धार्मीक

Sadhvi Ritambhara News| हिंदूनों चार मुले जन्माला घाला. दोन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि दोन विश्व हिंदू परिषदेला दिली पाहिजे

कानपूर –  उत्तर प्रदेशमधील कानपूरमधील निरालानगर येथील रेल्वे मैदानामध्ये विश्व हिंदू परिषदेकडून रामोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात रामाची वेशभूषा केलेली हजारो मुले सहभागी झाली होती. दरम्यान, याच कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या साध्वी ऋतुंभरा यांनी हिंदूंना दोन ऐवजी किमान ४ मुले जन्माला घालण्याचं आवाहन केलं. Sadhvi Ritambhara News | The Hindus gave birth to four children. Two should be given to Rashtriya Swayamsevak Sangh and two to Vishwa Hindu Parishad

रामोत्सव कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना साध्वी ऋतुंभरा यांनी सांगितले की, प्रत्येक हिंदूने आता ४ मुले जन्माला घातली पाहिजेत. यामधील दोन कुटुंबासाठी ठेवून दोन मुले राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विश्व हिंदू परिषदेला दिली पाहिजेत. त्यामुळे ते राष्ट्रीय यज्ञामध्ये आपलं योगदान देऊ शकतील. आपल्यासाठी राष्ट्र हे सर्वोपरी असले पाहिजे. Sadhvi Ritambhara News | The Hindus gave birth to four children. Two should be given to Rashtriya Swayamsevak Sangh and two to Vishwa Hindu Parishad

साध्वी यांनी याबरोबरच सांगितलं की, रामोत्सवामध्ये हजारो श्रीराम स्वरूपांना वंदन झालं. या सुंदर प्रसंगी रामाचा भक्त होणे भाग्याची बाब आहे. रामभक्त बनण्यासाठी रामत्व धारण करावं लागेल. कारण राम हा अपराजित पौरुष आहे. राजकीय पक्षांनी हिंदूंची विभागणी केली. मात्र श्रीरामांचं आचरण संपूर्ण समाजाला एक करेल. Sadhvi Ritambhara News | The Hindus gave birth to four children. Two should be given to Rashtriya Swayamsevak Sangh and two to Vishwa Hindu Parishad

दरम्यान, या कार्यक्रमामध्ये विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय महामंत्री मिलिंद परांडे यांनी कथित लव्ह जेहादाच उल्लेख करताना सांगितले की, एकेकाळ सीतामातेच्या अपहरणामुळे रावणाचा नाश झाला होता. आज आम्हाला लव्ह जिहाद करणाऱ्यांना समूळ उखडून काढलं पाहिजे. केवळ रामाच्या पूजेने हे साध्य होणार नाही.  

Sadhvi Ritambhara News | The Hindus gave birth to four children. Two should be given to Rashtriya Swayamsevak Sangh and two to Vishwa Hindu Parishad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Site Statistics
  • Today's visitors: 29
  • Today's page views: : 29
  • Total visitors : 512,766
  • Total page views: 539,673
error: लेख Copy Peast करण्यापेक्षा Share करा. News Maharashtra Voice