मुंबईत ठाकरेच पाहिजेत ? ठाकरे बंधू एकत्र येण्याविषय मनोज जरांगे पाटील यांच वक्तव्य ऐन महानगर पालिका निवडणुकीत चर्चेत
मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती जाहीर झाल्यानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या जुन्या वक्तव्याचा पुनरुच्चार केला आहे. “ग्रामीण भागात कोणत्याही पक्षाची सत्ता असली तरी मुंबईत ठाकरेच पाहिजेत,” असे ते म्हणाले.
हाच तो व्हिडीओ नेमके काय म्हणाले जरांगे पाटील
जुलै २०२५ मध्ये जरांगे यांनी “दोन ठाकरे एकत्र आले तर आमचं पोट दुखायचं कारण नाही” आणि “मुंबईत ठाकरे पाहिजेत ही लोकभावना आहे” असे म्हटले होते.
आता ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतरही त्यांची भूमिका बदललेली नाही. “मी जे बोललो होतो त्यावर मी कायम आहे. मुंबईत ठाकरे पाहिजेत ही लोकांची इच्छा आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. १५ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या बीएमसी निवडणुकीत शिवसेना (उबाठा) आणि मनसे यांची युती महायुतीला आव्हान देत आहे. जरांगे यांच्या या वक्तव्याने मराठी मतदारांमध्ये चर्चा रंगली आहे.

