समग्र शिक्षा अभियानाच्या कर्मचाऱ्यांचा विधानभवनावर मोर्चा; कायम करण्यासाठी कर्मचारी आक्रमक

समग्र शिक्षा अभियानाच्या कर्मचाऱ्यांचा विधानभवनावर मोर्चा; कायम करण्यासाठी कर्मचारी आक्रमक

समग्र शिक्षा अभियानाच्या कर्मचाऱ्यांचा विधानभवनावर मोर्चा; स्थायीसाठी कर्मचारी आक्रमक

Samagra Shiksha employees marched on Vidhan Bhavan; Employees aggressive for permanent

नागपूर, (दि. 23): समग्र शिक्षा करार कर्मचाऱ्यांचा मोर्चा 23 डिसेंबर रोजी यशवंत स्टेडियम नागपूर येथून सकाळी 11 वाजता पासून मार्गक्रमण करीत हिवाळी अधिवेशनात विधान भवनावर शासनाच्या इतर कर्मचाऱ्याप्रमाणे शासन सेवेत समक्ष पदावर कायमस्वरूपी सामावून घेऊन सातवा वेतन आयोगाप्रमाणे वेतनश्रेणी लागू करण्याच्या मुख्य मागणीसह या मुद्द्याची पूर्तता होईपर्यंत सध्या असणाऱ्या मानधनात एक जानेवारी 2022 पासून किमान दुप्पट वाढ व येथून पुढे दरवर्षी किमान 20 टक्के वेतन वाढ आणि सेवा सातत्य गृहीत धरून मागील काळातील जेवढा सेवा कालावधी तितके वर्षे वयात सूट मिळावी तसेच शासनाकडून किमान 50 लाख रुपये परत मिळतील अशा आरोग्यदायी मेडिकल सुविधांचा लाभ, अपघात जीवन विमा योजना कवच इत्यादी सेवा सुविधांचा लाभ मिळावा या मागण्या मान्य करण्याकरिता धडकला आहे.. Samagra Shiksha Abhiyan employees marched on Vidhan Bhavan; employees Aggressive for permanent

सन्माननीय शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर साहेब यांना शिष्टमंडळ भेटले असता सन्माननीय मंत्री महोदयांनी येत्या पंधरा दिवसांमध्ये…. कायम, मेडिकल सवलती 10% टक्के वाढीचे 25% सेवानिवृत्तीचे वय वर्ष 65 करणे मृत व्यक्तींच्या नातेवाईकांना सवलती देणे इत्यादी बाबतीत लवकरच पत्र काढून समग्र शिक्षा करार कर्मचारी यांची सभा लावली जाईल असे सांगून सभा लावण्याबाबतचे निर्देश संबंधितांना दिले


सदर सर्व समग्र शिक्षा अभियानातील कंत्राटी पद्धतीने कार्यरत असलेले विषय साधनव्यक्ती, समावेशित शिक्षण तज्ञ, जिल्हा समन्वयक,डाटा एन्ट्री ऑपरेटर, फिरते विशेष विशेष शिक्षक, लेखा लिपिक, अभियंता, रोखपाल, एम. आय. एस.कॉर्डिनेटर इ विविध पदावर कार्य करणारे कर्मचारी शिक्षणाच्या प्रवाहापासून वंचित राहिलेल्या बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे शिक्षक प्रशिक्षण आयोजन नियोजन अध्यापन सोबतच केंद्रप्रमुखाच्या जागा रिक्त असल्यामुळे त्यांची उणीव कर्मचारी भरून काढत आहे.शाळेच्या भौतिक सुविधेसाठी कार्य करीत असून विशेष गरजा असणाऱ्या दिव्यांग बालकांकरता सहवेदना ठेवणारे कार्य व इतर सकारात्मक दृष्टिकोन ठेवून कार्य विविध पदावरील कर्मचारी करीत आहे.

जिल्हा पातळीवर अनेक शैक्षणिक कार्यात त्यांचा सहभाग असतो तसेच शासनाच्या विविध उपक्रमाची अंमलबजावणी करण्याचे काम ते उत्स्फूर्तपणे करीत आहेत. पण वाढलेली वयोमर्यादा अनेक वर्षापासून सेवा समाप्तीची टांगती तलवार त्यांच्या डोक्यावर आहे. या दरम्यान विविध कारणांनी करार कर्मचारी मृत्युमुखी पडले त्यामुळे त्यांचे कुटुंब उघड्यावर आले आहे. अशा परिस्थिती कोणत्याही अन्य सोयी सवलती नाही. शासनाचा कुठलाही आधार नाही. नोकरीत असुरक्षितता,वाढती महागाई आणि विविध कारणामुळे करार कर्मचाऱ्यांचे मानसिक खच्चीकरण होत आहे.

देशातील अनेक राज्यात व महाराष्ट्रातील विविध विभागात कार्यरत रोजंदारी, तासिका, करार तत्वावरील कंत्राटी कर्मचाऱ्यांना मूळ नियुक्ती दिनांक पासून शासन सेवेत नियमित केल्याचे समाज माध्यमातून समजते आहे. त्यामुळे सदर करार कर्मचारी उच्च विद्या विभूषित असून शासकीय कामाचा अनुभव बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 अंमलबजावणी व दर्जेदार गुणवत्तापूर्ण शिक्षण वाढीसाठी सिंहाचा वाटा आहे. शासन सेवक कार्यरत असल्यामुळे इतर नोकरीकरता त्यांनी नियत वयोमान वयोमर्यादा ओलांडलेली आहे.

या कर्मचाऱ्यांची नियुक्ती शासन पद भरती नियमावलीनुसार वर्तमानपत्रात जाहिरात देऊन 100 बिंदू नामावलीनुसार ज्याप्रमाणे सरळ सेवा भरतीची पदे भरण्यात येतात त्याला अनुसरून सदर कर्मचाऱ्यांची नियुक्ती आहे. या कर्मचाऱ्यांनी पदाची शैक्षणिक व्यावसायिक व अनुभवानुसार पात्रता पूर्ण केलेली आहे. ही योजना महाराष्ट्र शासनाच्या निगडित असल्यामुळे अस्थायी स्वरूपातील पदावरील हजारो करार कर्मचाऱ्यांना जवळपास वीस वर्षाच्या शासकीय कामाचा अनुभव लक्षात घेता असे कर्मचारी शासन सेवेत सामावून घेतल्यास अनुभवी कर्मचारी लोकहितार्थ मिळतील असे करार कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.

https://www.youtube.com/watch?v=s4p3Qb5Brrw
<

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: लेख Copy Peast करण्यापेक्षा Share करा. News Maharashtra Voice