातमधील रानी की वाव व चंपानेर-पावागड पुरातत्व परिसर यादीत आहे. कर्नाटकातील विजयनगर साम्राज्याची राजधानी हम्पी व पट्टडकल येथील चालुक्यांची मंदिरे यादीत समाविष्ट आहेत. तामिळनाडूतील चोलांचा जीताजागता वारसा म्हणजे तंजावूर, गंगाईकोंडचोलपुरम व दोरयसम येथील मंदिरे तसेच पल्लावांचा वारसा म्हणजे महाबलीपुरम यादीत आहे.

#UNESCO #WorldHeritage

Leave a Comment

error: लेख Copy Peast करण्यापेक्षा Share करा. News Maharashtra Voice