Monsoon Update warns of heavy rains in Maharashtra | हवामानतज्ज्ञचा इशारा पुढील चार दिवस महाराष्ट्रात अतिवृष्टीचा अंदाज

Monsoon Update warns of heavy rains in Maharashtra | हवामानतज्ज्ञचा इशारा पुढील चार दिवस महाराष्ट्रात अतिवृष्टीचा अंदाज

Online Team | महाराष्ट्रात दोन दिवसापासून पावासाला पुन्हा सुरुवात आहे. भारतीय हवामान विभागानं राज्यातील पुढील चार दिवसांसाठी हवामानाचा अंदाज जारी केला आहे. 17 जुलैपर्यंत राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यातील काही जिल्ह्यात अतिवृष्टी होईल, असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. नागरिकांनी हवामानाच्या अंदाजासाठी भारतीय हवामान विभागाचे अपडेटस पाहावेत, असं आवाहन हवामानतज्ज्ञ के.एस. होसाळीकर यांनी केलं आहे. Monsoon Update warns of heavy rains in Maharashtra

कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा
भारतीय हवामान विभागानं राज्यात 17 जुलैपर्यंत कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तर, पावसामुळे गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते, असं देखील हवामान विभागामार्फत कळवण्यात आलं आहे. Monsoon Update warns of heavy rains in Maharashtra

14 जुलै रोजी राज्यात पावसाची काय स्थिती
हवामान विभागानं रायगड, रत्नागिरी, सातारा आणि कोल्हापूर, पुणे जिल्ह्याला रेड अ‌ॅलर्ट जारी केला आहे. तर सिंधुदुर्ग ठाणे, पालघर, मुंबई आणि धुळेला ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर जालना, औरंगाबाद लातूर, नांदेड, परभणी आणि हिंगोली, यवतमाळ, अकोला, वाशिम अमरावती, वर्धा आणि चंद्रपूरला येलो अ‌ॅलर्ट जारी करण्यात आला आहे. अहमदनगर, बीड, सोलापूर, उस्मानाबाद, सांगली लातूर, नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात हलका पाऊस होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
15 जुलै रोजी राज्यात पावसाची काय स्थिती राज्यातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा आणि पुणे जिल्ह्याला ऑरेंज अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे. तर ठाणे, मुंबई आणि पालघरला येलो अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे. उर्वरित महाराष्ट्रात हलका पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

16 जुलैला पावसाचा काय अंदाज
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना ऑरेंज अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे. तर सातारा,पुणे, ठाणे, पालघर, मुंबईला येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर, चंद्रपूर, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार वगळता इतर सर्व जिल्ह्यात पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
17 जुलै रोजी पावसाची काय स्थिती?
हवामान विभागानं 17 जुलै रोजी राज्यात सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांना ऑरेंज अ‌ॅलर्ट दिला आहे तर सातारा, कोल्हापूर आणि रायगडला येलो अ‌ॅलर्ट दिला आहे. उर्वरित महाराष्ट्रात हलक्या स्वरुपाचा पाऊस होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

<

Related posts

Leave a Comment