अफगाणिस्तानची सत्ता हस्तगस्त करणारे तालिबान आहे तरी काय?

अफगाणिस्तानची सत्ता हस्तगस्त करणारे तालिबान आहे तरी काय?

संपूर्ण जग शांतपणे पाहत राहिलं आणि अफगाणिस्तान Afghanistan पूर्णपणे तालिबानच्या हातात गेला. 15 ऑगस्ट 2021 च्या सकाळी जेव्हा लोक भारतात स्वातंत्र्य दिन साजरा करत होते तेव्हा तालिबानी Taliban अफगाणिस्तानची राजधानी काबूलला घेराव घालत होते आणि अफगाणी नागरिकांचे स्वातंत्र्यावर घाला घालत होते. गेल्या 3 महिन्यांपासून सुरू असलेल्या लढाईत, कंधार, हेरात, कुंडूज, जलालाबाद, बल्ख आणि उर्वरित अफगाणिस्तान तालिबानच्या ताब्यात येत होते. परंतु राजधानी काबूल इतक्या लवकरTaliban तालिबान्यांच्या हाती पडेल असे कुणालाही वाटलं नव्हतं. 15 ऑगस्ट 2021 रोजी रविवारी सकाळी तालिबानने (Taliban)अफगाणिस्तानचे (Afghanistan) राष्ट्रपती अशरफ गनी यांचे निवासस्थान (राष्ट्रपती भवन) ताब्यात घेतले होते. राष्ट्रपती अशरफ गनी (Ashraf Ghani) व उपराष्ट्रपती अमीरुल्लाह देश सोडून पळून गेले आहे. तालिबान्यांनी अचानक काबूलला वेढा घातला आणि अफगाणिस्तान Afghanistan सरकार आणि सैन्याने लढाईशिवाय आत्मसमर्पण केलं. दरम्यान, काबूलहून अमेरिकेच्या राजदूत आणि तेथील अधिकाऱ्यांना तात्काळ माघारी बोलावून घेतलं. यासाठी विशेष हेलिकॉप्टर पाठविण्यात आले होते. (Know About The Taliban And Its History Occupying Power In Afghanistan)

तालिबान म्हणजे काय? What is Taliban?
पश्तू भाषेत तालिबानचा Taliban अर्थ विद्यार्थी Studant असा होतो. Afghanistan अफगाणिस्तानातून सोव्हिएट सैन्याने माघार घेतल्यानंतर उत्तर पाकिस्तानात तालिबानचा उदय झाला. धार्मिक समारंभातून तालिबानचा उदय झाला, असं मानलं जात. कडवट सुन्नी इस्लामचा प्रचार करणाऱ्या या सभांना सौदी अरेबियातून पैसा मिळत होता. तालिबान आशियातील काही देशांतून असलेली दहशतवादी संघटना आहे. संस्थापक: मुल्ला उमर Mulla Umar, अब्दुल घनी बरादर Abdul Gani सध्या ट्रेंडमध्ये असलेले यानी तालीबान ची स्थापना: सप्टेंबर १९९४, कंदाहार, अफगाणिस्तान Afghanistan मुख्यालय: कान्दाहार, अफगाणिस्तानला जवळपास तीन दशके युद्धभूमी बनवणाऱ्या तालिबानने पुन्हा एकदा अफगाणिस्तानची सत्ता हाती घेण्याकडे वाटचाल सुरू केली आहे. तालिबानचा Taliban उदय १९९० च्या दशकात उत्तर पाकिस्तानमध्ये झाला. त्यावेळेस सोव्हिएत संघाच्या फौजा अफगाणिस्तानमधून माघारी जात होत्या. त्यानंतर तालिबानने अफगाणिस्तानच्या कंदहार शहराला आपले पहिले केंद्र बनवले. तालिबानने आता जवळपास २० वर्षानंतर पुन्हा एकदा कंदहार शहराचा ताबा घेतला आहे. अफगाणिस्तानच्या जमिनीवर कधीकाळी सोव्हिएत संघाच्या फौजा होत्या. त्यानंतर १९८९ च्या सुमारास कट्टरतावादी बंडखोरांनी सोव्हिएत फौजांनी माघारी जाण्यास भाग पाडले. त्यावेळी सोव्हिएत फौजांविरोधात लढणाऱ्यांना काही पाश्चिमात्य माध्यमांनी स्वांतत्र्यसैनिकांची उपमा दिली होती. सोव्हिएत फौजांविरोधात लढणाऱ्या कट्टरतावाद्यांचा कंमाडर मुल्ला मोहम्मद उमर यांने पुढे तालिबानची स्थापना केली. उमर हा पश्तून समुदायातून होता. (Know About The Taliban And Its History Occupying Power In Afghanistan)

१९९० साली तालिबान संघटना ही उत्तर पाकिस्तान Pakistan आणि दक्षिण पश्चिम अफगाणिस्तानच्या Afghanistan सीमावर्ती भागात आकार घेत होती. भ्रष्टाचार आणि अफगाणि नागरिकांच्या संरक्षणासाठी आम्ही लढत असल्याचे संघटनेचे म्होरके जनतेला सागंत. यामुळे मोठ्य़ा प्रमाणात कट्टरपंथिय तरुण या संघटनेत सामील होत होते. तसेच शरिया कायद्याला प्रोत्साहन देण्याचेही ते कार्य करत होते. इस्लामिक कायद्याप्रमाणे नागरिकांना शिक्षा देणे, हत्या व व्यभिचारासाठी सार्वजनिक ठिकाणी संबंधित आरोपीला फासावर लटकवणे, पुरुषांना दाढी वाढवण्याची सक्ती करणे, महिलांना बुरख्यात वावरण्याची सक्ती करणं तालिबान्यांनी सुरू केलं. तसेच टीव्ही , गाणी आणि सिनेमा यावरही तालिबान्यांनी बंदी घातली होती. मुलींना शाळेत जाण्यास बंदी घातली. यामुळे काही कट्टरवादी जनतेने त्यांचे समर्थन केले. तर काहीजणांनी तालिबान्यांविरोधात एल्कार केला. त्यांची तालिबान्यांनी कत्तल केली होती. आज पाकिस्तानच्या मदतीने तालिबानी पुन्हा सक्रिय झाले असून अफगाणिस्तान सरकारही त्यांच्यापुढे हतबल झाले आहे. यामुळे अफगाण सरकारने भारतासह अनेक देशांकडे मदतीची याचना केली आहे. (Know About The Taliban And Its History Occupying Power In Afghanistan)

अफगाणिस्तान आणि तालिबान्यांमधील रक्तरंजित संघर्षाला २० वर्षांहून अधिक काळ झाला आहे. ११ सप्टेंबर २००१ मध्ये अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरातील वर्ल्ड ट्रेड सेंटर आणि पेंटागॉन या इमारतीवर दहशतवाद्यांनी विमान हल्ला केला होता. यात तीन हजार अमेरिकी नागरिकांचा मृत्यू झाला. या हल्ल्यामागे अल कायदा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख ओसामा बिन लादेन याचा हात असल्याचा आरोप अमेरिकेने केला होता. त्यावेळी अफगाणिस्तानात कट्टरवादी संघटना तालिबानचे शासन होते. त्यांनीच ओसामा बिन लादेनला अफगाणिस्तानात आश्रय दिला होता. तसेच ओसामाला अमेरिकेच्या ताब्यात देण्यास नकार दिला होता. यामुळे अमेरिका चवताळली होती. ११ सप्टेंबरच्या दहशतवादी हल्ल्याला एक महिना पूर्ण होताच अमेरिकेने अफगाणिस्तानवर हवाई हल्ले करत तालिबान आणि अल कायद्याला सळो की पळो केले होते. (Know About The Taliban And Its History Occupying Power In Afghanistan)

तालीबानला मान्यता देणारे हे तीन देश
१९९६ ते २००१ दरम्यान अफगाणिस्थानवर तालिबानची सत्ता होती. त्यावेळी पाकिस्तानशिवाय सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरात यांनीही तालिबानला मान्यता दिली होती.

मुल्ला अब्दुल गनी बरदार काबूलमध्ये
अफगाणिस्तान सरकार आणि लष्कराने आत्मसमर्पण करताच तालिबान कमांडर मुल्ला अब्दुल गनी बरदार दोहाहून काबूलला पोहोचला. त्यांनी थेट राष्ट्रपती भवन गाठले आणि अफगाणिस्तानचे अध्यक्ष घनी यांच्याशी सत्ता हस्तांतरणाबाबत चर्चा केली. यानंतर अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांनी देश सोडला.

तालिबानचा नेता कोण आहे?
तालिबान ही कट्टर धार्मिक विचारांनी प्रेरित तरुण लढवय्यांची संघटना आहे. त्याचे बहुतेक सेनानी आणि कमांडर मौलवी आणि कबाली गटांचे प्रमुख आहेत. जे पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा भागात स्थित कट्टर धार्मिक संघटनांमध्ये शिकलेले आहेत.त्यांचा एकच उद्देश आहे, ते म्हणजे पाश्चिमात्य देशांचा प्रभाव राजवटीतून काढून टाकणे आणि देशात इस्लामिक शरिया कायदा प्रस्थापित करणे.मौलवी हिब्तुल्लाह अखुंजादा हा तालिबानचा प्रमुख आहे. आधी मुल्ला ओमर आणि नंतर 2016 मध्ये अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात मुल्ला मुख्तार मन्सूर याचा खात्मा झाल्यापासून हिब्तुल्लाह अखुंजादा हा तालिबान्यांचा प्रमुख बनला आहे. हिब्तुल्लाह हा कंदहारमध्ये एक मदरसा चालवत होता आणि तालिबानच्या युद्ध कारवायांच्या बाजूने फतवे जारी करायचा. 2001 पूर्वी अफगाणिस्तानमध्ये तालिबानच्या राजवटीत तो न्यायालयांचा प्रमुख होता. (Know About The Taliban And Its History Occupying Power In Afghanistan)

भारताची स्थिती संवेदनशील
अफगाणिस्तान हा तालिबान्यांच्या हातात गेल्याने भारतातील परिस्थिती अत्यंत संवेदनशील बनली आहे. भारताने गेल्या 20 वर्षांत अफगाणिस्तानच्या विकासात अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक केली होती. भारताने शाळा, रुग्णालये, वीज आणि वायू संयंत्रांसह अनेक मोठ्या प्रकल्पांवर बराच खर्च केला होता. परंतु आता हे सर्व तालिबानी राजवटीच्या आगमनाने संपुष्टात येण्याच्या शक्यता वाढल्या आहेत. एअर इंडियाच्या अनेक विमानांनी अफगाणिस्तानमध्ये असणाऱ्या भारतीयांना माघारी आणलं जात आहे. तसेच येथे असणाऱ्या राजदूताना सुरक्षित परत आणण्याचं देखील एक मोठं आव्हान भारतासमोर आहे. तालिबान राजवटीतच कंदहार विमान अपहरण घडलं होतं. ज्याचे परिणाम भारत आजही भोगत आहे.

============================================================================================

<

Related posts

Leave a Comment