Seeds Soybean, Tur | शेतकऱ्यांना विद्यापाठाचा सल्ला | तुर, सोयाबीनचे हे वाण पेरण्याचे अवाहन

Seeds Soybean, Tur | शेतकऱ्यांना विद्यापाठाचा सल्ला | तुर, सोयाबीनचे हे वाण पेरण्याचे अवाहन

महात्मा फुले कृषी विद्यापीठ (राहुरी) ः दि. 4 जून पासून पुढे पाच दिवस ढगाळ वातावरणाचा तसेच पावसाचा अंदाज आहे. चांगला पाऊस झाला तर 15 जूनपर्यत कापसाची लागवड करायला हरकत नाही. तसेच तुर, सोयाबीनचे कोणते वाण चांगले उत्पादन देणारी आहेत आणि कोणते वाण पेरायचे याबाबत महात्मा फुले  कृषी विद्यापीठाने सल्ला दिलाय. 

कापसाबाबत सांगायचे झाले तर जमिनीच्या प्रकारानुसार योग्य कापुस बियाण्याची निवड करावी. लागवड ९०×९० सें.मी. किंवा १२०×६० सें.मी. अंतरावर करावी. लागवडीपूर्वी जमीन ओलवून घ्यावी. तसेच हेक्टरी १० टन शेणखत द्यावे. रस शोषणार्‍या किडींच्या नियंत्रणासाठी कपाशीभोवती एक मीटर अंतरावर मका व चवळीची एका आड एक लागवड करावी. तसेच कपाशीच्या प्रत्येक ९ व्या ओळीच्या दुसर्‍या बाजूस मका, चवळी व राळा या पिकांची लागवड करावी.

सोयाबीनच्या  पेरणीची तयारी करताना जमीन: मध्यम काळी पोयट्याची, चांगली निचरा होणारी असावी. पूर्वमशागत करताना एक नांगरट, दोन कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन भुसभूशीत करावी. आणि जे एस-३३५, एम ए सी एस-११८८, फुले कल्याणी (डी एस-२२८), जे एस-९३०५, के एस-१०३, फुले अग्रणी, (केडीएस ३४४) आणि फुले संगम (केडीएस ७२६) यावाणाची पेरणी करावी. 

तूरीची पेरणी करण्याबाबत तयारी करताना जमीन: मध्यम ते भारी, पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन तूर पिकाकरिता योग्य असते. चोपण, पाणथळ जमिनीत तूर चांगली येत नाही. कसदार, भुशभुशीत, पोयट्याच्या जमिनीत सुद्धा तूर चांगली येते. जमिनीत स्फुरद, कॅल्शिअम, गंधक या द्रव्यांची कमतरता नसावी. साधारणत: ६.५ ते ७.५ सामू असलेली जमीन या पिकास योग्य असते. पेरणीसाठी तुरीच्या विपुला, फुले राजेश्वरी, आय सी पी एल-८७, बी एस एम आर-८५३, बी एस एम आर-७३६, बी डी एन-७११, बी डी एन-७१६ या वाणाची निवड करावी. 

दि. 5 जून 2021 पासून पुढील पाच दिवस म्हणजे 9 जून पर्यत सरासरी 36 मिलीमीटर पाऊस पडण्याचा अंदाज असून किमान 24 ते 36 अंशसेल्सीयस तापमान असेल. वाऱ्याचा वेग 6 ते 17 किलोमीटर प्रती तास असेल. पावसाची शक्यता असल्याने, कापणी केलेली पिके शेडमध्ये किंवा प्लास्टिकच्या कागदाने झाकून ठेवावीत. वादळी वाऱ्याची शक्यता असल्याने, फळ पिकाचे संरक्षण करण्यासाठी बांबू किंवा लाकडी काठ्याचा आधार देऊन प्लॅस्टिक दोरीच्या सहाय्याने झाडे एकमेकांना बांधून घ्यावीत. जनावराना उघड्यावर चरावयास पाठवु नये, तसेच त्याच्याकडे बारकाईने लक्ष द्यावे तसेच झाडाखाली बांधु नयेत. जनावरे गोठ्यात बांधावीत आणि चारा उपलब्ध करुन द्यावा. शेडमध्ये पाणी साचू नये याची काळजी घ्यावी. जर पाणी साठलेल्या कोरड्या चार्यावर पडले आणि बुरशीचे आक्रमण आढळले तर तो चारा जनावरांना देवु नये. 

<

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: लेख Copy Peast करण्यापेक्षा Share करा. News Maharashtra Voice