Sarathi संस्थेच्या इमारतीसाठी जमीन आणि अधिकारी-कर्मचारी उपलब्धचा संचालक मंडळाची बैठकीत निर्णय

Sarathi  संस्थेच्या इमारतीसाठी जमीन आणि अधिकारी-कर्मचारी उपलब्धचा संचालक मंडळाची बैठकीत निर्णय

 Online Team : छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे या संस्थेची संचालक मंडळाची बैठक काल दि. 1 जून 2021 रोजी संपन्न झाली. या बैठकीमध्ये पुढीलप्रमाणे महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विशेष प्रयत्नामुळे सारथी संस्थेच्या मुख्यालयाच्या इमारतीसाठी पुणे शहरातील शिवाजीनगर भाबुर्डा मधील सी.स.नं १७३/१ब मधील ४१६३ चौ.मी जमीन मिळाली आहे. संस्थेस ४१ अधिकारी/कर्मचाऱ्यांचा स्टाफ महाराष्ट्र शासनाने दि. ०४ मे २०२१ रोजी मंजूर केला असून त्या मुळे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विशेष अभिनंदनाचा ठराव संचालक मंडळाच्या बैठकीत पारित करण्यात आला.

सारथी संस्थेमार्फत एम.फील / पीएच.डी करिता “छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती (CSMNRF-2020) मुलाखतीस सर्व उपस्थित एकूण २०७ विद्यार्थ्याची निवड करण्याबाबतचे निर्देश देण्यात आले. तसेच, ३४ अनुपस्थित उमेदवारांना मुलाखतीस एकदा अधिकची संधी देण्याचे ठरले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत आयोजित महाराष्ट्र दुय्यम सेवा गट-ब (अराजपत्रित) सहाय्यक कक्ष अधिकारी, विक्री कर निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक पदांसाठी दर वर्षी अंदाजे ५०० रिक्त जागा घोषित होत्या. यासाठी सारथी, पुणे मार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा गट-ब (अराजपत्रित) साठी संयुक्त (पुर्व) व (मुख्य) परीक्षांसाठी लक्षीत गटातील उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवून सर्व पात्र अर्जदारांना ऑनलाईन निःशुल्क प्रशिक्षण देण्याचे धोरण निश्चित करण्यात आले. स्टाफ सिलेक्शन कमिशन म्हणजेच केंद्रीय कर्मचारी निवड आयोग मार्फत अराजपत्रित (गट ब व गट क) पदांसाठी सन २०२०-२१ मध्ये अंदाजे २०,००० रिक्त पदे जाहीर झाली. यासाठी सारथी, पुणे मार्फत केंद्रीय कर्मचारी निवड आयोग मार्फत अराजपत्रित (गट ब व गट क) पदांच्या परीक्षापूर्व तयारीसाठी लक्षित गटातील उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवून सर्व पात्र अर्जदाराना ऑनलाईन निःशुल्क प्रशिक्षण देण्याचे धोरण निश्चित करण्यात आले.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत आयोजित महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा (Maharashtra Engineering Services) परीक्षेद्वारे कार्यकारी अभियंता, उप अभियंता, कनिष्ठ अभियंता यांची निवड केली जाते. या परीक्षा दर वर्षी आयोजित होतात. यासाठी सारथी संस्थेमार्फत महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा स्पर्धा परीक्षेच्या कोचिंगसाठी प्रवेश परीक्षेद्वारे (CET) लक्षित गटातील २५० उमेदवारांना पूर्व परिक्षा, मुख्य परीक्षा व मुलाखतीचे प्रशिक्षण देण्याचे धोरण निश्चित करण्यात आले.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत आयोजित महाराष्ट्र न्यायिक सेवा स्पर्धा परीक्षा (Civil Judge Jr. Division & Judicial Magistrate First Class) साठी सन २०२० मध्ये ७४ रिक्त पदे जाहीर करण्यात आली. यासाठी सारथी संस्थेमार्फत महाराष्ट्र न्यायिक सेवा स्पर्धा परीक्षेच्या कोचिंगसाठी प्रवेश परीक्षेद्वारे (CET) लक्षित गटातील एकूण ४०० उमेदवारांना मुंबई, पुणे, औरंगाबाद व नागपूर येथे पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा व मुलखतीचे प्रशिक्षण देण्याचे धोरण निश्चित करण्यात आले.

सारथी, पुणे मार्फत प्रायोजित महाराष्ट्र लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षा कोचिंग तुकडी २०१९-२० मधील MPSC पूर्व परीक्षा २०२० उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेसाठी कोचिंग व हजेरीवर आधारित तीन महिन्यांचे विद्यावेतन एकूण रु.२४०००/- अथवा एकरकमी आर्थिक सहाय्य रु.१५०००/- देण्याचा निर्णय घेण्यात आला. यापैकी कोणताही एक आर्थिक लाभाचा पर्याय विद्यार्थी स्वतःच्या आवडीनुसार निवड करू शकतात.

सारथी, संस्थेसाठी घोषवाक्य स्पर्धा भरविण्या आली होती. त्यात ९४८ जणांनी सहभाग नोंदविला या मध्ये दि. २६/०४/२०२१ पर्यंत इ-मेलद्वारे सादर करण्याची मुदत होती, तसेच हे घोषवाक्य पूर्ण मराठीत असणे व जास्तीत जास्त ७ शब्दापर्यंत असणे अनिवार्य होते. मागविण्यात आलेल्या घोषवाक्यां पैकी संचालक मंडळाने “शाहू विचारांना देवूया गती, साधूया सर्वांगीण प्रगती” या घोषवाक्याची निवड केली. हे घोषवाक्य श्री. जगदीश विष्णू दळवी यांनी पाठविले होते, त्यामुळे स्पर्धेच्या निकषानुसार सारथी संस्थेतर्फ त्यांना रक्कम रु १०,०००/- धनादेश देण्यात येणार आहे.

भारत शेतकऱ्यांचा देश आहे. सिंधू संस्कृतीपासून आजपर्यंत येथील शेतकऱ्यांनी आपली महान भारतीय संस्कृती घडवली आहे, जोपासली आहे. प्राचीन प्रजावत्सल राजे व आधुनिक समाजसुधारकांच्या परपंरांना जोडणारी कडी म्हणजे राजर्षी शाहू महाराज.

शेतकरीच नाही तर लहान-मोठ्या प्रत्येक समाजाची काळजी घेणारे व त्यासाठी अनेक लोककल्याणकारी धोरणे ठरवणारे, संस्थानात तसे कायदे करणारे राजर्षी शाहू एक आगळेवेगळे युगपुरुष होते. म्हणूनच डॉ. बाबासाहबे आंबेडकरांनी त्यांना सामाजिक लोकशाहीचे आधारस्तंभ म्हटले आहे.

राजर्षी शाहू स्वराज्याचा खरा पाया घालणारे सत्यशोधक होते ही जाणीव महात्मा गांधींनी व्यक्त केली. गांधीजी म्हणतात, “सत्यशोधक समाजाच्या तत्वांप्रमाणे छत्रपती शाहू महाराज यांनी अस्पृश्यता नष्ट केली. हा त्यांनी स्वराज्याचा पायाच घातला आहे.”

छत्रपती शिवाजी महाराजांनंतर या मराठी भूमीत रयतेच्या कल्याणासाठी शिवरायांइतकाच दक्ष राजा कोण असा विचार केल्यास प्रथम छत्रपती शाहू महाराजांचे नाव समोर येते. शिवरायांचे प्रखर राष्ट्रप्रेम, जनतेचा खरा कळवळा, न्यायप्रियता, निभर्य कायर्क्षमता या गुणांनी संपन्न छत्रपती शाहूनी त्या काळात शिक्षणाचे महत्त्व ओळखले व त्याबरोबरच राष्ट्राच्या विकासासाठीच नव्हे तर मानवतेच्या दृष्टीने कुठल्याही प्रकारचा जातीयवाद किती विषारी आहे हे ही ओळखले. राजर्षी शाहू म्हणत असत, “जातिभेद देशोन्नतीच्या मार्गात हा अडथळा आहे, जातिभेद नाहीसा होण्यावर देशाची प्रगती अवलंबून आहे.” “जातिभेद मोडून आपण सर्व एक होऊ या. प्रेमाने प्रेम वाढते व द्वेषाने द्वेष वाढतो.”

‘सारथी’ या संस्थेची भारतातील एक दर्जेदार संशोधन, प्रशिक्षण आणि मानवी विकास संस्था म्हणून जडण-घडण करण्यात येईल जेणेकरून मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी ह्या लक्षित गटाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासाच्या अनुषंगाने सर्व बाबींचा अभ्यास करून संस्था शासनाला त्यावरील उपाययोजना सुचवेल.

‘सारथी’मार्फत लक्षित गटाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी अनेक कार्यक्रम हाती घेण्यात येतील. त्यापैकी काही ठोस कार्यक्रम असे—

शिक्षणाचे महत्व जाणणारा, शेतकरी हितासाठी दक्ष, दलित व इतर मागासवगीर्यांसाठी क्रांतीकारी पाऊले उचलणारा ह्या राजर्षीच्या नावाने स्थापलेली सारथी ही संस्था त्यांच्या कायार्ला पुढे नेण्यासाठी कटीबद्ध आहे.

<

Related posts

Leave a Comment