गावाप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा “मिशन आपुलकी” उपक्रम अत्यंत मोलाचा- जिल्हाधिकारी डॉ. इटनकर

गावाप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा “मिशन आपुलकी”  उपक्रम अत्यंत मोलाचा- जिल्हाधिकारी डॉ. इटनकर

नांदेड जिल्ह्यातील लोकाभिमुख उपक्रमाचा मापदंड म्हणून “मिशन आपुलकी” ओळखली जाईल– जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर नांदेड, (जिमाका) दि. 6 :- नांदेड जिल्हा हा भौगोलिकदृष्ट्या जेवढा व्यापक आहे तेवढाच तो गुणवत्तेनेही समृद्ध आहे. केंद्र व राज्य सरकारच्या सेवेमध्ये नांदेड जिल्ह्यातील भूमिपुत्रांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. अनेकजण भारतीय प्रशासकीय सेवेत आहेत. प्रत्येक व्यक्तीला आपल्या गावाप्रती ओढ असून गावासाठी काही तरी करण्याची भावना शेतकऱ्यांपासून सर्वांची आहे. या सर्वांच्या श्रद्धा व भावनांना व्यापक कर्तव्याच्या पूर्तीत रुपांतरीत करता यावे यासाठी “मिशन आपुलकी” हा उपक्रम अत्यंत मोलाचा आहे. सर्वांच्या सहभागाचे प्रतीक म्हणून “मिशन आपुलकी” च्या नावाने नांदेड…

Read More

या कारणांमुळे अशोक चव्हाणांच्या घरावर केली दगडफेक, तरुणीने केले स्पष्ट

या कारणांमुळे अशोक चव्हाणांच्या घरावर केली दगडफेक, तरुणीने केले स्पष्ट

नांदेड : सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्या नांदेड येथील आनंद निलयम या निवासस्थानावर दगडफेक झाल्याची घटना आज सकाळी घडली होती. यामुळे मोठी खळबळ उडाली होती. मात्र, पोलिसांना याचा गांभीर्याने तपास करत दगडफेक करणाऱ्या युवतीला ताब्यात घेतले आहे. ही तरुणी आज बुधवारी सकाळी पावणे अकराच्या सुमारास अशोक चव्हाण यांच्या घराजवळ आजारी आईला व्हिलचेअरवर घेऊन आली आणि ‘अशोक चव्हाण आहेत का? मला त्यांना भेटायचे आहे’ म्हणून सुरक्षा रक्षकांना विचारणा केली. सुरक्षा रक्षकांनी ‘साहेब नाहीत’ म्हटल्यानंतर चिडलेल्या तरुणीने गोंधळ घालत निवासस्थानावर दगडफेक केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळावर धाव…

Read More

शहीद जवान सुधाकर शिंदे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

शहीद जवान सुधाकर शिंदे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

नांदेड (जिमाका), दि. 22 :- नांदेड जिल्ह्याचे भूमिपुत्र सहाय्यक समादेशक शहीद सुधाकर राजेंद्र शिंदे यांच्या बलिदानाने सर्वांवर शोककळा पसरली आहे. Martyr Sudhakar Shinde was cremated in a state funeral त्यांच विरमरण हे देशासाठी आहे. अत्यंत मेहनतीने आणि स्वकष्टाने त्यांनी विविध आव्हानांवर मात करुन सहाय्यक समादेशक पदापर्यंत प्रगती साध्य केली. देशाच्या वैभवाचे प्रतिक असणाऱ्या लाल किल्ल्यापासून अनेक ठिकाणी त्यांनी सुरक्षितेची जबाबदारी चोखपणे बजावली. छत्तीसगडमधील नारायणपूर येथे नक्षलवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात त्यांना वीरमरण आले. त्यांच्या कुटुंबावर कोसळलेल्या दु:खात महाराष्ट्र शासन सहभागी असल्याचे सांगून राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण…

Read More

Corona | आजपासून नांदेड प्रथमस्तर अनलॉक होण्यास सुरुवात, हे निर्बंध शिथिल केले.

Corona | आजपासून नांदेड प्रथमस्तर अनलॉक होण्यास सुरुवात, हे निर्बंध शिथिल केले.

नांदेड, दि. 7 :- नांदेड जिल्ह्यातील कोविड बाधितांचे प्रमाण शासन आणि नागरिकांनी घेतलेल्या काळजीमुळे सद्यस्थितीत नियंत्रणात आले आहे. याचबरोबर कोविड उपचारात ऑक्सिजन बेड्सचे व्यापलेले प्रमाणही कमी झाले आहे. जिल्ह्यातील ही आकडेवारी लक्षात घेवून शासनाने नांदेड जिल्ह्याचा कोविड निर्बंध उठविण्याच्या पहिल्या स्तरामध्ये समावेश केला आहे. यामुळे जिल्ह्यातील निवडक सेवा, आस्थापना व उपक्रमांना मर्यादेत सुट देण्याचा निर्णय जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी घेतला. स्तर एक नुसार निर्बंध शिथीलीकरणाबाबत त्यांनी पुढील आदेश दिले आहेत. जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालय व सुट असलेल्या खाजगी कार्यालये हे शंभर टक्क्यांसह सुरु राहतील. खेळ क्रीडा प्रकार नियमित सुरु…

Read More