Relief to sugar factories from Modi government, release of factories from income tax
मुंबई : गेल्या तीन ते चार दशकांपासून सहकारी साखर कारखान्यांना प्राप्तिकर विभागाच्या नोटिसा येत होत्या. यासंदर्भात एक परिपत्रक जारी करून ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर कारखान्यांना केंद्र सरकारने दिलासा दिला आहे. साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांना अधिक पेमेंट झाल्यास प्राप्तीकराच्या नोटीसेस त्यांना प्राप्त होत होत्या. मात्र, आता तसे होणार नाही, एक महत्त्वाचा निर्णय सरकारने घेतला आहे. आता साखर कारखान्यांना २०१६ नंतरचा आयकर लागणार नाही. हा निर्णय केंद्र सरकारने घेतल्याबद्दल आणि त्यासंदर्भातील परिपत्रक जारी केले आहे. Relief to sugar factories from Modi government, release of factories from income tax
गेल्या अनेक दिवसांपासून एफआरपी रकमेपेक्षा ऊसाला अधिकचा दर देणाऱ्या साखर कारखान्यांवर इन्कमटॅक्स आकारला जात होता. उत्पादनापेक्षा अधिकचा नफा असतानाही या कारखान्यांनी इन्कमटॅक्स भरलेला नाही हा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. त्यामुळे अशा १५० साखर कारखान्यांना नोटीसा देण्यात आल्या होत्या. अखेर दिल्ली केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्यासमवेत महाराष्ट्रातील शिष्टमंडळाची बैठक पार पडली होती. एसएमपी आणि एफआरपी यांच्यातील फरक म्हणजे इन्कम टॅक्स नसणार यावर शिकामोर्तब झाले. या बैठकीला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, हर्षवर्धन पाटील यांची उपस्थिती होती. Relief to sugar factories from Modi government, release of factories from income tax
त्यानंतर प्राप्तीकर नोटिसांवरून साखर कारखान्यांना त्रास दिला जाणार नाही, असे आश्वसन शहा यांनी दिले होते. त्या आधारे २५ ऑक्टोबर रोजी केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) या संदर्भात स्पष्टीकरण देणारे परिपत्रक काढले. त्याद्वारे २०१६ नंतर लागू झालेला प्राप्तिकर रद्द करण्यात आला आहे. २०१६ च्या पूर्वीच्या प्राप्तीकर रद्द करण्यासंदर्भातही केंद्र सरकार गंभीर असून त्यासाठी विधेयक मांडून ते संसदेत मंजूर करावे लागेल. त्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनात वित्त विधेयक मांडताना त्यात या मुद्दय़ाचा समावेश केला जाणार असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले. साखर कारख्यान्यांच्या कर्जाच्या फेररचनेबाबत बुधवारी सहकार क्षेत्रातील शिष्टमंडळाने शहा यांची पुन्हा भेट घेतली.Relief to sugar factories from Modi government, release of factories from income tax
हे ही वाचा ….
- हा हिंदूत फुट पाडणारा राक्षस; कालीचरण महाराजांची मनोज जरांगे पाटील यांच्यावर जहरी टिका
- Maharashtra Assembly Elections -2024 प्रचाराच्या तोफा आज सायंकाळी 5 वाजल्यापासून थंडावल्या.
- बाभळीच्या शेंगा हे आयुर्वेदातील एक महत्त्वाचे औषध; जाणून घ्या फायदे |Acacia pods are an important medicine in Ayurveda; Know the benefits
- Former Cricketer Sanjay Bangar Son Aryan Gender Transformation To Anaya | टिम इंडियाचा माजी क्रिकेटर संजय बांगरचा मुलगा आर्यन बांगर लिंग परिवर्तन करुन मुलगी अनया बांगर झाला
- देवगिरी संस्थेच्या विद्यार्थ्यांचा अविष्कार २०२४ स्पर्धेत विभागीय पातळीवर सुवर्ण कामगिरी