राज्य हादरले, संरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण व हत्या महाराष्ट्रातील बिहार बीड; जिल्ह्यात गुन्हेगारी कोण पोसतय? State shook, kidnapping and killing of Sarpanch Santosh Deshmukh Bihar Beed in Maharashtra; Who is feeding crime in the district? Beed Sarpanch Kidnapped And Murder In Kej बीडमध्ये देखील अशीच एक घटना उघडकीस आली आहे. केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष पंडितराव देशमुख यांचे काही जणांनी अपहरण करत त्यांची हत्या केली आहे. त्यांचा मृतदेह दैठणा गावाच्या जवळ (ता. केज) आढळल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना सोमवारी (दि ९) दुपारी ३.३० च्या सुमारास घडली. संतोष देशमुख असं हत्या झालेल्या सरपंचाचं नाव असून त्यांचं येथील टोलनाक्याजवळून अपहरण झालं होतं.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संतोष देशमुख हे त्यांच्या कारमधून त्यांचा मामेभाऊ शिवराज लिंबराज देशमुख यांच्यासोबत मस्साजोगकडे जात होते. यावेळी डोणगाव टोलनाका येथे त्यांची कार काही अज्ञात व्यक्तिंनी अडवली. त्यांना त्यांच्या कारमधून उतरवत आरोपींनी बेदम मारहाण केली. यानंतर अपहरणकर्त्यांनी देशमुख यांच्या गाडीची तोडफोड केली. यानंतर संतोष देशमुख यांना आरोपींनी त्यांच्या कारमध्ये बसवत केजच्या दिशेने निघून गेले. या प्रकरणी देशमुख यांच्या सोबत आलेल्या मामेभावाने पोलिसांत तक्रार दिली. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हे सोमवारी दुपारी साडेतीन वाजेच्या दरम्यान केज येथून मस्साजोगकडे जीपमधून ( क्रमांक एम एच 44 / बी 3230 ) निघाले. उमरी शिवरातील टोल नाक्याजवळ पाच ते सहा जणांनी त्यांची जीप अडविली. गाडीच्या काचा फोडून सरपंच संतोष देशमुख यांना बाहेर काढत काठीने मारहाण करून अपहरण केले.
मारकऱ्यांच्या दोन जीप देशमुख यांना घेऊन केजच्या दिशेने गेल्या. त्यानंतर जीपचालक शिवराज देशमुखने केज पोलीस ठाणे गाठून सरपंच संतोष देशमुख यांचे अज्ञात ६ जणांनी मारहाण करत अपहरण केल्याची फिर्याद दिली. गुन्हा दाखल करून पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी तातडीने दोन पथकांची स्थापना करून तपासाचे आदेश दिले. दरम्यान, सोमवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास बोरगाव दैठना या रस्त्यावर सरपंच संतोष देशमुख यांचा मृतदेह आढळून आल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
तीन आरोपी पकडल्याची माहितीसोमवारी सायंकाळी गुन्हा नोंद होताच पोलिसांनी दोन पथकाच्या माध्यमातून तपास सुरू केला. आरोपी जीपमधून वाशीकडे जात असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी नांदुर ते वाशी रस्त्यावर पाठलाग केला. तसेच वाशी पोलिसांना माहिती देऊन पुढे रस्ता अडविण्यात आला. यामुळे जीप मध्येच उभी करून आरोपी पसार झाले. मागावर असलेल्या पोलिसांनी पाठलाग करून तीन आरोपींना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. इतर आरोपींचा शोध सुरू आहे.