नांदेड आयटीआयमध्ये 4 हजार 156 जागेसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू ; ऑनलाईन अर्ज नोंदणी करण्याचे आवाहन
नांदेड (जिमाका) दि. 23 :- शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) मध्ये सन 2021-22 साठी प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. जिल्ह्यातील शासकीय आयटीआयत 2 हजार 616 तर खाजगी आयटीआयत 1 हजार 540 जागा अशा एकूण 4 हजार 156 जागेसाठी ही प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. जिल्ह्यातील युवक-युवतीनी या संधीचा लाभ घेऊन ऑनलाईन अर्ज नोंदणी करावी, असे आवाहन संस्थेचे प्राचार्य एम. एस. बिरादार यांनी केले आहे. इतर अभ्यासक्रमाच्या तुलनेत आयटीआयच्या विविध ट्रेडला मागणी अधिक आहे. Admission process started for 4 thousand 156 seats in Nanded ITI; Appeal to register online application
जिल्ह्यातील प्रवेशासाठी विविध तालुकास्तरावर असलेल्या संस्थेत विविध ट्रेडसाठी जागा उपलब्ध आहेत. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी प्रक्रिया सुरु झाली असून यासाठी http://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर प्रवेश अर्ज भरता येतो. इयत्ता दहावी उत्तीर्ण, अनुर्तीण विद्यार्थी मोठया प्रमाणात आयटीआयमध्ये प्रवेश घेतात. राज्यातील शासकीय व खाजगी आयटीआयत प्रवेश ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. गेल्या काही वर्षापासून आयटीआयच्या प्रवेशासाठी विद्यार्थी पुढे येत आहेत. गेल्या वर्षी राज्यात उपलब्ध जागेच्या तिपटीहून अधिक अर्ज आले होते. Admission process started for 4 thousand 156 seats in Nanded ITI; Appeal to register online application
यावर्षी हा आकडा कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जिल्ह्यातील आयटीआमधील ट्रेडमध्ये बेसिक कॉस्मेटोलॉजी, सुतारकाम, स्युईंग टेक्नोलॉजी, ड्राफ्टसमन सिव्हील, ड्राफ्टसमन मेकॅनिक, फिटर, फॉन्ड्रीमैन, आयसीटीएसएम, मशीनीस्ट, मशीनीस्ट ग्राईंडर, मेसन मेकॅनिक मोटार व्हीकल, फॅशन टेक्नोलॉजी, मेकॅनिक ट्रॅक्टर, पेंटर जनरल, शीट मेटल वर्कर, टुल अँड डायमेकर, टर्नर, वेल्डर, तारतंत्री, यांत्रिकी डिझेल, आरेखक यांत्रिकी इत्यादीचा समावेश आहे. Admission process started for 4 thousand 156 seats in Nanded ITI; Appeal to register online application
जिल्ह्यात शासकीय आयटीआय संस्थेची प्रवेश क्षमता पुढीलप्रमाणे आहे. नांदेड- 820, धर्माबाद- 232, किनवट- 128, हदगाव- 228, भोकर- 84, देगलूर- 164, कंधार- 92, लोहा- 104, उमरी- 188, मुखेड- 84, बिलोली- 88, माहूर- 104, अर्धापूर- 64, नायगाव- 40, मुदखेड- 152, हिमायतनगर- 24, पाटोदा- 20 असे एकूण 2 हजार 616 जागा उपलब्ध आहेत. तर जिल्ह्यातील खाजगी आयटीआयत हुजूर साहेब नांदेड- 240, नॅशनल नांदेड- 124, ग्रामीण नेहरुनगर नागलगाव कंधार- 456, माळाकोळी लोहा- 272, विष्णुपुरी नांदेड- 252, कलावतीबाई चव्हाण नायगाव- 88, ग्रामीण कंधार- 108 अशा एकुण 1 हजार 540 जागा उपलब्ध आहेत. Admission process started for 4 thousand 156 seats in Nanded ITI; Appeal to register online application
हे ही वाचा ——————————–
- ‘समग्र शिक्षा’ कंत्राटी कर्मचाऱ्यांचा प्रलंबित मागण्यांसाठी ‘स्वेच्छा मरणाची’ परवानगी मागत उपोषणाचा इशारा!
“Regularise or Allow Us to Die”: Samagra Shiksha Employees Threaten Hunger Strike Till Death - नराधमाचा क्रूरपणा! मालेगावच्या मानदे डोंगराळेत चिमुरडीची बलात्कारानंतर हत्या; संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र संतापाची लाट.
Malegaon Horror: 24-Year-Old Man Held for Rape-Murder of 3.5-Year-Old Girl; Demand for Death Penalty - माहुर पाचुंदा गावात दोन शेतकरी महिलांची निर्घृण हत्या! परिसरात खळबळ
wo Farmer Women Brutally Murdered in Pahuchunda Village; Local Area Stunned माहूर प्रतिनिधी :-

