MPSC Recruitment | महाराष्ट्र राज्यात८ हजार जागांची भरती जाणून घ्या सविस्तर

MPSC Recruitment | महाराष्ट्र राज्यात८ हजार जागांची भरती जाणून घ्या सविस्तर

MPSC Recruitment 2023 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी गुडन्यूज आहे. MPSC मेगा भरतीची जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. ८ हजार १६९ जागांची भरती केली जाणार आहे. यासाठीची पूर्वपरिक्षा राज्यातल्या ३७जिल्हा केंद्रावर होणार आहे. संयुक्त पूर्व परिक्षेच्या निकालावर मुख्य परिक्षेसाठी पात्र उमेदवारांची मुख्य परिक्षा होणार आहे.

कधी होणार पूर्वपरिक्षा

  • ३० एप्रिल
  • यातही महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा संयुक्त मुख्य परीक्षा २०२३ ही २ सप्टेंबर रोजी,
  • तर गट क सेवा संयुक्त मुख्य परीक्षा २०२३ ही ९ सप्टेंबर रोजी होणार आहे. 

अर्ज कसा करावा?

  • एमपीएससीच्या अधिकृत वेबसाइटवरुन ऑनलाइन अर्ज करावा.
  • अर्ज करण्याची मुदत २५ जानेवारी ते १४ फेब्रुवारी आहे.

कोणत्या पदांची जाहिरात

सहायक कक्ष अधिकारी पदासाठी  ३८,६००- १,२२,८०० एवढा पगार असून यासाठी १५ जागा आहेत.राज्य कर निरीक्षक पदासाठी  ३८,६००- १,२२,८००  एवढा पगार असून यासाठी  १५९ जागा आहेत. पोलिस उपनिरीक्षक पदासाठी  ३८,६००- १,२२,८०० एवढा पगार असून यासाठी ३७४ जागा आहेत. दुय्यम निबंधक/ मुद्रांक निरीक्षक पदासाठी ३८,६००- १,२२,८०० एवढा पगार असून यासाठी ४९ जागा आहेत. दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क  पदासाठी  ३२,०००- १,०१,६००  एवढा पगार असून यासाठी  ६ जागा आहेत. तांत्रिक सहायक  पदासाठी  २९,२००- ९२,३००  एवढा पगार असून यासाठी  १ जागा आहेत. कर सहायक  पदासाठी  २५,५००- ८१,१००  एवढा पगार असून यासाठी  ४६८ जागा आहेत. लिपिक-टंकलेखक  पदासाठी  १९,९००- ६३,२०० एवढा पगार असून यासाठी ७०३४जागा आहेत.

<

Related posts

Leave a Comment