मुस्लिम आरक्षणासाठी समाजाचा अभिनव उपक्रम मुख्यमंत्रीनां पाठवले चारशे पत्र.

मुस्लिम आरक्षणासाठी समाजाचा अभिनव उपक्रम मुख्यमंत्रीनां पाठवले चारशे पत्र.

Muslim Reservation Demand Four hundred letters Sending to Chief Minister


माहुर :- (प्रतिनिधि आज़ीम सय्यद) आज 19/07/2021 रोजी मुस्लिम समाजा तर्फे मुस्लिम आरक्षनासाठी मा. उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना पत्रा द्वारे निवेदन देण्यात आले सदर मोहिमे अंतर्गत 400 लोकांनी भाग घेतला आहे.
मागण्या मध्ये ,महाराष्ट्रात मुस्लिम समाजाची सामाजिक , शैक्षणिक आणि आर्थिक स्थिती पहाता मुस्लिम समाजास संवैधानिक कायदा करून 10 % आरक्षण देण्यात यावे . मुस्लिम आरक्षण कायदा महाराष्ट्रात लागू होईपर्यंत अध्यादेश काढून त्वरित आरक्षण लागू करावे .

महाराष्ट्रात 2021 पासून पुढे होणाऱ्या सर्व शैक्षणिक संस्था मधील ऐडमिशन मध्ये 10 % जागा मुस्लिम समाजाला देण्यात याव्यात . ( त्वरित लागु करावे ) 2021 पासुन पुढे होणाऱ्या सर्व नोकरी मध्ये 10 % जागा मुस्लिम समाजास सोडाव्यात देण्यात याव्यात . मुस्लिमांवर होणारे हल्ले , माबलिंचिंग च्या गंभीर घटना , अपशब्द ( गद्दार , पाकिस्तानी , देशद्रोही ई . ) यांना आळा घालण्यासाठी मुस्लिम समाजाला अॅट्रासिटी कायद्याअंतर्गत संरक्षण देण्यात यावे . या प्रमुख मागण्या आहेत.


सदर कार्यक्रमाचे आयोजक, निसार कुरेशी,शेख सिराज रजा, अझीम सय्यद, रिय्याज खान, शेख आजीस भाई, अतीक खान, अरमान सर, शेख अल्लाबकश, करीम शाह, शेख नजीर, व समस्त मुस्लिम समाज माहूर यांनी केले.

o—————————–o

<

Related posts

Leave a Comment