Helth : फुफ्फुस सुरक्षित ठेवण्यासाठी या गोष्टींचं सेवन करा.

Online Team : आजकालच्या धकाधकीच्या आयुष्यात अनेकजण सतत कामात असल्यामुळे आपल्या Helth स्वास्थ्याकडे दुर्लक्ष करतात. मात्र याचा परिणाम थेट तुमच्या शरीरावर होतो. आहारात जंकफूडचं प्रमाण वाढल्यामुळे किंवा वातावरणातील बदलांमुळे अनेकांना थंडीच्या दिवसांत श्वसनासंबंधीच्या त्रासाला सामोरं जावं लागतं. तसंच थंडीत फुफ्फुसांचे (Lungs)अनेक आजार होण्याची संभावना असते. कोरोनासारखे Corona आजारही याच काळात होण्याची शक्यता असते. त्यामुळे फुफ्फुसांना अधिक हानी पोहोचण्याची संभावना असते. मात्र आता घाबरू नका. तुमच्या फुफ्फुसांना (Lungs) कुठल्याही आजारापासून दूर ठेवण्यासाठी पुढे दिलेल्या काही गोष्टींचं सेवन करा. 

या गोष्टींचं सेवन करा. आहारात नक्की स्थान द्या 

विविध भाज्या (Vegetables)

पालक, पत्ताकोबी आणि केळ या भाज्यांमध्ये व्हिटॅमिन ए, सी आणि के असतात. तसंच यामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि अँटीइंफ्लामेटरी गुण असतात. ज्यामुळे फुफ्फुस आजारांपासून दूर राहण्यास मदत होते. यामध्ये असलेल्या बी-कॅरोटिनमुळे कुठल्याही प्रकारचे रोग होत नाहीत. म्हणून या भाज्या फुफ्फुसांचं संरक्षण करण्यासाठी फायदेशीर आहेत. 
  
फळं (Fruits)

आजारांपासून दूर राहण्यासाठी नियमितपणे फळांचं सेवन करणं महत्वाचं आहे. मात्र फळांमध्येही व्हिटॅमिन ‘सी’ असलेल्या फळांचं सेवन करणं महात्वाचं आहे. ब्रिटिश मेडिकल जर्नलमध्ये प्रकाशित एका अभ्यासानुसार नियमितपणे लिंबू, संत्री, मोसंबी अशाप्रकारची फळं खाल्ल्यामुळे श्वसनासंदर्भातील आणि दम्यापासून संरक्षण होतं. त्यामुळे फुफ्फुसांचं संरक्षण करण्यासाठी हे फळं खाणं महत्वाचं आहे. 

ब्रोकोली (

कुठल्याही आजारापासून सुरक्षित राहण्यासाठी नियमितपणे ब्रोकोलीचं सेवन करणं हा रामबाण उपाय आहे. ब्रोकोलीत सल्फोराफेन नावाचा अँटीइंफ्लेमेटरी पदार्थ असतो ज्यामुळे तुमच्या फुफ्फुसांमध्ये कुठल्याही प्रकारचे विषारी पदार्थ प्रवेश करू शकत नाहीत. तसंच इतर सर्व आजारांपासून बचाव करण्याचं कामही ब्रोकोली करते.   

गाजर

फुफ्फुसांना आजारांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी गाजर उपयुक्त आहेत. गाजरामध्ये बीटा कॅरोटीन असतं जे तुमच्या फुफ्फुसांना आजारांपासून दूर ठेवतं. विशेष म्हणजे जी लोकं धूम्रपान करतात त्यांच्या फुफ्फुसांसाठीसुद्धा गाजर फायदेशीर आहेत. धूम्रपान करण्याऱ्या लोकांनी नियमितपणे गाजर खाल्ल्यास कँसरसारख्या रोगापासूनसुद्धा बचाव करता येईल. 

जांभूळ 

जांभळांमध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात जे फुफ्फुसांच्या अनेक समस्यांपासून आपल्याला दूर ठेवतात. तसाच यामध्ये असलेल्या फ्लेवोनॉइडमुळे वयानुसार कमी होत जाणाऱ्या फुफ्फुसांच्या कार्याला  गती मिळत नाही. यामुळे फुफ्फुस सुरक्षित राहण्यास मदत होते.  

Leave a Comment

error: लेख Copy Peast करण्यापेक्षा Share करा. News Maharashtra Voice