Rashtramanch | राष्ट्रमंच एक ‘अल्टर्नेट व्हिजन ‘ शरद पवार यांच्या घरी बैठक

राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी राष्ट्रमंचच्या नेत्यांची बैठक झाली. ही बैठक जवळपास अडीच तास सुरु होती. राष्ट्रमंचची बैठक देशातील तिसऱ्या आघाडीबाबत असल्याचे बोललं जात होते. परंतु ही बैठक देशातील तिसऱ्या आघाडी आणि मोदींविरोधात नसल्याचे राष्ट्रमंचच्या नेत्यांनी सांगितले आहे. तसेच ही बैठक शरद पवार यांनी आयोजित केली नव्हती अशीही माहिती या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट करण्यात आलं आहे. या बैठकीला काँग्रेसच्या खासदारांनाही आमंत्रित करण्यात आले होते यामुळे परंतु काही कारणास्तव ते येऊ शकले नाही परंतु या बैठकीत देशातील राजकीय घडामोडी आणि वातावरण याबाबत चर्चा करण्यासाठी आयोजित करण्यात आली होती.

दिल्लीतील राष्ट्रमंचच्या बैठकीनंतर घनश्याम तिवारी, माजिद मेमन आणि यशवंत सिन्हा यांनी पत्रकार परिषद घेऊन बैठकीबाबत माहिती दिली आहे. माजिद मेमन यांनी बैठकीदरमध्ये म्हटलं आहे की, राष्ट्रमंचची बैठक शरद पवार यांच्या घरी झाली आहे परंतु ही बैठक शरद पवार यांनी बोलावली नसून राष्ट्रमंचचे प्रमुख यशवंत सिन्हा यांनी आयोजित केली होती. तसेच ही बैठक भाजपविरोधी आणि तिसऱ्या आघाडीबाबत असल्याच्या चर्चा सुरु होत्या परंतु ही या चर्चांमध्ये तथ्य नाही असे माजिद मेमन यांनी स्पष्ट केलं आहे.

राष्ट्रमंचच्या सर्व सदस्यांना या बैठकीचं आमंत्रण देण्यात आलं होतं. काँग्रेसच्या नेत्यांनाही या बैठकीसाठी बोलवण्यात आले होते परंतु दिल्लीत उपस्थित नसल्याने काही नेते उपस्थित राहू शकले नाही. जे नेते या बैठकीला उपस्थित राहू शकले नाही त्यांनी या बैठकीला पाठिंबा असल्याचे सांगितले आहे. या बैठकीमध्ये राजकीय, सामाजिक वातावरण सुधारण्याबाबत चर्चा करण्यात आली आहे. तसेच बैठकीसाठी केवळ राजकीय नेते नसून विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळी उपस्थित होते यामुळे या बैठकीला राजकारणाचे रुप देणे चूकीचे असल्याचे माजीद मेमन यांनी म्हटलं आहे.

अल्टर्नेट व्हिजन तयार करणं गरजेचं – घनश्याम तिवारी
देशात राजकीय वातावरण सुधारण्यासाठी आणि वेगळी भूमिका तयार करणं गरजेचं आहे. असे सामाजवादी पक्षाचे नेते आणि राष्ट्रमंचचे संस्थापक सदस्य घनश्याम तिवारी यांनी म्हटलं आहे. अल्टर्नेट व्हिजनसाठी यशवंत सिन्हा एक टीम गठीत करणार आहेत. ही टीम देशाला एक व्हिजन देत राहील. देशातील सर्व स्तरातील लोकांचा यामध्ये समावेश असणार आहे. अर्थव्यवस्था, बेरोजगारी,शेतकरी,इंधन,केंद्र आणि राज्यांचे संबंध अशा अनेक मुद्द्यांवर काम करण्यात येणार असल्याचे घनश्याम तिवारी यांनी म्हटलं आहे.

शरद पवार यांच्या दिल्ली निवासस्थानी झालेल्या बैठकीमध्ये घनश्याम तिवारी,ओमर अब्दुल्ला, यशवंत सिन्हा, आम आदमी पार्टीचे नेते सुशिल गुप्ता, जयंत चौधरी, जावेद अख्तर, पवन वर्मा, के सी सिंग, वंदना चव्हाण,जस्टीस ए पी शाह, प्रीतीश नंदी, कोलिन गोन्साल्वीज,करण थापर या बैठकीला उपस्थित होते

हे ही वाचा ——————————————

Leave a Comment

error: लेख Copy Peast करण्यापेक्षा Share करा. News Maharashtra Voice