अफजल खानाच्या कबरीजवळ बेकायदा बांधकाम हटवण्यास सुरुवात

अफजल खानाच्या कबरीजवळ बेकायदा बांधकाम हटवण्यास सुरुवात

सातारा ( Afzal Khan Kabar ) : कोथळा बाहेर काढून अफजल खानाला छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी गाढला. मेल्यावर वैर संपत या हिंदूंच्या सहिष्णू तत्वाप्रमाणे महाराजांनी खानाची कबर बनवण्यास परवानगी दिली. मात्र, या चांगुलपणाचा गैर फायदा घेऊन ठराविक लोकांकडून इतिहासात बदनाम असलेल्या क्रूरकर्म्या अफ़जुल्याचे उद्दात्तीकरण सुरु होते. अफजल खानाच्या कबरीजवळ बेकायदा बांधकाम हटवण्यास सुरुवात Removal of illegal construction near Afzal Khan’s grave started

मागच्या काही वर्षांपासून एखाद्या माहात्म्याची कबर असावी, अशा थाटात काही लोक तिचे फुलं चढवत होते. अखेर फडणवीस – शिंदे सरकार सत्तेवर येताच खानाच्या कबरी भोवतीच्या अनधिकृत बांधकामावर हातोडा टाकण्याचा धाडसी निर्णय घेण्यात आला आहे. Removal of illegal construction near Afzal Khan’s grave started


गुरुवारी ( १० नोव्हेंबर २०२२ ) सकाळी स्थानिक प्रशासनाकडून जेसीबीच्या सहाय्यानं अनधिकृत बांधकाम पाडण्यास ( Afzal Khan Kabar ) सुरूवात करण्यात आली आहे. त्यावेळी अफजल खानाच्या कबरीच्या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.  अनधिकृत बांधकाम पाडताना माध्यम प्रतिनिधी आणि स्थानिकांना कबर परिसरापासून ६ ते ७ किलोमीटर दूर हटवण्यात आले. अफजल खानाच्या कबरीजवळील अनधिकृत बांधकाम पाडण्याचे कोर्टानं दिले होते . Removal of illegal construction near Afzal Khan’s grave started

कोर्टाच्या आदेशाची आता प्रशासनाकडून अंमलबजावणी करण्यात आली आहे. अफझल खानाची प्रतापगडावरील कबर पाडण्यात यावी, अशी मागणी काही संघटनांनी केली होती. सध्या सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार प्रतापगडावरील कबरीच्या ठिकाणी केलेलं अनधिकृत बांधकाम पाडण्यास सुरुवात झालेली आहे. Removal of illegal construction near Afzal Khan’s grave started

https://youtu.be/jJ2v6bhc0C4
सफर देवगिरी (दौलताबाद) किल्लाची Devgiri Fort Part – 1
सफर देवगिरी (दौलताबाद) किल्लाची Devgiri Fort Part – 2
<

Related posts

Leave a Comment