Sambhajiraje On Maratha Reservation : सहा जुनला आता रायगडावरुनच अंदोलनाची दिशा स्पष्ट करणार

Sambhajiraje On Maratha Reservation : सहा जुनला आता रायगडावरुनच अंदोलनाची दिशा स्पष्ट करणार

मुंबई, ः मराठा समाजाच्या आऱक्षणाबाबत तातडीने निर्णय घ्या. यासह सारथीला एजार कोटीची तरतुद करा व तेथे सक्षम लोकांची नियुक्ती करा. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातून मिळणाऱ्या कर्जाची मर्यादा 25 लाख करा. मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करता येतो का हे शरद पवार, मुख्यमंत्र्यासह सरकारने स्पष्ट करावे. यासह अन्य मराठा समाजाच्या मागण्याबाबत सरकारने 5 जुन पर्यत भूमिका आणि काय करणार हे स्पष्ट करावे अन्यथा 6 जुनला राज्यभिषेक दिनी मराठा समाजाची पुढील भूमिका स्पष्ट करु. त्यानंतर होणारे परिणामाला तुम्ही जबाबदार असतील असा खणखणीत इशारा छत्रपती खासदार संभाजीराजे यांनी दिला. मराठा समाजाच्या प्रश्नावर दिल्लीत गोलमेज परिषद घेणार असल्याचे ते म्हणाले.  

मराठा आरक्षणाबाबत खासदार संभाजी राजे राज्याचा दौरा करत आहेत. त्यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन आरक्षणाबाबत मराठा समाजाची पुढील भूमिका काय असेल याची माहिती दिली. ते म्हणाले, मराठा समाजाचे तरुण तुम्ही घडवणार आहात. त्यासाठी सारथीला 1000 कोटी द्या. नाही तर ही संस्था बंद करा. सारथीचा काय आवस्था करुन ठेवलीय. जर सुधारणा करायची नसेल तर शाहु महाराजांचे नाव ठेवू नका. कशाला बोलावता. पन्नास कोटीचा निधी दिला. त्यात काय करणार असा प्रश्न उपस्थित करत सरकारच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. काय उपयोग त्याचा असा संताप व्यक्त केली. हे सर्व मी मुख्यमंत्र्याच्या कानावार घातले आहे.


मराठा समाजासाठी प्रत्येक जिल्ह्यात वस्तीगृह उभे करा. ते तुमच्या हाताता आहे. सोलापुरला वस्तीगृह मंजुर केलेय. उपायजोना करा. मराय़ा समाजासाठी वेगळी समिती करा. मराठा समाजात सत्तर टक्के गरीब,मराऔठा त्यांची चुक काय. ओबीसीला सवलती देता. मराठांया का देत नाही. गरिब मराठ्यांना. तुमच्या हातात आहे. 6 जुन राज्यभिषेक सोहळा. शिवाजी महाराज छत्रपती स्वराज्य हे सुराज्य व्हावे. 6 जुन पर्यत निकाल लागला नाही. रायगडावरुन अंदोलनाची भूमिका स्पष्ट करु. त्यानंतर आम्ही कोरोना काही पाहणार नाही.


मुख्यमंत्र्यांनी याबाबत निकाल द्यावा. अन्यथा काही काही पाहणार नाही. समाजाला वेठीस धरणार नाही. सर्व समाजातील आमदार, खासदारांना घेऊन रस्त्यावर उतरणार. पत्र देऊन चालणार नाही. दोन दिवसाचे अधिवेशन व्हावे, मराठा समाजावर चर्चा व्हावे. कोणाची उणेदुणे काढण्यासाठी नव्हे तर समाजाला काय करणार हे सांगण्यासाठी ही चर्चा व्हावी. 342, अ याचा अभ्यास मी केलाय. म्हणून दिल्लीला 9 आॅग्स्ट क्रांतीदिनी राज्यातील सर्व खासदारांना निमंत्रीत करुन गोलमेज परिषद दिल्लीत भरणार आहोत. आम्ही कोणत्याही पार्टीच्या विरोधात नाही.

मराठा समाजाला कोणी तुच्छ लेखू नका. प्लाॅन आॅफ एक्शन झाली पाहिजे. तीस टक्के मराठा समाज असताना मराठा समाजाचे प्रतिनिधी 17 टक्के आहेत. मी लोकांना, समाजाला अंगावर घेतले, राजकीय समाजीक नुकसान होणार आहे. मी घाबरत नाही. दखल घेतली नाही आणि मराठा समाजाला न्याय मिळाला नाही तर लोक कायदा हातात घेतील. कारण मी राज्याचा दौरा केला. सर्व नेत्यांना  भेटलो. त्यावेळी अनेक मराठा समाजाचे तरुण भेटले. एवढं नुकसान झाले की ते रडत होते.

आता सरकार व विरोधी लोकांना यात राजकारण करता येणार नाही. 58 शांततेत मोर्चे काढले. आता समाजात संताप व्यक्त होत आहे. सर्वपक्षीय बैठक बोलावून चर्चा करण्याची मागणी संभाजीराजे यांनी  केली. राज्यभरातील मराठा समाजातील प्रमुख समन्वयक उपस्थित होते. 

<

Related posts

Leave a Comment