सातारा: महाराष्ट्र शासनाचा, किराणा बाजारात वाईन विक्रीचा निर्णय सध्या मोठ्या वादात सापडला असून, भाजप पक्ष त्यावर रोज सडकून टीका करत आहे. त्यातच आता कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी देखील निशाणा साधत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. ‘सुप्रिया सुळे आणि पंकजा मुंडे दारू पितात’ असे विधान करत त्यांनी नव्या वादाला सुरुवात केली आहे. तसेच त्यांनी मला विचारावे, मी त्यांचे आव्हान स्वीकारून पुराव्यासहीत सिद्ध करून दाखवायला तयार असल्याचे त्यांनी म्हंटले.
महाराष्ट्र सरकारने किराणा दुकानात वाईन विक्रीचा निर्णय घेतल्याने आम्ही, संपूर्ण महाराष्ट्रात उग्र स्वरूपाचे आंदोलन उभे करू असा इशारा देखील त्यांनी महाविकास आघाडी सरकारला दिला. शासनाला आम्ही आंदोलनातून वाईन विक्रीचा निर्णय मागे घ्यायलाच लावू असे पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले.
पुढे बोलताना तात्या म्हणाले, सर्वच मोठ्या पुढाऱ्यांची मुले दारू पितात. राजकारणात येण्याअगोदर सुप्रिया सुळे रस्त्यात दारू पिऊन पडत होत्या, तुम्हाला त्यांचे शेकडो फोटो मिळतील. आता यावर मविआ सरकार, सुप्रिया सुळे आणि पंकजा मुंडे काय प्रतिक्रिया देतात ते पहाणे महत्वाचे ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या:
- कोण आहे IAS पूजा खेडकर? व्हीआयपी मागण्या करणाऱ्या आयएएस प्रशिक्षणार्थीं चर्चेत
- Who Is Manu Bhaker।कोन आहे मनु भाकर पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये इतिहास रचणारी भारताची स्टार नेमबाज
- समग्र शिक्षा अभियानांतर्गत कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेण्याबाबत अभ्यास समिती-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत निर्णय
- ZP Teacher Transfer | जि. प.शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्या बाबत सुधारित शासन निर्णय
- पंतप्रधान नरेंद्र मोदी 3.0 72 मंत्र्यांसह, मंत्रिमंडळात 9 नवीन चेहरे | Modi 3.0 With 72 Ministers Takes Oath, 9 New Faces In Cabinet