मनोरंजन

kareena Kapoor For Sita Role| तैमुर च्या अम्मीला सितामातेचा रोल नकोच.

Online Team – बॉलीवूडची प्रसिध्द अभिनेत्री करिना कपूर (bollywood actress kareena kapoor) रामायणातील सीतेची भूमिका (ramayana sita role) करणार अशी बातमी सगळीकडे पसरली आणि मोठ्या वादाला सुरुवात झाली. त्यावरुन अनेकांनी करिनाला ट्रोल करण्यास सुरुवात केलीय. गेल्या काही दिवसांपासून ती आणि सीतेची भूमिका या दोन्ही गोष्टी ट्रेडिंग आहेत. त्यामुळे येत्या काळात हा चित्रपट तयार होणार की नाही, त्याला होणारा विरोध वाढणार का असे प्रश्न आता सोशल मीडियातून विचारले जात आहेत. पौराणिक कथेवर आधारित चित्रपटात करिना सीतेची भूमिका करणार होती. त्यावरुन आता मोठ्या वादाला सुरुवात झाली आहे. (bajrang dal activists submit memorandum against kareena kapoor for sita role)

करिनानं त्या भूमिकेसाठी मोठ्य़ा रकमेची मागणी केल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे मोठे प्रश्नही निर्माण झाले आहेत. दुसरीकडे नागपूर मधील बजरंग दलाच्या (bajrang dal) कार्यकर्त्यांनी करिनाच्या विरोधात जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रारही केली आहे. दलाच्या कार्यकर्त्यांनी जे निवेदन दिले आहे त्यात करिनाला स्पष्ट शब्दांत सांगण्यात आले आहे, जर हा चित्रपट तयार झाला तर त्याला कडाडून विरोध करण्यात येईल. एका कार्यकर्त्यानं सांगितलं, सातत्यानं हिंदू समाजावर चित्रपट तयार करणं यातून नेमकं काय सांगायचं आहे ?

यापूर्वी तांडव (tandav) ही मालिका आली होती. त्यात हिंदू देवतांवर टीका करण्यात आली होती. त्यात करिना कपूरचा पती सैफ अली खान होता. आता सीता नावाचा चित्रपट येतो आहे. त्यात करिना प्रमुख भूमिकेत आहे. दरवेळी हे मुस्लिम समाजाचे लोक हिंदू समाजाच्या भावना का दुखावतात, असा प्रश्न त्यानं यावेळी केला आहे.

करिना गेल्या काही दिवसांपासून ट्रोल होताना दिसत आहे. काहींनी तिला ट्रोल करताना म्हटले होते, तु या रोलमध्ये फिट नाही. हा रोल एका हिंदू अभिनेत्रीला मिळायला हवा. त्यामुळे सोशल मीडियावर करिनाच्या विरोधात आता हॅशटॅगही सुरु झाला आहे.

————-हे ही वाचा—————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Site Statistics
  • Today's visitors: 44
  • Today's page views: : 44
  • Total visitors : 499,998
  • Total page views: 526,419
Site Statistics
  • Today's visitors: 44
  • Today's page views: : 44
  • Total visitors : 499,998
  • Total page views: 526,419
error: लेख Copy Peast करण्यापेक्षा Share करा. News Maharashtra Voice