शिवराज्याभिषेक दिन हा शिवस्वराज्य दिन, स्थानिक स्वारज्य संस्थेत होणार साजरा – महाराष्ट्र सरकार
६ जून शिवराज्याभिषेक सोहळा दिन राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेत “शिवस्वराज्य दिन” म्हणून साजरा होणार Shivswarajyabhishek Din 6th June will be celebrated in the state as ‘Shivswarajya Din’ शककर्ते छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेच राज्य निर्माण केले होते. या स्वराज्यात ‘शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला ही हात लावायचा नाही’ हा हुकूम तंतोतंत पालन होत, परस्त्री मातेसमान मानले जात, सर्व धर्मांच्या ग्रंथ आणि प्रार्थना स्थळे सुरक्षित होती. माणसांना माणूस म्हणून जगण्याच पुर्ण स्वातंत्र्य होत अशा लोककल्याणकारी राजांनी राज्याभिषेक करुन घेऊन जगमान्य होण्यासाठी रयत शिवरायांपाशी आग्रही होती.
या सुवर्ण सोहळ्याची नोंद जगभरात झाली होती.
रयतेच्या राज्याच गौरवार्थ स्मरण होण्यासाठी यंदाच्या वर्षापासून ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ६ जून हा “शिवराज्याभिषेक दिन” हा “शिवस्वराज्य दिन” म्हणून साजरा करावयाचा आहे. या निमित्ताने भगवा ध्वज या पध्दतीचा (सिंगल पताका) उभा करायचा आहे. Shivswarajyabhishek Din 6th June will be celebrated in the state as ‘Shivswarajya Din’
तरी सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच / ग्रामसेवक, पंचायत समितीचे सभापती/ गटविकास अधिकारी, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष / मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी शासन आदेशाचे पालन करावे ही विनंती. Shivswarajyabhishek Din 6th June will be celebrated in the state as ‘Shivswarajya Din’
शासन आदेशात नगरपंचायत, नगरपालिका आणि महानगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्थांंचा उल्लेख केला नाही तरी नगरविकास विभागाने वरील नागरी संस्थांना ही निर्देशीत करावे ही विनंती. Shivswarajyabhishek Din 6th June will be celebrated in the state as ‘Shivswarajya Din’
- Ahmedabad Plane Crash | गुजरातमधील अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे विमान कोसळले, मोठी जीवित हानी ची शक्यता
- PM Kisan Samman Nidhi Yojana 20th Installment |प्रधानमंत्री किसान सन्मान निधि 20व्या हप्त्याची संभाव्य तारीख
- Monsoon Update| महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार: आजपासून पुढील चार दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज
- बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी आमरण उपोषणस्थळी मनोज जरांगे यांची भेट
- मद्यप्रेमींना मोठा झटका! महाराष्ट्रात दारू महागली, दरात ९ ते ७० टक्क्यांपर्यंत वाढ