महाराष्ट्र

शिक्षक भरती घोटाळात एका IAS अधिकाऱ्याला अटक

पुणे: राज्यात परीक्षांबबत अनेक घोटाळे समोर येत आहेत. सुरुवातीला आरोग्य विभागाच्या परीक्षेत झालेला घोटाळा त्यानंतर म्हाडा पेपरफूटी प्रकरण आणि आता गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेला शिक्षक भरती परीक्षेचा घोटाळा. या प्रकरणी धक्कादायक माहिती अशी की यात एका अधिकाऱ्याला देखील पोलिसांनी अटक केली आहे. सुशील खोडवेकर असे अटक केलेल्या अधिकारचे नाव असून ते भारत प्रशासकीय सेवेत कार्यरत आहेत.

शिक्षक भरती (TET) प्रक्रियेत सुशील खोडवेकर (Sushil Khodwekar) यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. खोडवेकर हे महाराष्ट्र कृषी खात्यात सहाय्यक सचिव म्हणून कार्यरत आहेत. नुकतेच त्यांच्याकडे शालेय शिक्षण आणि खेळ विभागाचे (शालार्थ) सहाय्यक सचिव (Deputy Secretary) ही जबाबदारी दिली गेली होती. सायबर पोलिसांच्या (Cyber Police) एका पथकाने त्यांना ठाण्यातून अटक करत शनिवारी कोर्टासमोर हजर केले.

सुशील खोडवेकर यांच्यासह आतापर्यंत ४० आरोपींना अटक करण्यात आली आहे. यामधील काही आरोपी हे म्हाडा, आरोग्य भरती मध्येही सहभागी आहेत. २०१८ आणि २०२० मध्ये झालेल्या शिक्षक भरती परीक्षेस सहभागी उमेदवारांपैकी ७,८८० उमेदवारांचे गुण विशेष पद्धतीने वाढवून त्यांना उत्तीर्ण केले गेले होते. पोलिस या सर्व उमेदवारांची यादी पुढील कारवाईसाठी महाराष्ट्र शासनाकडे पाठविणार आहे.

Sushil Khodwekar Arrested By Pune Police In Tet Exam Scam

=====================

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Site Statistics
  • Today's visitors: 24
  • Today's page views: : 24
  • Total visitors : 505,750
  • Total page views: 532,531
Site Statistics
  • Today's visitors: 24
  • Today's page views: : 24
  • Total visitors : 505,750
  • Total page views: 532,531
error: लेख Copy Peast करण्यापेक्षा Share करा. News Maharashtra Voice