मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्तेंना (Adv. Gunratna Sadavarte) पोलिसांकडून अटक करण्यात आलीय. सरकारी कामात अडथळा आणला आणि कटात सामील असल्याचा ठपका ठेवत ही अटक झाली आहे. शरद पवारांच्या (Sharad Pawar) घराबाहेर एसटी कर्मचाऱ्यांनी (ST Workers) जे आक्रमक आंदोलन केले. त्याच प्रकरणी गुणरत्न सदावर्तेंच्या अडचणी वाढल्या आहेत. शुक्रवारी दुपारी जे आक्रमक आंदोलन झालं त्या आंदोलनानंतर राज्याच्या राजकारणातला पारा चांगलाच चढला होता. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरत गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करत होते. तसेच या प्रकरणावर तीव्र राजकीय प्रतिक्रिया उमटत होत्या. गुणरत्न सादवर्ते यांनी गुरूवारी कोर्टाने निर्णय दिल्यानंतर आझाद मैदानात जे भाष्य केलं. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या भावना भडकल्याचा आरोप होतं आहे. आझाद मैदानातून त्यांनी बारामतीत येऊन आंदोलन करू आम्हाला थांबवून दाखवा असा थेट इशारा शरद पवारांना दिला होता. (Gunaratna Sadavarten arrested by police; Accused of being mastermind of attack by ST workers at Pawar’s residence)
सदावर्तेंना पोलिसांनी का ताब्यात घेतलं ?
- मुंबईत पवारांच्या निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांचा हल्ला
- सिल्व्हर ओकवर चप्पल फेकत संपकऱ्याचं आंदोलन
- सदावर्तेंच्या भाषणामुळे पवारांच्या घरी हल्ला, असा पोलिसांचा निष्कर्ष
- सदावर्तेंच्या भाषणाच्या क्लीप पोलिसांच्या हाती- सूत्र
- दावर्तेंच्या भाषणामुळं संपकरी आक्रमक झाल्याची पोलिसांना शंका
सदावर्तेंवर कोणता गुन्हा ?
- कलम 353 आणि कलम 120 ब
- कलम 353- सरकारी कामात अडथळा
- कलम 120 ब- कटात सहभाग
कोण आहेत गुणरत्न सदावर्ते, 10 गोष्टींमधून समजून घ्या!
- गुणरस्त सदावर्ते वकील आहे. त्यांनी मराठा आरक्षणाच्या विरोधात कायदेशीर लढा दिला होती. तेव्हापासून ते चर्चेत होते.
- एस कर्मचाऱ्यांच्या आंदोलन गुणरत्न सदावर्ते यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.
- गुणरत्न सदावर्ते हे मूळचे नांदेडचे आहेत. त्यांचं शिक्षण औरंगाबाद आणि मुंबईत झालं आहे.
- वेगवेगळ्या सामाजिक आंदोलनांमध्ये आणि चळवळींमध्ये सदावर्ते यांचा सहभाग असायचा.
- सम्यक विद्यार्थी आंदोलन ही संघटना सदावर्ते यांनी सुरु केली होती. या संघटनेच्या माध्यमातून सदावर्ते यांनी विविध विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडले होते.
- सदावर्ते हे आता मुंबईत वकिली करतात. त्यांनी भारतीय राज्यघटनेवर पीएचडी घेतलेली आहे.
- सदावर्ते दोनवेळा मॅटच्या बार असोसिएशनचे अध्यक्ष राहिलेले आहेत. तसंच ते बार काऊन्सिलच्या शिखर परिषदेवरही होते.
- गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्नीचं नाव जयश्री पाटील आहे. त्यांना एक मुलगी असून तिचं नाव झेन आहे.
- गुणरत्न सदावर्ते यांनी रोहित वेमुला प्रकरणात चौकशीची मागणी करणारी याचिकाही केलेली होती.
- गुणरत्न सदावर्ते यांच्यावर 2018 साली हल्लाही करण्यात आलेला होता. मराठी आरक्षणाविरोधातील याचिकेच्या सुनावणीनंतर हा हल्ला करण्यात आला होता. तसंच त्यांना शिवीगाळही करण्यात आली होती.
अजित पवार काय म्हणाले?
पवार साहेबांच्या कामाची पद्धत सर्वांना माहीत आहे. एवढे मोठे धाडस करण्यामागे नक्की कोणतरी मास्टर माईंड असला पाहिजे. त्याला शोधून काढू. हे कुणाच्याच बाबतीत घडता कामा नये. याच्या शेवट पर्यंत जाऊन महाराष्ट्रात दूध का दूध पानी का पानी करू, असा थेट इशारा अजित पवारांनी दिला आहे. तसेच हे पोलिसांचेही एकप्रकारे अपयश आहे. इतरांना याची माहिती असली पाहिजे. पोलीस यंत्रणेला याची माहिती असायला हवी होती. 12 तारखेला आंदोलन करणार असं काहीजण बोलेल होते, असे म्हणत त्यांनी पोलिसांवरही ताशेरे ओढले आहेत. (Gunaratna Sadavarten arrested by police; Accused of being mastermind of attack by ST workers at Pawar’s residence)
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचाही इशारा
याच आंदोलनावरू मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही कडकडीत इशारा दिला आहे. राज्य शासन एसटी कर्मचाऱ्यांच्या हितासाठी सर्वतोपरी पाऊले उचलत आहे. मुंबई उच्च न्यायालयाला शासनाने काय काय निर्णय घेतले आहेत त्याची व्यवस्थित माहिती दिली आहे. न्यायालय देखील या सर्व प्रकरणी लक्ष ठेवून असून यासंदर्भातील निर्णय देखील त्यांनी दिला आहे, मात्र आज ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्या घरावर झालेल्या या अचानक हल्ल्याची घटना अत्यंत निंदनीय असून अशा प्रकारे जबाबदार असणाऱ्यांवर तसेच हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलिस अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. नेत्यांच्या किंवा त्यांच्या कुटुंबियांच्या घरांवर हल्ले करणे हा पायंडा महाराष्ट्राने कधीही पाडलेला नाही असेही ते म्हणतात. (Gunaratna Sadavarten arrested by police; Accused of being mastermind of attack by ST workers at Pawar’s residence)