जालनामहाराष्ट्रशैक्षणिक

Jalna Zilla Parishad CEO IAS Varsha Meena यांनी त्यांचा मुलागा दरेगाव येथील सरकारी अंगणवाडी मध्ये टाकला

जिल्हा परिषदांच्या शाळा म्हटल्या की काही पालकं नाकं मुरळतात. सरकारी शाळा, अंगणवाड्यांकडे पाहण्याचा काही पालकांचा दृष्टीकोनच वेगळा असतो. ते आपल्या पाल्यांना मोठमोठ्या खासगी शाळांमध्ये शिक्षणासाठी प्रवेश देतात. पण जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये शिक्षणाचा जो आत्मा असतो तो सहजासहज उमगणार नाही, असाच असतो. जिल्हा परिषदेच्या शाळांच्या शिक्षकांची असणारी पोटतिडकी अफाट असते. Jalna Zilla Parishad CEO IAS Varsha Meena got her son Addmission in Government Anganwadi at Daregaon Jalna

आपल्या विद्यार्थ्याने शिकून खूप मोठा अधिकारी व्हावं, अशी या शिक्षकांची इच्छा असते. जिल्हा परिषदेच्या शाळेचे शिक्षण विद्यार्थ्यांसाठी प्रचंड मेहनत घेतात. पण जिल्हा परिषद शाळा आणि अंगणावाड्यांबाबत काही पालकांच्या मनात शंका असते. त्यामुळे ते लाखो रुपये खर्चून पाल्याला खासगी शाळांमध्ये प्रवेश देतात. पण अशाच पालकांच्या डोळ्यांमध्ये अंजन घालणारी घटना समोर आली आहे.

“सरकारी शाळा, अंगणवाड्या चांगल्या नसतात, अशी आपली सगळ्यांची मानसिकता असते. पण मला तरी तसा वैयक्तिक अनुभव आलेला नाही. मी खूप अंगणवाड्यांना भेटी दिल्या आहेत. माझं बाळ आता 15 महिन्यांचं झालं आहे. त्याला कुठेतरी अंगणवाडीमध्ये टाकलं पाहिजे, असा विचार माझ्या मनात आला”, अशी प्रतिक्रिया वर्षा मीना यांनी दिली.

“ही अंगणवाडी चांगली आहे. विशेष म्हणजे जालना जवळपास 2000 अंगणवाड्या आहेत. या सर्व चांगल्या आहेत. आम्ही स्मार्ट अंगणवाडीचं नियोजन केलेलं आहे”, अशी माहिती मीना यांनी दिली. Jalna Zilla Parishad CEO IAS Varsha Meena got her son Addmission in Government Anganwadi at Daregaon

“सरकारी शाळा आणि अंगणावाडी चांगली असतात. आपण आपल्या पाल्याला इथे पाठवलं पाहिजे. अनेकांना याबाबत आवाहन केलं पाहिजे. काही ठिकाणी दुरावस्था असल्याच्या घटना समोर येतात. पण त्यासाठी काम केलं पाहिजे. तसेच काम केलं जातही आहे. दरेगाव अंगणावाडी सारख्या ज्या अंगणावाड्या आहेत त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे”, अशी भूमिका वर्षा मीना यांनी मांडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Site Statistics
  • Today's visitors: 18
  • Today's page views: : 18
  • Total visitors : 512,617
  • Total page views: 539,524
error: लेख Copy Peast करण्यापेक्षा Share करा. News Maharashtra Voice