मराठवाड्याच्या सर्वागिण विकासासाठी विविध रस्ते विकासासह हैद्राबाद-नांदेड ग्रीन फिल्ड मार्गासाठी प्रयत्नशील- सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण जिमाका, दि.१७:-मराठवाड्याच्या सर्वागिण विकासाचा मार्ग हा मुंबई, पुणेसह जवळ असलेल्या हैद्राबाद महानगराच्या रस्ते विकासातून अधिक समृध्द होणार आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे स्वत: मराठवाडा विकासासाठी दक्ष असून या भागातील विकासाच्या प्रकल्पांना त्यांनी प्राधान्य दिलेले आहे. नांदेड-जालना समृध्दी महामार्गाला त्यांनी तात्काळ मंजुरी देवून ही कटिबध्दता अधिक दृढ केली असल्याचे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले. नांदेड महानगरपालिकेच्या वतीने आयोजित शहरातील महात्मा फुले मार्केट पुनर्विकास कामाच्या शुभारंभ प्रसंगी ते…
Read MoreTag: Ashok Chavan
या कारणांमुळे अशोक चव्हाणांच्या घरावर केली दगडफेक, तरुणीने केले स्पष्ट
नांदेड : सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्या नांदेड येथील आनंद निलयम या निवासस्थानावर दगडफेक झाल्याची घटना आज सकाळी घडली होती. यामुळे मोठी खळबळ उडाली होती. मात्र, पोलिसांना याचा गांभीर्याने तपास करत दगडफेक करणाऱ्या युवतीला ताब्यात घेतले आहे. ही तरुणी आज बुधवारी सकाळी पावणे अकराच्या सुमारास अशोक चव्हाण यांच्या घराजवळ आजारी आईला व्हिलचेअरवर घेऊन आली आणि ‘अशोक चव्हाण आहेत का? मला त्यांना भेटायचे आहे’ म्हणून सुरक्षा रक्षकांना विचारणा केली. सुरक्षा रक्षकांनी ‘साहेब नाहीत’ म्हटल्यानंतर चिडलेल्या तरुणीने गोंधळ घालत निवासस्थानावर दगडफेक केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळावर धाव…
Read MoreAshok Chavan’s letter to all party MPs for Maratha reservation
मुंबई, दि. २४ : महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदारांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आरक्षणाची ५० टक्के मर्यादा शिथिल करण्याची मागणी करून पाठपुरावा करावा आणि मराठा आरक्षणासाठी योगदान व सहकार्य द्यावे, असे आवाहन सार्वजनिक बांधकाममंत्री तथा मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केले आहे. श्री. चव्हाण यांनी शनिवारी राज्यातील सर्व पक्षांच्या लोकसभा व राज्यसभा सदस्यांना ईमेल तसेच कुरियरमार्फत पत्र पाठवले असून, या पत्रात त्यांनी मराठा आरक्षण देण्यासाठी ५० टक्के आरक्षण मर्यादा शिथिल करण्याची आवश्यकता विषद केली आहे. मराठा आरक्षण प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने ५ मे २०२१ रोजी दिलेला निकाल व त्या अनुषंगाने निर्माण…
Read Moreअशोक चव्हाण दिल्लीत, मराठा आरक्षणासाठी नेत्यांच्या भेटीगाठी |Ashok Chavan in Delhi For Maratha Reservation
नवी दिल्ली : मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी काँग्रेस नेते आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी कंबर कसली आहे. संसदेच्या अधिवेशनात मराठा आरक्षणावर चर्चा होऊन त्यावर तोडगा निघावा म्हणून अशोक चव्हाण दिल्लीत आले आहेत. त्यांनी काँग्रेससह शिवसेना नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या. मराठा आरक्षणाचा मुद्दा संसदेत लावून धरण्याची विनंतीही त्यांनी या नेत्यांना केली आहे. (ashok chavan meet mallikarjun kharge and sanjay raut to maratha reservation issue) अशोक चव्हाण एकटेच दिल्लीत आले आहेत. दोन दिवसांपासून ते दिल्लीत आहेत. संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू असल्याने याच अधिवेशनात मराठा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला जावा, असा त्यांचा प्रयत्न…
Read Moreमुंबई-औरंगाबाद-नांदेड-हैद्राबाद Bullet Train उभारा..! – Ashok Chavan’s demand to Chief Minister Uddhav Thackeray
मुंबई, दि. १८ जून २०२१ – सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन महाराष्ट्रातील बुलेट ट्रेनच्या नियोजनात मुंबई- औरंगाबाद- जालना- नांदेड- हैद्राबाद असा मार्ग केंद्र सरकारकडे प्रस्तावित करण्याची मागणी केली आहे . Ashok Chavan’s demand to Chief Minister Uddhav Thackeray चव्हाण यांनी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र दिले असून, या पत्रात त्यांनी सदरहू मार्गाची आवश्यकता व या प्रकल्पातील सुलभता निदर्शनास आणून दिली आहे. बुलेट ट्रेन प्रकल्पांची अंमलबजावणी करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर नॅशनल हायस्पिड रेल कॉर्पोरेशनची स्थापना झाली असून, पुढील काळात मुंबई ते नागपूर तसेच पुणे, सोलापूर मार्गे मुंबई…
Read More