23 March Shaheed Diwas Bhagat Singh, Sukhdev, Rajguru Information in Marathi
Shaheed diwas 2023 | आज (23 मार्च) देशातील शहीदांचा सन्मान करण्यासाठी आणि त्यांच्या बलिदानाचे स्मरण करण्यासाठी शहीद दिन म्हणून साजरा केला जातो. भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढणारे भगतसिंग, त्यांचे सहकारी राजगुरू, सुखदेव यांना आज श्रद्धांजली वाहिली जाते. 23 March Shaheed Diwas Martyrs Memorial Day; Bhagat Singh, Rajguru and Sukhdev hanged on this day?
खरे तर या दिवशी भारताचे सुपुत्र भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांनी फाशीची शिक्षा स्वीकारली. शहीद दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या तिघांच्या बलिदानाचे स्मरण करत ट्विट केले आणि लिहिले की, भारत भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांच्या बलिदानाची आठवण ठेवेल. आपल्या स्वातंत्र्यलढ्यात अतुलनीय योगदान देणारे ते महान व्यक्ती आहे. Martyrs Memorial Day; Why were Bhagat Singh, Rajguru and Sukhdev hanged on this day?
स्वातंत्र्य सैनिक भगतसिंह (Bhagat Singh), राजगुरु (Rajguru) आणि सुखदेव (Sukhdev) यांची नावे ऐकल्यावर समस्त भारतीयांसमोर क्रांतीचा, देशप्रेमाचा आणि देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणारा एक चेहरा येतो. भगत सिंह, राजगुरु आणि सुखदेव यांना आजच्याच दिवशी 1931 साली लाहोर जेलमध्ये फाशी देण्यात आली होती. या दिवशी त्यांच्या बलिदानाच्या स्मरणार्थ देशभरात 23 मार्च हा ‘शहीद दिन’ म्हणून मानला जातो. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक भारतीयांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. भगतसिंह, राजगुरु आणि सुखदेव ही नावे त्यात अग्रणी आहेत.
इंग्रजी सरकारच्या ‘पब्लिक सेफ्टी बिल अॅन्ड ट्रेड डिस्ट्रिब्यूशन बिल’ च्या विरोधात भगतसिंहांनी सेट्रंल असेंब्लीमध्ये बॉम्ब फोडला होता. त्यावेळी त्यांनी स्वत: ला पोलिसांच्या हवाली केलं. लाला लजपतराय यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी त्यांनी इंग्रजी अधिकारी सॉन्डर्सला गोळ्या घातल्या. नंतर या प्रकरणाचा ठपका ठेऊन भगतसिंहावर खटला चालवण्यात आला. या प्रकरणात भगतसिंह, राजगुरु आणि सुखदेव यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. त्याची अंमलबजावणी 1931 साली करण्यात आली. त्यांना 23 मार्च 1931 रोजी संध्याकाळी 7 वाजून 33 मिनिटांनी फाशी देण्यात आली होती. हाच दिवस देशात शहीद दिन म्हणून मानला जातो.