रमिज राजा पाकीस्तानी माजी खेळाडूने PCB ला खडसावले “BCCI जगातील श्रीमंत बोर्ड आहे, PCBने त्यांच्या नादाला लागू नये”

रमिज राजा पाकीस्तानी माजी खेळाडूने PCB ला खडसावले “BCCI जगातील श्रीमंत बोर्ड आहे, PCBने त्यांच्या नादाला लागू नये”

नवी दिल्ली : सध्या ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर टी-20 विश्वचषकाचा थरार रंगला आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात टी-20  विश्वचषक स्पर्धेतील 23 ऑक्टोबरला होणाऱ्या सामन्यापूर्वी  दोन्ही देशांमधील वातावरण तापले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (BCCI) वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवारी मुंबईत पार पडली आणि त्याचे चटके दूर पाकिस्तानला बसले. BCCI सचिव जय शाह (Jay Shah) यांनी बैठकीनंतर भारतीय संघ आशिया चषक स्पर्धेसाठी पाकिस्तानात जाणार नसल्याचे जाहीर केले आणि ही स्पर्धा तटस्थ ठिकाणी खेळवण्यात यावी अशी मागणी केली. त्यावर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) लांबलचक पत्र काढून टीका केली. पीसीबीने दिलेल्या प्रत्युत्तरावर आता पाकिस्तानच्या माजी खेळाडूने सडकून टीका केली आहे. 

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने बीसीसीआयला प्रत्युत्तर देताना जय शहा यांच्या नावर टीका केली आणि 2023 मध्ये भारतात होणार्‍या एकदिवसीय विश्वचषकातून बाहेर पडण्याची धमकी दिली. अशातच पाकिस्तानी संघाचा माजी फिरकीपटू दानिश कानेरियाने म्हटले आहे की, पीसीबीने बीसीसीआयशी संघर्ष करणे टाळला पाहिजे कारण ते जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड आहे आणि इतर क्रिकेट संस्थांवर त्यांचा बराच प्रभाव आहे. एकूणच कानेरियाने या मुद्द्यावरून पीसीबीचे कान टोचले आहेत. 

पाकिस्तानच्या माजी खेळाडूने पीसीबीला सुनावले बीसीसीआय आणि पीसीबीमधील वादावर बोलताना कानेरियाने म्हटले, “बीसीसीआय हे खूप चांगल्या पद्धतीने करू शकते. पीसीबी यावर कोणताही आक्षेप घेऊ शकत नाही कारण बीसीसीआय हे जगातील सर्वात श्रीमंत बोर्ड आहे आणि इतर सर्व बोर्ड त्यांच्याशी सहमत असणे साहजिकच आहे.

इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड हे सर्व बोर्ड बीसीसीआयकडे आहेत कारण त्यांना माहित आहे की बीसीसीआयशिवाय काहीही होऊ शकत नाही.” कनेरियाने त्याच्या यूट्यूब चॅनेलवरून संवाद साधताना पीसीबीला घरचा आहेर दिला. तसेच भारतीय बोर्ड खूप शक्तिशाली असून त्यांच्या तुलनेत पाकिस्तानी बोर्ड खूपच कमकुवत आहे. बीसीसीआयच्या म्हणण्याशी त्यांना सहमती द्यावीच लागेल

आणि वाईट वाटून घेण्याची काहीही गरज नाही, कारण हे दोन्ही देशांमधील राजकीय परिस्थितीमुळे निर्माण झाले आहे, असे कानेरियाने अधिक म्हटले. 

Related posts

Leave a Comment