कुठलंही सरकार काम करायचं म्हटलं की, ‘आधार कार्ड’ आलंच! Aadhaar आधार कार्डाशिवाय कुठलंच काम आता होत नाही, इतकं नक्की. आपल्या मोबाईलच्या साध्या सिमकार्ड खरेदी पासून ते आता अगदी कोरोना लसीकरणापर्यंत ‘आधार कार्ड’च आपल्याला आधार ठरतं. कुठलीही सरकारी योजना आधार कार्डाशिवाय पूर्णच होत नाही. आधार कार्ड म्हणजे आपली अधिकृत ओळख असते.
ठिकठिकाणी आपल्याला आधार कार्ड लागतंच! ते जर हरवलं अथवा गहाळ झालं तर आपली बरीचशी आवश्यक अशी कामे निश्चितपणे अडतात. या आधार कार्डमध्ये काही चुका असल्या तरीही बराच घोळ होतो. एखाद्या ठिकाणी कागदोपत्री कामासाठी गेल्यास त्याठिकाणी आपले आधार कार्ड नसेल तर मोठा खोळंबा होतो. मात्र, आता या सगळ्याच तक्रारी दूर होण्याच्या मार्गावर आहेत. चुटकीसरशी यातली एक नि एक तक्रार आता दूर होणार आहे.
To experience the new and updated features and services in the #mAadhaar app, uninstall any previously installed versions. Download the latest version from: https://t.co/62MEOeR7Ff (Android) https://t.co/GkwPFzuxPQ (iOS) pic.twitter.com/U3vOVovDUR
— Aadhaar (@UIDAI) June 8, 2021
या सगळ्याच समस्या आपण घरबसल्या कुठेही न जाता सहजपणे सोडवू शकणार आहोत. याचं कारण आहे mAadhaar App! हे ऍप जर आपल्याकडे नसेल तर ते आत्ताच डाऊनलोड करा. जर ते आधीपासूनच असेल तर ते अपडेट करा. कारण आता या ऍपचे नवे अपडेट आपला वेळ वाचवणारं ठरणार आहे.
UIDAI ने mAadhaar App चे नवीन अपडेट आणले आहे. या अपडेटमुळे अनेक गोष्टी सहजसोप्या होणार आहेत. मात्र, हे ऍप घेताना आपल्याला बनावट आणि खोट्या ऍप्सपासून सावधान राहणं गरजेचं आहे. हे ऍप कुठूनही डाऊनलोड करु नका. ते डाऊनलोड करण्यासाठी UIDAI ने दिलेल्या अधिकृत लिंकवरुनच आधारचे हे खरे ऍप आपल्याला डाऊनलोड करता येईल.
महत्वाच्या बातम्या ===========
- बेंगलुरूमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरु (RCB) च्या आयपीएल 2025 विजयाच्या जल्लोषाला गालबोट, चेंगराचेंगरीत 11 जणांचा मृत्यूबेंगलुरूमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरु (RCB) च्या आयपीएल 2025 विजयाच्या जल्लोषाला गालबोट लागले आहे. मंगळवारी, 3 जून 2025 रोजी … Read more
- IPL 2025 RCB Winning The Title| रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा ऐतिहासिक विजय, प्रथमच जेतेपद!हमदाबाद, 3 जून 2025: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) ने आयपीएल 2025 च्या अंतिम सामन्यात पंजाब किंग्ज (PBKS) ला … Read more
- IPL 2025 Final | रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरू विरुद्ध पंजाब किंग्स, कोण होईल विजेता ?IPL 2025 Final: Royal Challengers Bangalore vs Punjab Kings – Who has a higher chance of winning? इंडियन … Read more
- NEET UG 2025 Provisional Answer Key | राष्ट्रीय चाचणी संस्था (NTA) 5 जूनपर्यंत आक्षेप नोंदवाराष्ट्रीय चाचणी संस्था (NTA) ने नीट यूजी 2025 साठी तात्पुरती उत्तर की जाहीर केली आहे. ज्या उमेदवारांनी यंदाच्या … Read more
- Khan sir wedding | लोकप्रिय यूट्यूबर आणि शिक्षक खान सरांचे लग्न चर्चेतखान सर, जे भारतातील एक लोकप्रिय यूट्यूबर आणि शिक्षक म्हणून ओळखले जातात, यांनी मे 2025 मध्ये गुपचूप लग्न … Read more