महाराष्ट्रराजकारण

Pratap Sarnaiks letter to CM Uddhav Thackeray appeals | ईडीचा ससेमिरा आणी सरनाईकचा पत्र प्रपंच !

प्रताप सरनाईक हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या खास मर्जीतले असल्यानं ते स्वतः होऊन असं पत्र लिहतील असं अनेक जुन्या राजकीय तज्ज्ञांना वाटतंय. विशेष म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंतप्रधान मोदींना भेटायला गेले होते, त्याच दिवशी म्हणजे 9 जून रोजी हे पत्र लिहलंय. उद्धव ठाकरे आणि मोदी यांच्यात अर्ध्या तासांची बंद खोलीत चर्चा झाली. त्यामुळं पत्राबाबत उद्धव ठाकरे अनभिज्ञ असावेत असं म्हणण्याला जरासुद्धा वाव नाही. शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्यानं उद्धव ठाकरेंची वचनपूर्ती झालीय. शिवसेनेचा मुख्यमंत्री करुन भाजपलाही धडा शिकवण्याची त्यांची इच्छापूर्ती झाली आहे. महाराष्ट्राचा गाडा मुख्यमंत्री महिनो न् महिने मातोश्रीवरुनच हाकत आहेत.

मुख्यमंत्रीपदी टिकून राहणं हे खायचं काम नाही हेही त्यांना आता कळून चुकलं असावं. काँग्रेसनं स्वबळाची भाषा करुन आत्ता कुठे आघाडीच्या सुंदोपसुंदीला सुरुवात केलीय. मुख्यमंत्री असूनही शिवसेनेचे आमदार आमची कामं होत नाहीत हे उद्धव ठाकरेंनाच दोन वेळा म्हणाले आहेत. पक्षातला हा असंतोष पक्षप्रमुखांना फारसा परवडणारा नाही. म्हणूनच मुख्यमंत्रीपदाची ‘पुरी हौस फिटली’ अशी भावना होऊन उद्धव ठाकरेंनीच सरनाईकांना पत्र लिहायलं सांगितलं असावं असं वाटतं. प्रताप सरनाईक हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या खास मर्जीतले असल्यानं ते स्वतः होऊन असं पत्र लिहतील असं अनेक जुन्या राजकीय तज्ज्ञांना वाटतंय. विशेष म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंतप्रधान मोदींना भेटायला गेले होते, त्याच दिवशी म्हणजे 9 जून रोजी हे पत्र लिहलंय.

ईडी-सीबीआयला प्रताप सरनाईक वैतागले असतील का ?
प्रताप सरनाईकांमागे मनी लाँडरिंग प्रकरणात ईडीचा ससेमिरा आहे, त्यांना केव्हाही अटक होऊ शकते अशी शक्यता आहे. अनिल परबांची पुढची विकेट घेणार असं भाजपचे नेतेच उघडपणे म्हणत आहेत. रवींद्र वायकरही भाजपच्या रडारवर असून ते सध्या सुपात आहेत. शिवसेनेचे असे पाच-पाच नेते भाजप आणि केंद्रीय तपाससंस्थांच्या ससेमिऱ्यामुळं गोत्यात येत असल्यानं इतरांचेही धाबे दणाणले आहे. त्यामुळं हे चौकशीचे लचांड इथंच थांबवावं आणि भाजपशी जुळवून घ्यावं असं सरनाईक उघडपणे म्हणतायत. आता खरंच शिवसेनेनं पुन्हा भाजपशी युती केली तर भाजपच्या केंद्रीय तपास संस्थांच्या गैरवापरावर शिक्कामोर्तब होणार यात शंका नाही. शिवाय शिवसेना घाबरुन भाजपसोबत गेली असा शिक्का बसणार तो वेगळाच.


उद्धव ठाकरे ज्या त्वेषानं आणि आवेगानं भाजपची साथ सोडून राष्ट्रवादी-काँग्रेससोबत गेले तो आवेग सहा महिन्यांपर्यंतच टिकला. मोदी सरकारनं आवळलेल्या नाड्या, कोरोनामुळं बुडालेलं उत्पन्न, मराठा आरक्षणासारखे आव्हानात्मक विषय यामुळं मुख्यमंत्रिपदी असलेल्या उद्धव ठाकरेंची तारेवरची कसरतच सुरु होती. राज्याला संबोधन करताना कित्येकदा स्वतः मुख्यमंत्री केंद्राकडं बोट दाखवत होते. राष्ट्रवादी आणि दै. सामना तर रोजच केंद्राचे असहकार्य वेशीवर टांगत होते. विधानपरिषदेच्या 12 आमदारांच्या नियुक्त्याही राज्यपालांच्या आडून केंद्रानं अडवल्या आहेत हे लपून राहिलेलं नाही. केंद्राच्या सहकार्याशिवाय राज्यशकट हाकणे सोपे नाही याची जाणीव कदाचित उद्धव ठाकरेंना झाली असावी म्हणून मोदींच्या भेटीसोबतच सरनाईकांचेही पत्रप्रपंच झाला असावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Site Statistics
  • Today's visitors: 76
  • Today's page views: : 77
  • Total visitors : 500,030
  • Total page views: 526,452
Site Statistics
  • Today's visitors: 76
  • Today's page views: : 77
  • Total visitors : 500,030
  • Total page views: 526,452
error: लेख Copy Peast करण्यापेक्षा Share करा. News Maharashtra Voice